गोड्डे रामायण (Godde Ramayan)

गोड्डे रामायण : केरळमधील कोची भागात गायले जाणारे कोकणी भाषेतील रामायण. ताडपत्रांवर मल्याळम लिपीत लिहिलेले हे लोकगीतांच्या स्वरूपातील रामायण एर्णाकुलम शहरात सापडले. केरळमधील कोकणी भाषा संस्थेचे प्राध्यापक आर. के. राव…

घुमट (Ghumat)

घुमट : गोवा आणि कोकणातील एक पुरातन स्वरूपाचे अवनध्द वर्गवारीतील लोकवाद्य. याचा आकार मडकीसारखा असतो; परंतु या मातीच्या मडकीची दोन्ही तोंडे उघडी असतात. एका तोंडाचा व्यास १५ ते २० सें.…

खुरीस (Cross)

खुरीस : ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र क्रॉसला गोव्यात खुरीस म्हणतात. खुरीस हे आजच्या काळात ख्रिस्ती धर्माचे प्रतीक मानण्यात येते.  ख्रिस्ती धर्म अस्तित्वात येण्याअगोदरच्या काळात खुरीस वापरात होता. त्याला अपराध्याला शासन देण्याचे…

कोमुनिदाद (Komunidad)

कोमुनिदाद : गोव्यातील स्थानिक ग्रामसंस्थाना कोमुनिदाद या पोर्तुगीज नावाने ओळखतात. या ग्रामसंस्था प्राचीन काळापासून चालत आलेल्या असून त्यांना गांवकारी म्हणत. पोर्तुगीजांची राजवट गोव्यात सोळाव्या शतकाच्या प्रारंभास सुरू झाली. त्यांना या…

दिवजां (Diwajan)

दिवजां : दिवज म्हणजे गोव्यात वापरला जाणारा पाच पणत्यांचा पुंजका.त्याचे अनेकवचन दिवजां. हा पुंजका कालमापनयंत्राच्या आकाराचा असून चार कोपऱ्यावर चार पणत्या व मधोमध उंचावर एक पणती जोडलेली असते. त्यात तेलवात…

फेस्त (Feast)

फेस्त : ख्रिस्ती समाजाच्या चर्चमधून होणारा धार्मिक जत्रोत्सव. फेस्त हा मूळ पोर्तुगीज शब्द. त्याचा अर्थ मेजवानी; परंतु चर्चमधील फेस्त या संकल्पनेमागे मेजवानीबरोबरच धार्मिक सोपस्कार, नृत्य-गायनाच्या आणि मनोरंजनाच्या मैफिली,संतपुरुषांच्या नावाने मिरवणूक…

ताबुल फळे (Tabul Fale)

ताबुल फळे : कोकणच्या लोकजीवनातील खेळावयाचा बैठा खेळ. ताबुल किंवा ताब्ल म्हणजे लाकडी पट्टया. त्यांची लांबी सुमारे २० सें.मी. रुंदी २ सें.मी.आणि जाडी पाऊण सें.मी. असते. या पट्टयांच्या दोन्ही बाजू…

कृष्णभट्ट बांदकर (Krushnbhatta Bandkar)

बांदकर, कृष्णभट्ट : (१८४४ - १९०२). गोव्यातील एक संतकवी. डोंगरी या तिसवाडी तालुक्यातील गावात भिक्षुकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ आणि आईचे नरसाई असे होते. कृष्णभट्ट सव्वा…

वीरभद्र (Virbhadra)

गोव्यात सादर केले जाणारे एक विधीनृत्य. ते साखळी या गावी चैत्र पौर्णिमेला तर फोंडा, केपे, सांगे इत्यादी भागात धालोत्सवाची वा शिगमोत्सवाची सांगता करताना सादर केले जाते. गोव्यावर कदंबांची आणि विजयनगरची…

शिगमो (Shigmo)

होळीच्या दिवसात गोवा आणि कोकणात सादर केला जाणारा एक प्रमुख लोकोत्सव. या उत्सवात  फक्त पुरुष सहभागी होऊन पारंपरिक संगीत,नृत्य,अभिनय आणि हस्तकलांचे आविष्करण घडवितात. मूळ संस्कृत सुग्रीष्मक या शब्दापासून शिगमो या…

सुंवारी (Suwanri)

अतिप्राचीन असा गोमंतकीय लोकसंगीतप्रकार.यात पाच-सहा पुरूषवादक आणि गायक असतात. त्यांची संख्या जास्तही असू शकते. त्यात दोन किंवा तीन घुमटवादक शामेळ वादक, एक कांसाळेवादक,एखादा झांजवादक आणि अन्य गायक कलाकार असतात. हा…

लादाइन्य (Ladaenya)

लॅटिन भाषेतील संक्षिप्त प्रार्थनागीत. त्याला कोकणी भाषेत लातीन असे म्हणतात. पोर्तुगीज राजवटीत पाश्चात्त्य संगीताच्या प्रसारासाठी पॅरीश स्कूलमधून संगीताचे शिक्षण देण्यात येई. चर्चमधील सामूहिक प्रार्थनागीते पाश्चात्त्य संगीतशैलीने गाण्यास सुलभ व्हावे हा…

रणमाले (Ranmale)

गोव्यातील सत्तरी आणि सांगे तालुक्यांत सादर केला जाणारा पारंपरिक लोकनाट्यप्रकार. गोव्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही गावांतूनही हे लोकनाट्य सादर केले जाते. रणमाल्यातील सर्व कलाकार हे पुरूष असून ते…

मुसळांखेळ (Muslakhel)

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला गोव्यातील एक नृत्यप्रकार.या नृत्यात सहभागी होणारे सर्व कलाकार ख्रिस्ती पुरुष असून ते हातात बांबूपासून बनविलेले दीड ते दोन मीटर उंचीचे मुसळ घेऊन नाचतात. या नृत्याच्या वेळी दोन…

मांडो-धुलपद (Mando-Dhulpad)

गोव्यातील ख्रिस्ती लोकांचे कोकणी नृत्यगीत.यात संगीत, काव्य आणि नृत्याचा एकत्रित आविष्कार पाहायला मिळतो. गोव्यात १५१० साली पोर्तुगिजांचे आगमन झाले. त्यानंतर गोव्यात पोर्तुगीज भाषा आणि पाश्चात्त्य संगीत रूजण्यास प्रारंभ झाला. पाश्चात्त्य…