खार (Squirrel)

स्तनी वर्गाच्या कृंतक (कुरतडून खाणार्‍या प्राण्यांच्या) गणातील सायूरिडी कुलातील हा प्राणी आहे. या कुलात दोन उपकुले आहेत. सायूरिनी उपकुलात भूचर आणि झाडावरील खारींचा समावेश होतो; त्यांच्या सु. २२५ जाती आहेत.…

खंड्या (Kingfisher)

अ‍ॅल्सिडीनिडी या पक्षीकुलातील प्रामुख्याने मासे खाणार्‍या हा एक पक्षी आहे. या पक्ष्याच्या जगभर सु. ९० जाती असून त्या बहुतांशी उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत आढळतात. त्यांच्या आकारांत तसेच रंगांत विविधता असते.…

जंत (Ascaris)

गोलकृमी (नेमॅटोडा) संघातील प्राण्यांची एक प्रजाती. जंत परजीवी आहेत. त्यांची एक जाती ॲस्कॅरिस लुंब्रिकॉइडिस  मनुष्याच्या शरीरात असते. त्यांची आणखी एक जाती, ॲस्कॅरिस सुअम डुकराच्या शरीरातील अंत:परजीवी आहे. ते फिकट पिवळसर आणि…

छिद्री संघ (Porifera)

समुद्र व जलाशयाच्या तळावर राहणाऱ्या अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघामध्ये सर्व प्रकारच्या स्पंजांचा समावेश होतो. या प्राण्यांच्या शरीरावर अनेक छिद्रे, रंध्रे किंवा भोके असतात म्हणून त्यांच्या संघाला छिद्री संघ…

चेतासंस्था (Nervous system)

प्राण्यांच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक कृतींमध्ये समन्वय साधणारी आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांना संदेश वाहून नेणारी एक संस्था. बहुतेक बहुपेशीय प्राण्यांमध्ये चेतासंस्था आढळून येते आणि ती कमी-अधिक प्रगत असते. अनेक प्राण्यांमध्ये चेतासंस्थेचे…

चिलट (Grassfly)

डिप्टेरा गणातील क्लोरोपिडी कुलात चिलटांच्या १६० प्रजाती असून त्यांतील सु. २,००० जातींचे वर्गीकरण झाले आहे. हा उपद्रवी कीटक जगभर आढळतो. चिलटांच्या हिप्पेलेट्स व सायपंक्युला या प्रजातींतील कीटकांना आयफ्लाय किंवा आयनॅट…

चित्रबलाक (Painted stork)

पक्षिवर्गातील सिकोनिफॉर्मिस गणातील एक पक्षी. या गणात बलाक, बगळा, करकोचा, आयबिस, दर्वीमुख व रोहित या पक्ष्यांचा समावेश होतो. बलाकांचे क्षत्रबलाक, लहान क्षत्रबलाक, मुग्धबलाक, लोहबलाक, कृष्णबलाक व चित्रबलाक असे प्रकार आहेत.…

घूस (Greater bandicoot rat)

स्तनी वर्गातील कृतक गणाच्या म्युरिडी कुलातील एक उपद्रवी प्राणी. घुशींच्या पाच वेगवेगळ्या जाती आहेत. त्यांच्या लेसर बँडिकूट (लहान) आणि ग्रेटर बँडिकूट (मोठा) अशा दोन जाती भारतात आढळतात. बँडिकूट हा शब्द…

घार (Black kite)

घार हा फॅल्कॉनिफॉर्मिस पक्षिगणातील ॲक्सिपिट्रीडी कुलातील एक पक्षी आहे. गरुड, ससाणा व गिधाडे हे पक्षीही याच कुलातील आहेत. याचे शास्त्रीय नाव मिल्व्हस मायग्रान्स आहे. हा पक्षी भारतात सगळीकडे आढळतो. हिमालयातही…

घरमाशी (Housefly)

संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील एक सर्वपरिचित व उपद्रवी कीटक. घरमाशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या मस्किडी कुलात होतो. तिचे शास्त्रीय नाव मस्का डोमेस्टिका आहे. त्या जगात सर्वत्र आढळतात. भारतात घरमाशीच्या तीन जाती…

गोलकृमी (Roundworm)

प्राणिसृष्टींतील जास्तीत जास्त जैवविविधता असलेल्या संघांपैकी अपृष्ठवंशी प्राण्यांचा नेमॅथेल्मिंथिस हा एक संघ आहे. त्यातील २८,००० हून अधिक जाती ओळखल्या गेल्या आहेत. यांपैकी सु. १६,००० जाती परजीवी आहेत. प्राणिशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या…

गोरिला (Gorilla)

स्तनी वर्गाच्या नरवानर (प्रायमेट्स) गणाच्या पाँजिडी कुलातील एक कपी. या कुलात ओरँगउटान आणि चिंपँझी यांचाही समावेश होतो. गोरिला आणि मानव या दोघांमध्ये साम्य असल्यामुळे त्याला ‘मानवसदृश कपी’ असे म्हणतात. सर्व…

गोम (Centipede)

गोम हा प्राणी संधिपाद (आर्थ्रोपोडा) संघाच्या अयुतपाद (मिरिअ‍ॅपोडा) वर्गातील आहे. जगातील सगळ्या उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत हा आढळतो. बहुतेक गोमा भूचर असून दिवसा जमिनीच्या, दगडधोंड्यांच्या किंवा पालापाचोळ्यांच्या खाली, खडकाच्या भेगांत…

गिनी पिग (Guinea pig)

स्तनी वर्गाच्या कृंतक गणातील व केव्हीइडी कुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव केव्हिया पोरर्सेलस आहे. केव्हिया हा प्रजातिदर्शक पोर्तुगीज शब्द असून याचा अर्थ उंदीर, तर पोरर्सेलस हा जातिदर्शक लॅटिन शब्द असून याचा अर्थ छोटे डुक्कर. हा…

पेशी मृत्यू (Cell Death)

पेशींची जैविक कार्ये थांबण्याच्या घटनेला पेशी मृत्यू म्हणतात. पेशी मृत्यू ही एक नैसर्ग‍िक प्रक्रिया असून पेशी मृत्यू वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. बहुधा जुन्या पेशींची जागा नवीन पेशींनी घेतल्याने, एखाद्या रोगामुळे,…