प्रशासकीय न्यायाधीकरणे (Administrative Tribunals)

भारतीय संसदेद्वारा संविधानाच्या कलम ३२३ (अ) च्या अंमलबजावणीसाठी १९८५ मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा पारित करण्यात आला. ज्याचा उद्देश केंद्र, राज्य, अथवा स्थानिक पातळीवरील प्रशासकीय सेवांमध्ये भरती आणि सेवाशर्ती संदर्भात उद्भवणाऱ्या…

जीवशास्त्रीय मानवशास्त्र (Biological Anthropology)

मानव प्राण्याची शारीरिक विविधता, उत्पत्ती, उत्क्रांती, विकास इत्यादींचा सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. यास भौतिकी मानवशास्त्र किंवा जैविक मानवशास्त्र असेही म्हटले जाते. जीवशास्त्रीय मानवशास्त्रामुळे पुरातत्त्वीय मानवशास्त्र या शाखेच्या अभ्यासास साह्य होते.…

नोकरशाही (Bureaucracy)

शासकीय योजना आणि ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची यंत्रणा. तिला सरकारी कर्मचाऱ्यांद्वारा  संचालित शासनप्रणाली असेही म्हटले जाते.नोकरशाही ही संज्ञा Bureau (ब्युरो) या फ्रेंच  शब्दापासून तयार झाली आहे. Bureau…

कार्यकारी प्रमुख (Chief Executive)

संघटनेतील सर्वोच्च अधिकारी आणि तिच्या कार्याची जबाबदारी असणारा व्यक्ती म्हणजे कार्यकारी प्रमुख होय. कार्यकारी प्रमुखाचे संघटनेतील प्रशासकांवर नियंत्रण असते, तो संघटनेच्या आर्थिक व्यवहारांचे नियमन करतो. संघटनेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे,…

सुशासन (Good Governance)

लोकशाही राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देणे म्हणजे सुशासन होय. सुशासनाची संकल्पना भ्रष्टाचाराला संस्थात्मक बंधने आणि कामकाजाच्या बाजार अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार परिभाषित केली गेली आहे. लोकशाहीची बांधिलकी, कार्यक्षम आणि खुले…

कर्णपूरण (Karna Purana)

कर्ण म्हणजे कान व पूरण म्हणजे भरणे. कानात एखादे पातळ औषध किंवा औषधीयुक्त तेल टाकण्याच्या क्रियेला कर्णपूरण म्हणतात. यास कर्णतर्पण असेही म्हणतात. तर्पण म्हणजे तृप्तता. ऐकण्याचे काम योग्य प्रकारे होत…

अनुबिस (Anubis)

प्राचीन ईजिप्तचा एक महत्त्वपूर्ण लोकप्रिय देव. तो प्रामुख्याने मृतांचा देव मानला जात असे. अंत्यसंस्कार व ममी गुंडाळण्याच्या प्रक्रियेशी तो संबंधित असून त्याला ‘अन्पू’ किंवा ‘इनपू’ असेदेखील म्हटले जाते. त्याला श्वानरूपी…

राज्य लोकसेवा आयोग (State Public Service Commission)

राज्यातील प्रशासकीय सेवेत भरती करण्यासाठी आवश्यक त्या परीक्षा घेण्याचे कार्य राज्य लोकसेवा आयोग करतो. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक राज्यासाठी एक लोकसेवा आयोग असतो. मात्र दोन किंवा अधिक राज्यांचे एकमत असल्यास त्या…

राजकीय संसूचन (Political Communication)

राजकीय संपर्क. आधुनिक राजकीय विश्लेषणातील ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. राजकीय व्यवस्था सतत कार्यरत राहण्यासाठी तिच्यातील एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे राजकीय स्वरुपाची माहिती संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे राजकीय संसूचन, विज्ञापन,…

प्रशासकीय नीतीवाद (Administrative Platonism)

प्रशासन व्यवस्थेत काम करणाऱ्यांनी लोकशाहीतील नीतिमूल्यांचे भान ठेवून आपण जनतेचे सेवक आहोत, या भावनेतून प्रशासन करावे व जनतेचे प्रश्न सोडवून प्रशासनाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करावा, या विचारतत्त्वास प्रशासकीय नीतिवाद असे…

प्रशासकीय तटस्थता (Administrative Neutrality)

प्रशासनाची तटस्थता म्हणजे प्रशासनाचा राजकीय नि:पक्षपातीपणा किंवा त्याचे अराजकीय स्वरूप होय. याचा अर्थ असा की, सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी प्रशासकांनी राजकारणापासून अलिप्त राहून नि:पक्षपातीपणे सेवा द्यावी. त्यांनी प्रशासन…

व्यायाम (Physical Exercise)

व्यायाम म्हणजे शरीराची अशी विशिष्ट हालचाल जी केल्यामुळे शरीराचे बल वाढते व सोबतच शरीराचे संतुलन साधले जाते. व्यायामाचे हे लाभ मिळविण्यासाठी व्यायाम योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. आवश्यक प्रमाणात व्यायाम…

पुरीष (Purish / Stool)

पुरीष म्हणजे विष्ठा. शरीरात तयार होणाऱ्या तीन मलांपैकी एक मल म्हणजे पुरीष. खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यावर त्याचे दोन भाग होतात. एक सार भाग व दुसरा किट्ट (असार) भाग. सार भाग…

आसव-अरिष्ट (Asava Arishta)

औषधे दीर्घकाळपर्यंत टिकून राहावीत यासाठी आसव-अरिष्टे तयार केली जातात. ही रोगांनुसार विविध प्रकारच्या वनस्पतींपासून बनवितात. आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक मातीचे स्वच्छ मडके घेऊन त्यात आवश्यक त्या औषधी वनस्पती, पाणी व…

विरेचन (Virechan)

विरेचन हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. विरेचन म्हणजे विशेष प्रकारचे रेचन अर्थात शौचाच्या मार्गाने शरीराची शुद्धी करणे होय. शास्त्रोक्त पद्धतीने घडवून आणलेले जुलाब असे याचे स्वरूप असते.…