परासरण (Osmosis)

एखाद्या द्रावणातील द्रवाचे अर्धपार्य पटलातून अतिसंहत द्रावणाकडे होणारे वहन. परासरण ही प्रक्रिया सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असते. उदा., वनस्पती परासरणाद्वारे जमिनीतील पाणी मुळांमार्फत शोषून घेतात. प्राण्यांमध्ये पेशी आणि शरीरद्रव्ये (पेशीद्रव्य)…

परिग्राम (Ecovillage)

परिसंस्थासमृद्ध वस्ती किंवा पर्यावरणपूरक वस्ती. नैसर्गिक पर्यावरणाला बाधा न आणता आरोग्यदायी मानवी विकास आणि भविष्यातील यशस्वी जीवनास पोषक कार्ये करणाऱ्या लोकसमूहाची वस्ती. सामाजिक, आर्थिक तसेच पारिस्थितिकी दृष्टीने शाश्वतक्षम जीवनाच्या ध्येयाने…

पर्यावरणविज्ञान (Environment science)

पर्यावरणाचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करणारी ज्ञानशाखा. एखाद्या सजीवास परिवेष्टित करणारे सजीव, निर्जीव, रासायनिक आणि भौतिक घटक म्हणजेच त्या सजीवाचे पर्यावरण होय. जैविक व अजैविक घटक मिळून परिसंस्था तयार होते. पर्यावरणविज्ञान…

पर्यावरण व्यवस्थापन (Environment management)

मानवी कृतींमुळे पर्यावरणाची घटलेली गुणवत्ता वाढविणे व पर्यावरणाची स्थिती सुधारणे या ध्येयांसाठी जाणीवपूर्वक केलेली कृती. पर्यावरणाच्या अवनतीमुळे सर्व सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यावरणतज्ज्ञ, अभ्यासक, शासक, प्रशासक, सामाजिक…

पर्यावरण शिक्षण (Environment education)

पर्यावरण व त्यातील घटक, त्यांच्या समस्या इत्यादीविषयी समाजजागृतीसाठीचे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. पर्यावरण शिक्षण या संकल्पनेचा उगम सामाजिक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय गरजांमधून झाला. पर्यावरण अभ्यास या ज्ञानशाखेचा हा नवा उपक्रम…

डायनोसॉर (Dinosaur)

डायनोसॉर म्हणजे विलुप्त झालेले प्रचंड आकाराचे सरडे. त्यांचा समावेश सरीसृप वर्गाच्या डायॉप्सिडा उपवर्गाच्या पुरासरडे (आर्कोसॉरिया) या महागणात केला जातो. २३ कोटी वर्षांपूर्वीपासून ते ६.६ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत मध्यजीव महाकल्पात डायनोसॉर भूचरांचे…

पर्यावरणीय आपत्ती (Environment hazards)

नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे सजीवांना अपायकारक ठरणाऱ्या आणि ठरू शकतील अशा घटना जैविक, रासायनिक, यांत्रिक, पर्यावरणीय अथवा प्राकृतिक कारकांपैकी कोणत्याही कारकामुळे मानव, इतर सजीव अथवा पर्यावरण यास अपायकारक…

पवन ऊर्जा (Wind energy)

भूपृष्ठावरील प्रवाहित हवेची ऊर्जा. भूपृष्ठावरील वाऱ्याच्या गतिज ऊर्जेला पवन ऊर्जा म्हणतात. पवन ऊर्जेचा उपयोग हजारो वर्षांपूर्वीपासून ईजिप्तमध्ये इ. स. पू. २,८०० मध्ये केला गेला, तर इराणमध्ये इ. स. ६०० मध्ये…

पळस (Flame of the forest)

शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. पळस हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ब्युटिया मोनोस्पर्मा आहे. तो मूळचा दक्षिण आशियातील असून पाकिस्तान, भारत, बांगला देश, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया…

पक्षाघात (Paralysis)

शरीरातील एक किंवा अधिक स्नायू कार्य करीत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात. चेतासंस्थेला विशेषकरून व मेरुरज्जूला इजा झाल्यास पक्षाघात होतो. पक्षाघातामुळे स्नायू लुळे व दुबळे होतात. अशा स्थितीत जर…

पक्षी निरीक्षण (Bird Watching)

पक्षी निरीक्षण करणे हा एक छंद आणि मनोरंजनाची कृती आहे. हा छंद सध्याच्या काळात वाढला असून त्यापासून पक्ष्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊन मनुष्याला आनंद मिळू शकतो. पक्षी निरीक्षणातून जीवविज्ञानाच्या सैद्धांतिक आणि…

पक्षी वर्ग (Class aves)

उडणाऱ्या, द्विपाद व पृष्ठवंशी प्राण्यांचा एक वर्ग. शरीरावरील पिसांचे आच्छादन, पंख आणि चोच या लक्षणांवरून पक्षी चटकन ओळखता येतात. जगात सर्वत्र पक्षी आढळतात. त्यांच्या सु. ९,९५६ जाती असून भारतात सु.…

पक्षी स्थलांतर (Bird migration)

काही पक्ष्यांचे दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि ठराविक मुदतीनंतर त्याच मार्गाने पुन्हा ठराविक वेळी मूळ ठिकाणी परत येणे या वर्तणुकीला पक्षी स्थलांतर म्हणतात. शीत प्रदेशात आढळणाऱ्या काही…

पॅरामिशियम (Paramecium)

प्रोटिस्टा सृष्टीच्या आदिजीव संघाच्या सिलिएटा वर्गातील पॅरामिशियम ही सूक्ष्म व एकपेशीय प्रजाती आहे. या प्रजातीच्या जगभर ८–९ जाती आहेत. सामान्यपणे आढळणाऱ्या पॅरामिशियमाची शास्त्रीय नावे पॅरामिशियम कॉडेटम व पॅरामिशियम ऑरेलिया ही…

गांडूळ (Earthworm)

अ‍ॅनेलिडा (वलयी) संघाच्या ऑलिगोकीटा वर्गात गांडुळाचा समावेश होतो. गांडुळाच्या सु. १५० प्रजाती व सु. ३,००० जाती आहेत. भारतात सर्वत्र आढळणार्‍या गांडुळाचे शास्त्रीय नाव फेरेटिमा पोस्थ्यूमा आहे. या गांडुळाचा उपयोग प्राणिशास्त्र प्रयोगशाळेत विच्छेदनासाठी…