इमारतींवरील भूकंपाचे परिणाम कमी करण्यासाठी उपाय ( Remedy to Reduce Earthquake Effects on Buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना २४ भूकंपाचे इमारतींवरील परिणाम कमी करण्याची गरज : पारंपरिक भूकंपीय संकल्पन प्रक्रिया तीव्र भूकंपाच्या हादऱ्यांदरम्यान इमारतीला कोसळू न देता परंतु इमारतीमधील असंरचनात्मक घटकांना आणि काही प्रमाणात संरचनात्मक…

Read more about the article पाण्याची क्लोरीनची मागणी काढणे (Removal of water chlorine demand)
आ. १२. विरंजक चूर्ण द्रावण क्लोरिनेटर (दाबाखाली वाहणाऱ्या पाण्यासाठी) : (१) मृदू पोलादी (Mild Steel) दाबपात्र, (२) विरंजक चूर्णाकरिता रबरी पिशवी, (३) छिद्रित तबक किंवा व्हेंच्यूरीमापी, (४) नियंत्रण झडप, (५) पकडयुक्त नलिका, (६) वायू झडप, (७) निस्सारण झडप, (८) आगम व निर्गम झडप, (९) क्लोरीन प्रदान झडप, (१०) नलिकाग्र (तोटी).

पाण्याची क्लोरीनची मागणी काढणे (Removal of water chlorine demand)

पाण्याची क्लोरीनची मागणी काढण्याकरिता पुढील कार्यपद्धती अवलंबिली जाते.  (१) पाण्याच्या नमुन्याचे सारखे भाग घेऊन प्रत्येकामध्ये वाढत्या प्रमाणात क्लोरीनचा द्रव मिसळतात. (२) विशिष्ट संपर्ककाल (सहसा ३० मिनिटे) झाल्यावर प्रत्येक नमुन्यामध्ये उरलेल्या…

प्रतिकात्मक मानवशास्त्र (Symbolic Anthropology)

विविध प्रतिके आणि त्यांविषयीच्या कल्पना, दंतकथा, कर्मकांड, स्वरूप इत्यादींविषयी त्या त्या समाजाने अथवा संस्कृतीने लावलेला अन्वयार्थ अभ्यासणारे शास्त्र. चिन्ह किंवा प्रतिक म्हणजे एक खूण असते. ज्याचा अर्थ मनाला पटेल अथवा…

खारकच्छ (Lagoon)

खाजण. समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर समुद्रात तयार झालेले वाळूचे बुटके बांध यांमधील खाऱ्या, उथळ आणि शांत पाण्याची पट्टी किंवा क्षेत्र म्हणजे खारकच्छ होय. वाळू, खडे, चिखल यांनी बनलेला जमिनीच्या…

म्यसा सरोवर (Mjosa Lake)

नॉर्वेतील सर्वांत मोठे आणि चौथ्या क्रमांकाचे खोल सरोवर. नॉर्वेच्या आग्नेय भागात, ऑस्लो या देशाच्या राजधानीपासून उत्तरेस ५६ किमी. वर हे सरोवर आहे. हे लांबट आणि अरुंद आकाराचे सरोवर आहे. सरोवराची…

रेनडिअर सरोवर (Reindeer Lake)

कॅनडाच्या मध्य भागातील एक सरोवर. कॅनडाच्या सस्कॅचेवन आणि मॅनिटोबा या प्रांतांच्या उत्तरेकडील सरहद्दीदरम्यान हे सरोवर विस्तारलेले आहे. हे कॅनडातील नववे, तर सस्कॅचेवन प्रांतातील दुसऱ्याक्रमांकाचे मोठे सरोवर आहे. उत्तर कॅनडाच्या ओसाड…

प्रतिमानाटकम् (Pratinatakam)

