कल्ले (Gills)

कल्ले (क्लोम) म्हणजे जलचर प्राण्यांच्या श्वसनक्रियेत पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी आणि रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड विसर्जित करण्यासाठी असलेले इंद्रिय. सागरी वलयांकित प्राणी आणि त्याहून अधिक प्रगत प्राणी यांच्यामध्ये ऑक्सिजनाची गरज अधिक…

कवडी (Cowrie)

मृदुकाय (मॉलस्का) संघातील उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गातील एक सागरी प्राणी. कवडी ही संज्ञा कवच असलेल्या जिवंत प्राण्यास आणि प्राणी मेल्यानंतर त्याचे राहिलेले कवच या दोन्हींसाठी वापरतात. उदरपाद वर्गात शंखाच्या आणि बिनशंखाच्या…

कृमी (Worm)

अपृष्ठवंशी प्राण्यांच्या चपटकृमी (प्लॅटिहेल्मिंथिस) आणि गोलकृमी (नेमॅथेल्मिंथिस) संघांतील प्राण्यांना कृमी म्हणतात. काही वेळा ही संज्ञा कीटक वर्गातील तसेच वलयांकित संघातील प्राण्यांनाही स्थूल अर्थाने वापरतात. कृमींची एकूण संख्या सु. दहा लाखांहून…

कसर (Silver fish)

कसर हा लहान कीटक १.२ ते १.८ सेंमी. लांब, चपळ व पंखहीन असतो. त्याच्या पोटाच्या शेवटच्या खंडापासून तीन शेपटासारखे अवयव फुटलेले असतात. थायसान्यूरा गणाच्या लेपिझ्माटिडी कुलात याचा समावेश होत असून…

कस्तुरी मृग (Musk deer)

स्तनी वर्गाच्या समखुरी ( ज्यांच्या पायांवरील खुरांची संख्या सम असते) गणातील हरणांच्या मृगकुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव मॉस्कस मॉस्किफेरस आहे. मध्ये व ईशान्य आशिया, काश्मीर, नेपाळ व भूतान येथे हा…

काकाकुवा (Cockatoo)

काकाकुवा हा सिट्टॅसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे. हा उष्णकटिबंध प्रदेशांत आढळणारा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव कॅकॅटोई गॅलेरिटा आहे. या पक्ष्याचे काकाकुवा हे नाव मूळ ‘काकातुआ’ या मलेशियन नावापासून आले आहे.…

कालव (Mussel)

मृदुकाय (मॉलस्का) संघाच्या परशुपाद किंवा शिंपाधारी (बायव्हाल्व्हिया) वर्गातील एक प्राणी. बहुसंख्य कालवे सागरी असून काही गोड्या पाण्यात राहतात. सागरी कालवांना ‘तिसर्‍या’ असे सामान्य नाव आहे. लॅमेलिडेन्स प्रजातीच्या अनेक जाती भारतात आढळतात. सागरी…

कृत्तक (Clone)

एखाद्या सजीवाच्या जनुकीय रचनेसारखीच जनुकीय रचना असणारा दुसरा सजीव म्हणजे कृत्तक. असा कृत्तक निर्माण करण्याच्या प्रक्रियेला कृत्तकी किंवा कृत्तककरण म्हणता येईल. उत्परिवर्तन किंवा पर्यावरणामुळे आलेला विकासातील फरक झाला नाही तर…

केवडा (Screw pine)

केवडा ही पँडॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पँडॅनस ओडोरॅटिसिमस असे आहे. या वनस्पतीच्या सुवासिक कणसाला सामान्यपणे केवडा म्हणतात. हे कणीस नरफुलांचा फुलोरा असतो. या वनस्पतीचा प्रसार निसर्गत: भारतीय…

किवी (Kiwi)

किवी हा न उडणारा एक पक्षी आहे. पक्षी वर्गातील अ‍ॅप्टेरिजिडी कुलातील हा पक्षी फक्त न्यूझीलंडमध्ये आढळतो. किवीच्या पाच जाती असून, त्यांपैकी विपुल प्रमाणात आढळणार्‍या जातीचे शास्त्रीय नाव अ‍ॅप्टेरिक्स ऑस्ट्रॅलिस आहे. किवी आकाराने…

आंत्र (Intestine)

जठराच्या निर्गमद्वारापासून गुदद्वारापर्यंतच्या भागाला आंत्र (आतडे) असे म्हणतात. अन्नपचनमार्गातील हा सर्वात लांब भाग आहे. आतड्याचे लहान आतडे (लघ्वांत्र) व मोठे आतडे (बृहदांत्र) असे दोन भाग असतात. लहान आतड्याची लांबी सु.…

कॉफी (Coffee)

कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफियाप्रजातीमध्ये असलेल्या वृक्षांच्या फळांतील बियांपासून कॉफीची भुकटी बनवितात. कॉफी वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉफिया अरॅबिकाअसे…

आंतरदेहगुही संघ (Coelenterata)

अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सु. ९,००० जाती आहेत. हे प्राणी बहुपेशीय आणि द्विस्तरी असतात. त्यांचे शरीर पेशींच्या बाह्यस्तर आणि अंत:स्तर यांनी बनलेले असते. शरीरामध्ये जठरवाहिनीगुहा अथवा आंतरगुहा अथवा…

स्वेदन (Swedan-Ayurveda)

'स्वेदन' ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची, स्नेहनानंतर करण्याची एक तांत्रिक प्रक्रिया आहे. तसेच वातदोष आणि कफदोष ह्यांनी होणाऱ्या रोगांमधे चिकित्सा म्हणून वर्णन केले आहे. ज्या प्रक्रियेमुळे किंवा औषधांमुळे शरीरात घामाची निर्मिती…

स्नेहन (Snehan-Ayurveda)

स्नेहन ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची तांत्रिक प्रक्रिया आहे व वाढलेला वातदोष कमी करण्याचीही प्रक्रिया आहे. स्नेह म्हणजे स्निग्धपदार्थ. ज्यामुळे शरीराला स्निग्धत्व येते, मऊपणा येतो, शरीरात ओलावा निर्माण होतो त्या प्रक्रियेला…