उत्परिवर्तन (Mutation)

सजीवांच्या पेशीत असलेल्या जनुकीय माहितीत घडून आलेला बदल म्हणजेच उत्परिवर्तन. उत्परिवर्तनामुळे जनुकांमध्ये किंवा गुणसूत्रांमध्ये बदल होतो आणि त्यामुळे त्यांच्या विशिष्ट लक्षणांमध्ये बदल घडून येतात. काही उत्परिवर्तनांमुळे डोळ्यांना स्पष्ट जाणवणारे बदल…

आत्मप्रतिरक्षा रोग (Autoimmune disease)

शरीराच्या प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक) प्रणालीमध्ये प्रामुख्याने रक्तातील पांढर्‍या पेशी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. लसिका पेशी (एक प्रकारच्या पांढर्‍या पेशी) व त्यापासून तयार होणारी प्रतिपिंडे शरीरात प्रवेश करणार्‍या जीवाणूंचा नायनाट करतात…

तिरंदाज मासा (Archer fish)

तिरंदाज माशाचा समावेश पर्किफॉर्मीस गणाच्या टॉक्झोटिडी कुलात होत असून सामान्यपणे आढळणाऱ्या माशाचे शास्त्रीय नाव टॉक्झोटिस जॅक्युलॅट्रिक्स आहे. या कुलात टॉक्झोटिस ही एकच प्रजाती असून त्यात सात जातींचे तिरंदाज मासे आहेत.…

तितर (Partridge)

मध्यम आकाराचा कोंबडीसारखा एक पक्षी. तितराचा समावेश कोंबडीच्या फेजिॲनिडी कुलातील फ्रँकोलायनस प्रजातीत होतो. जगभर या प्रजातीच्या सु. ४० जाती असून त्यांपैकी पाच आशियात तर उर्वरित जाती आफ्रिकेत आढळतात. भारतात करडा…

तांबट (Coppersmith barbet)

तांबट हा साधारणपणे चिमणीच्या आकाराचा शेवाळी हिरव्या रंगाचा पक्षी आहे. पिसिफॉर्मिस गणाच्या मेगॅलेमिडी कुलातील हा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव मेगॅलेमा हीमासेफॅला आहे. दक्षिण आशिया आणि दक्षिणपूर्व आशियातील हा निवासी…

जैवविविधता (Biodiversity)

पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता ही एक व्यापक संकल्पना आहे. जैवविविधता तीन स्तरांवर दिसून येते : (१) जनुकीय विविधता, (२) जाती विविधता आणि (३) परिसंस्था विविधता. जनुकीय विविधता…

जुळे (Twins)

गर्भवती स्त्रीच्या एकाच प्रसूतीत एकापाठोपाठ दोन बालके जन्माला येतात, तेव्हा त्यांना जुळे म्हणतात. सामान्यपणे एका गर्भावधीच्या अखेरीस प्रसूती होऊन एक बालक जन्माला येते. परंतु त्याऐवजी दोन बालके जन्माला आल्यास त्यातील…

निवटी (Mudskipper)

एक आगळावेगळा सागरी अस्थिमासा. पर्सिफॉर्मिस गणातील गोबिडी कुलात निवटी (किंवा निवटा) या माशाचा समावेश होतो. जगभर निवटी माशांच्या दहा प्रजाती आढळतात. पेरिऑफ्‌थॅल्मस अर्जेंटिनीलिनिएटस असे शास्त्रीय नाव असलेली जाती बहुधा सर्वत्र…

पक्षी निरीक्षण (Bird Watching)

पक्षी निरीक्षण करणे हा एक छंद आणि मनोरंजनाची कृती आहे. हा छंद सध्याच्या काळात वाढला असून त्यापासून पक्ष्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊन मनुष्याला आनंद मिळू शकतो. पक्षी निरीक्षणातून जीवविज्ञानाच्या सैद्धांतिक आणि…

पक्षी स्थलांतर (Bird migration)

काही पक्ष्यांचे दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि ठराविक मुदतीनंतर त्याच मार्गाने पुन्हा ठराविक वेळी मूळ ठिकाणी परत येणे या वर्तणुकीला पक्षी स्थलांतर म्हणतात. शीत प्रदेशात आढळणाऱ्या काही…

Read more about the article उभयचर वर्ग (Amphibia)
उभयचर वर्गातील काही प्राणी

उभयचर वर्ग (Amphibia)

पृष्ठवंशीय प्राण्यांच्या गटातील एक वर्ग. हे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतात. तसेच यांच्या बाल्यावस्था जलचर असून प्रौढावस्था भूचर असतात. म्हणून यांना उभयचर म्हटले जाते. बेडूक, भेक, सॅलॅमँडर, न्यूट…

कोळी (Spider)

कोळी हा संधिपाद संघातील अ‍ॅरॅक्निडा वर्गाच्या अ‍ॅरेनीइडा या गणात समाविष्ट असलेला आणि रेशमासारखा धागा तयार करणारा एक अष्टपाद प्राणी आहे. जगात कोळ्यांच्या सु. ६०,००० ज्ञात जाती आहेत. प्रामुख्याने हे भूचर…

कल्ले (Gills)

कल्ले (क्लोम) म्हणजे जलचर प्राण्यांच्या श्वसनक्रियेत पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी आणि रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड विसर्जित करण्यासाठी असलेले इंद्रिय. सागरी वलयांकित प्राणी आणि त्याहून अधिक प्रगत प्राणी यांच्यामध्ये ऑक्सिजनाची गरज अधिक…

Read more about the article टिटवी (Lapwing)
टिटवी (व्हॅनेलस इंडिकस)

टिटवी (Lapwing)

सामान्यपणे जमिनीवरच वावरणारा एक उड्डाणक्षम पक्षी. टिटवीचा समावेश कॅरॅड्रीफॉर्मिस गणाच्या कॅरॅड्रीइडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव व्हॅनेलस इंडिकस आहे. या जातीला रक्तमुखी टिटवी असेही म्हणतात. इराक, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान,…

Read more about the article डोडो (Dodo)
डोडो (प्रतिकृती)

डोडो (Dodo)

हवेत उडण्यास असमर्थ व बोजड शरीराचा विलुप्त झालेला एक पक्षी. कोलंबिफॉर्मिस गणातील रॅफिडी कुलात या पक्ष्यांचा समावेश होत असे. रॅफस क्युक्युलेटस, रॅफस सॉलिटेरस आणि पेझोफॅप्स सॉलिटेरिया अशा त्यांच्या तीन जाती…