अब्जांश पदार्थ निर्मिती पद्धती (Production methods of nano substance)

अब्जांश पदार्थ तयार करण्यासाठी ज्या विविध पध्दती वापरतात त्यांचे वर्गीकरण सामान्यत: दोन प्रकारच्या प्रक्रियांमध्ये केले जाते. या प्रक्रिया ‘टॉप डाऊन प्रक्रिया’ (Top Down Approach) आणि ‘बॉटम अप प्रक्रिया’  (Bottom Up…

सेंट बर्नार्ड खिंड (Saint Bernard Pass)

आल्प्स पर्वतातील दोन खिंडी. स्वित्झर्लंड-इटली यांदरम्यानची ग्रेट (ग्रँड) सेंट बर्नार्ड, तर फ्रान्स-इटली यांना जोडणारी लिटल (पेटिट) सेंट बर्नार्ड या नावांनी या खिंडी ओळखल्या जातात. प्राचीन काळापासून पर्वत ओलांडण्यासाठी या खिंडींचा…

स्टोक ऑन ट्रेंट (Stoke-on-Trent)

इंग्लंडमधील स्टॅफर्डशर परगण्यातील एक शहर आणि मृत्पात्री या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या २,६३,३९३ (२०१९ अंदाज). मध्य इंग्लंडमध्ये ट्रेंट नदीच्या तसेच ट्रेंट व मर्सी कालव्याच्या काठावर वसलेले हे शहर मँचेस्टरपासून…

कापरेकर गणितीय संज्ञा (Kaparekar Mathematical terms)

स्वयंभू आणि संगम संख्या : स्वयंभू संख्या ही संकल्पना थोर भारतीय गणिती दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांनी १९४९ मध्ये मांडली. यासाठी त्यांना १९६२ मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाची (UGC) शिष्यवृत्ती प्राप्त झाली…

गो.मा.पवार (G.M.Pawar)

पवार, गो. मा. : (१३ मे १९३२-१६ एप्रिल २०१९). गोपाळ मारुतीराव पवार. महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक आणि समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याचे व्यासंगी संशोधक. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील पानगाव…

एपिक्यूरस (Epicurus)

एपिक्यूरस : (इ.स.पू. ३४१—इ.स.पू. २७०). एक ग्रीक तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म आशिया मायनरमधील सेमॉस येथे ॲथीनियन पालकांच्या पोटी झाला. एपिक्यूरियन या संप्रदायाचा तो आद्य प्रणेता होय. तो गार्गेटसचा रहिवासी असल्याने त्याला…

जॉर्ज एडवर्ड बेटमन सेंट्सबरी (George Edward Bateman Saintsbury),

सेंट्सबरी, जॉर्ज एडवर्ड बेटमन : (२३ ऑक्टोबर १८४५-२८ जानेवारी १९३३). इंग्रजी साहित्याचा ख्यातनाम इतिहासकार. जन्म साउथॅम्पटन, हँपशर येथे. मेर्टन कॉलेज, ऑक्सफर्डमधून तो एम्. ए. झाला (१८६८) तथापि त्याला हवी असलेली…

सेई शोनागुन (Sei Shōnagon)

सेई शोनागुन : ( दहाव्या शतकाचा उत्तरार्ध ). श्रेष्ठ जपानी लेखिका. तिच्या जन्म-मृत्यूची ठिकाणे अज्ञातच आहेत. जपानच्या सम्राटाच्या राजदरबारात राणी सादाको हिची ती खास सेवेकरी होती. ह्या राजदरबारातच ‘सेई शोनागुन’…

ल्यूशस अनीअस सेनिका (Lucius Annaeus Seneca)

सेनिका, ल्यूशस अनीअस : (इ. स. पू. ४ – इ. स. ६५). रोमन नाटककार, तत्त्वज्ञ आणि वक्ता. जन्म स्पेनमधील कॉरद्यूबा (आजचे कॉर्दीव्हा) येथे एका श्रीमंत, प्रतिष्ठित कुटुंबात. सेनिकाचे संपूर्ण नाव ल्यूशस…

कामीलो होसे सेला (Kamilo Khose Sela)

सेला, कामीलो होसे : (११ मे १९१६-१७ जानेवारी २००२). स्पॅनिश साहित्यिक. पूर्ण नाव कामीलो होसे सेला त्रलोक. जन्म स्पेनमधील इरिया फ्लाविया, गॅलिशिया येथे. तो नऊ वर्षांचा असताना त्याचे कुटुंबीय माद्रिदला आले.…

पंचाग्निविद्या (Panchagni Vidya)

उपनिषदातील एक विद्या. जी विद्या जाणल्यानंतर जाणणाऱ्याला पृथ्वीवरील मृत्यूनंतर जीव कुठे जातात, ते पुन्हा कसे काय पृथ्वीवर जन्म घेतात इत्यादी गूढतम प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे मिळतात, त्या उपनिषदांतील विद्येला पंचाग्निविद्या असे…

कार्बन-१४ कालमापन पद्धती (रेडिओकार्बन) (Radiocarbon or Carbon-14 Dating)

प्राचीन अवशेषांच्या कालमापनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रारणमापनाच्या भौतिकी रासायनिक पद्धतींमधील सर्वांत प्रसिद्ध पद्धती. ही पद्धत प्राचीन वस्तूतील किरणोत्सारी कार्बन-१४ या समस्थानिकाचे प्रमाण म्हणजेच सध्याच्या जैविक नमुन्यातील त्याच्या प्रमाणाच्या तुलनेत मोजणे यावर…

विष्णू  प्रभाकर (Vishnu Prabhakar)

विष्णू  प्रभाकर  : (२१ जून १९१२ -११ अप्रैल २००९). प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक. प्रगतीवाद कालखंडातील एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. हिंदी साहित्यात कथा, नाटक व कादंबरी हे साहित्यप्रकार…

कालमापन पद्धती (पुरातत्त्वीय) (Dating in Archaeology)

कालाचे मापन करण्याची पद्धती. भूतलावर मानव अस्तित्वात आल्यापासून ते आतापर्यंत त्याने केलेल्या प्रगतीच्या महत्त्वाच्या टप्प्यांची कालक्रमानुसार पुनर्बांधणी करणे हे पुरातत्त्वीय संशोधनातील कालमापनाचे उद्दिष्ट आहे. पुरातत्त्वातील कालमापनासाठी प्रमाणित पद्धती विकसित करण्याचे…

वीरासन (Virasana)

एक आसनप्रकार. या आसनामध्ये पद्मासनाप्रमाणे दोन्ही पाय एकमेकांवर न आणता फक्त एकच पाय मांडीवर ठेवायचा असतो. म्हणून याला अर्धपद्मासनही म्हणतात. या आसनाच्या विशिष्ट रचनेमुळे साधक अधिक दृढ व धैर्यवान वा…