प्रतिमानाटकम् : रामायणकथेवर आधारित भासरचित सात अंकी संस्कृत नाटक. भासाने प्रस्तुत नाटकात रामायणाच्या कथानकात किंचित बदल करून स्वप्रतिभेने काही नवीन प्रसंग योजल्याने रामायणातील दुष्ट चित्रण सुष्ट आणि सुष्ट चित्रण निष्कलंक…

ईहामृग (Ihamarag)

ईहामृग : एक रूपकप्रकार. ईहा म्हणजे कृती किंवा वर्तन. ज्यात नायक मृगाप्रमाणे अलभ्य नायिकेची इच्छा करतो ते ईहामृग. याचे उदाहरण संस्कृत वाङ्मयात आढळत नाही. समवकाराप्रमाणेच यातही नायक आणि नायिका दिव्य…

भास्करराय (Bhaskarrai)

भास्करराय : (सु. इ. स. सतरावे ते अठरावे शतक). एक भाष्यकार आणि तंत्रशास्त्रातील श्रीविद्या-संप्रदायाचा अधिकारी व विद्वान. भास्कररायाचा उल्लेख स्वरराय, भास्करानंद, भासुरानंद इ. नावांनीही केला जातो तसेच त्यास ’भास्कररायमखिन्’ असे…

मूलाचार (Mulachara)

मूलाचार : श्री वट्टकेराचार्य या जैन रचनाकारांनी शौरसेनी प्राकृत भाषेत रचलेला बोधप्रद ग्रंथ. १२ विभागात व १२४३ गाथांमध्ये छंदबद्ध असलेला हा काव्यमय ग्रंथ दिगंबर जैन आम्नायातील मुनिगणांसाठी उत्कृष्ट चर्यापालनाकरिता सर्वाधिक…

रघु वीरा (Raghu Vira)

रघु वीरा  : (३० डिसेंबर १९०२- १४ मे १९६३) भारतातील प्रसिद्ध भाषावैज्ञानिक, कोशकार, संशोधक तसेच कुशल राजकारणपटु आणि संसदसदस्य. मुख्य ओळख म्हणजे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने प्रकाशित केलेल्या महाभारताच्या चिकित्सित…

हस्तलिखित नोंदणी (Manuscript Registration)

हस्तलिखित नोंदणी : हस्तलिखित संग्रहात असणाऱ्या प्रत्येक हस्तलिखित ग्रंथाची नोंदणी करणे आवश्यक असते.या नोंदणीचा अभ्यासकास तर उपयोग होतोच पण त्याबरोबर हस्तलिखित संरक्षणासाठी देखील याची मदत होते. त्यासाठी नोंद अधिकाधिक सखोलआणि…

मृच्छकटिकम् (Mrichchakatikam)

मृच्छकटिकम्  : शूद्रकलिखित दहा अंकी संस्कृत प्रकरणनाट्य. या प्रकरणाचे कतृत्त्व विद्वानांनी शूद्रकाला दिले नाही परंतु सर्वसामान्यपणे तोच कर्ता समजला जातो. शूद्रकाच्या व्यक्तीरेखेबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नसली किंवा उपलब्ध माहितीमध्ये विविधता…

बृहद्देवता (Brihaddevta)

बृहद्देवता : वेदांगांव्यतिरिक्त वेदांचे गूढ होत चाललेले विषय उलगडून सांगणाऱ्या काही ग्रंथांपैकी एक महत्त्वाचा संस्कृत ग्रंथ म्हणजे बृहद्देवता. वेदांची सूक्ते जाणून घेताना त्यांचे द्रष्टे ऋषी, त्यांमधे वर्णन केलेली देवता, त्या…

अयनदिन (Solstice)

अयनदिन हे वर्षातील दोन दिवस (प्रत्यक्षातील दोन क्षण) असून या दिवशी सूर्य त्याच्या सर्वांत उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या स्थानी असतो. वर्षातील २१ जून व २२ डिसेंबर या दोन दिवशी अशी स्थिती…