ऊती (Tissue)

बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्‍या पेशींचा समूह म्हणजे ऊती. एकपेशीय सजीवांच्या ज्या विविध क्षमता असतात त्या बहुपेशीय सजीवांमध्ये निरनिराळ्या ऊतींद्वारा घडून येतात. ऊतिनिर्मिती प्रक्रिया ही पेशीविभेदनाच्या प्रक्रियेची…

ऊष्माघात (Sun stroke)

शरीरातील उष्णतानियमनाच्या कार्यात बिघाड झाल्यास उद्भवणारी एक स्थिती. उच्च तापमानाच्या सान्निध्यात खूप वेळ राहिल्यास वा शरीरात खूप उष्णता निर्माण झाल्यास अशी स्थिती उद्भवते. शरीराचे तापमान विशिष्ट मर्यादेत राखणारी यंत्रणा काही…

ऊस (Sugarcane; Noblecane)

भारतात तसेच दक्षिण आशियातील इतर देशांत प्राचीन काळापासून लागवडीत असलेली ही सुपरिचित वनस्पती गवताची एक जाती आहे. पोएसी कुलातील ही वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव सॅकॅरम ऑफिसिनॅरम आहे. हिचे मूलस्थान आग्नेय आशिया…

एकदांडी (Coat buttons)

एकदांडी ही ओसाड व बहुधा रुक्ष जागी आढळणारी अ‍ॅस्टरेसी कुलातील एक तणासारखी बहुवर्षायू वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव ट्रायडॅक्स प्रोकम्बेन्स आहे. ही वनस्पती जमिनीवर सरपटत वाढणारी, ३०-६० सेंमी. उंचीची व केसाळ असून…

एड्स (AIDS)

‘ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशयन्सी सिंड्रोम’ या इंग्रजी शब्दांच्या आद्याक्षरांपासून तयार झालेला शब्द. यास ‘उपार्जित प्रतिक्षमता त्रुटिजन्स लक्षणसमूह’ असे म्हणता येईल. एड्स हा ‘ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही)’ म्हणजेच ‘मानवी प्रतिक्षमता त्रुटिजन्य विषाणू’ यापासून…

एरंड (Castoroil-plant)

एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिएसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव रिसिनस कम्युनिस असे आहे. ही मूळची आफ्रिकेतील असून उष्ण प्रदेशातील बहुतेक देशांमध्ये आढळते. भारतात सर्वत्र या वनस्पतीची लागवड केली जाते.…

ओझोन अवक्षय (Ozone depletion)

ओझोन अवक्षय म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणार्‍या ओझोन वायूच्या थरातील त्याचे प्रमाण कमी होणे. ओझोन हे ऑक्सिजन या मूलद्रव्याचे उच्च ऊर्जा असलेले एक बहुरूप आहे. सामान्य ऑक्सिजनामध्ये दोन अणू (O2) असतात,…

औद्योगिक प्रदूषण (Industrial Pollution)

उद्योगांत कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार केला जातो. अशा निर्मिती व प्रक्रिया उद्योगातून मालांची निर्मिती होत असताना काही अपायकारक अपशिष्टे व प्रदूषके बाहेर पडतात. या अपशिष्टे व…

निकेल सिल्व्हर (Nickel Silver)

चांदीसारखा दिसणारा निकेल, तांबे  व जस्त यांचा मिश्रधातू. तांबे  व  निकेल  यांची धातुके  - कच्च्या स्वरूपातील धातू - वितळवून चिनी लोक पाकटाँग  हा  मिश्रधातू तयार करीत असत. मानवाने प्रथम वापरलेल्या…

औषधिविज्ञान (Pharmacology)

औषधांचे सजीवांवर होणार्‍या अपेक्षित परिणामांचे संशोधन, निर्मिती किंवा नवीन औषधे शोधणे यांच्या एकत्रित वैज्ञानिक अभ्यासाला औषधिविज्ञान म्हणतात. औषधिविज्ञानाच्या कक्षेमध्ये औषधाचे गुणधर्म, संरचना, निर्मिती, परिणाम, औषध देण्याची पद्धत, उपचार, दुष्परिणाम आणि…

औषधी वनस्पती (Medicinal plants)

रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणार्‍या वनस्पती. प्राचीन काळापासून मानव वनस्पतींचा वापर आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी करीत आला आहे. वनस्पतींचे औषधी गुणधर्म व उपयोग वैदिक काळात (इ.स.पू.२५०० ते ६५०)…

औषधे (Drugs)

मनुष्य किंवा प्राणी यांच्या रोगांचे निदान करण्यासाठी, रोगांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा रोगांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे पदार्थ. वैद्यकीय व्यवसायातील हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. शारीरिक आणि मानसिक आजार दूर करण्यासाठी किंवा…

क्रेब्ज चक्र (Krebs cycle)

ऑक्सिजीवी सजीवांच्या चयापचय प्रक्रियेतील एक चक्र. या चक्रात श्वसन करणार्‍या (ऑक्सिजीवी) सजीवांच्या पेशींमध्ये विकरांमार्फत क्रमाने जीवरासायनिक क्रिया घडून येतात. यामध्ये पेशींना लागणारी ऊर्जा ATP (अ‍ॅडिनोसीन ट्रायफॉस्फेट) या संयुगाच्या स्वरूपात मोठ्या…

कोहळा (Ash gourd)

कोहळा ही वर्षायू वेल कुकुर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बेनिन्कासा हिस्पिडा असे आहे. ही वनस्पती मूळची जपान व इंडोनेशियातील असून नंतर तिचा प्रसार इतर प्रदेशांत झाले आहे. भारतात पंजाब, पश्चिम बंगाल…

कोलेस्टेरॉल (Cholesterol)

कोलेस्टेरॉल हा प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळणारा एक रासायनिक घटक आहे. तो पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात, मात्र वनस्पतींत अभावानेच आढळतो. जैविक दृष्ट्या महत्त्वाच्या मेदी अल्कोहॉलांच्या (स्टेरॉल) गटातील हा पदार्थ असून याचे वर्गीकरण…