(प्रस्तावना) पालकसंस्था : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | समन्वयक : उज्ज्वला माटे | विद्याव्यासंगी : प्रीती म. साळुंके
विद्युत व चुंबकत्व या प्रेरणांच्या व्यावहारिक उपयोगांशी निगडित असलेली अभियांत्रिकीची शाखा म्हणजे विद्युत अभियांत्रिकी होय. एखाद्या देशाची औद्योगिक व आर्थिक प्रगती तेथील दरडोई विजेच्या खपावरून मोजली जाते. परिणामी ही अभियांत्रिकीची एक सर्वांत महत्त्वाची शाखा झाली आहे.

वीज ही ऊर्जा दूर अंतरावर व मोठ्या प्रमाणात वाहून नेण्याच्या दृष्टीने सोयीची आहे. ती बहुधा रूपांतरित करून वापरील जाते. विद्युत उर्जेचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतरण (उदा., पिठाची गिरणी, विजेचा पंखा यांसारखी यंत्रोपकरणे फिरवणे), विद्युत उर्जेचे उष्णतेमध्ये रूपांतरण (उदा., पाणी तापविणे, अन्न प्रक्रिया इ.), विद्युत उर्जेचे प्रकाशामध्ये रूपांतरण (उदा., विद्युत दिवे इ.); तसेच या क्रियांशी निगडित संयंत्रे, यंत्रे, उपकरणे (उदा., विद्युत्‌ चालित्र, विद्युत जनित्र इ.) यांचा सैद्धांतिक अभ्यास करून त्यांचे अभिकल्प (आराखडे) तयार करणे; ती तयार करणे व त्यांचे कार्य चालू ठेवणे, त्यांचे नियमन करणे, देखभाल ठेवणे व दुरूस्ती करणे इ. गोष्टींचा या शाखेत अभ्यास केला जातो.

विद्युत उर्जेचीनिर्मिती, मापनपद्धती, वितरणपद्धती; विजेचे उपयोग, तिचे नियमन आणि नियंत्रण; विजेपासून संरक्षण याचाही या शाखेत अंतर्भाव होतो. विद्युत अभियांत्रिकी विषयासंदर्भात तांत्रिक माहिती गणितीय समीकरणाची क्ल‍िष्टता टाळून उपलब्ध करण्याचा प्रयत्न सदर ज्ञानमंडळात केलेला आहे. या शाखेचा विस्तार पाहता वाचकांच्या सोयीकरिता माहितीचे पुढीलप्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे :
१. मूलभूत विद्युत अभियांत्रिकी
२. विद्युत मंडल, जालक, विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र
३. विद्युत यंत्र
४. विद्युत मापनपद्धती
५. विद्युत ऊर्जा निर्मिती
६. विद्युत प्रेषण
७. विद्युत ऊर्जा वितरण आणि संरक्षण
८. शक्ती इलेक्ट्रॉनिकी आणि प्रचोदन/चालन
९. नियंत्रण यंत्रणा
१०. विद्युत अधिष्ठापन आणि संकीर्ण

विद्युत ऊर्जा मापक (Electrical Energy Meters)

विद्युत ऊर्जा मापक (Electrical Energy Meters)

विद्युत ऊर्जेचा शोध एकोणिसाव्या  शतकाच्या अखेरीस लागला. टॉमस आल्वा एडिसन यांनी सन १८७९ साली विजेवर चालणारा दिवा ( Electric bulb) ...
विद्युत ग्रिड (Electrical Grid)

विद्युत ग्रिड (Electrical Grid)

आ. १. विद्युत ग्रिडची मांडणी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई, कोलकाता, पुणे अशा महानगरांचा अपवाद वगळता अन्य शहरांमध्ये, गावांमध्ये विद्युत पुरवठा ...
विद्युत जनित्राचा क्षमता वक्र (Capability curve of Generator)

विद्युत जनित्राचा क्षमता वक्र (Capability curve of Generator)

विद्युत निर्मितीसाठी जल विद्युत, औष्णिक प्रकल्प, आण्विक प्रकल्प, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा इ. प्रामुख्याने योजले जातात. सौर ऊर्जा आणि काही ...
विद्युत तेजोवलय (Corona)

विद्युत तेजोवलय (Corona)

विद्युत तेजोवलय विद्युत शक्तीचे मोठ्या प्रमाणात वहन करण्यासाठी तंत्र-आर्थिक (Techno-Economic) दृष्टिकोनातून  अति  उच्च व्होल्टता  (Extra High Voltage- EHV) किंवा  परोच्च व्होल्टता  ...
विद्युत धुलाई यंत्र (Electric washing machine)

विद्युत धुलाई यंत्र (Electric washing machine)

आ.१. विद्युत धुलाई यंत्र : अंतर्गत रचना दैनंदिन जीवनामध्ये घरोघरी कपडे धुण्यासाठी व सुकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि विजेवरती चालणाऱ्या यंत्राला ...
विद्युत पारेषण व वितरण हानी( Electrical transmission and Distribution loss)

विद्युत पारेषण व वितरण हानी( Electrical transmission and Distribution loss)

विद्युत प्रणालीमध्ये पारेषण-वितरण वाहिन्या, रोहित्रे, उपकरणे, मापक (मीटर), संरक्षण प्रणाली इत्यादी विविध घटकांचा  समावेश होतो. अशा प्रणालीमध्ये पारेषण व वितरण हानी ...
विद्युत वाहिन्यांच्या तारा (Conductors for Electrical lines)

विद्युत वाहिन्यांच्या तारा (Conductors for Electrical lines)

विद्युत प्रणालीमध्ये निर्मिती केंद्रापासून पारेषण व वितरण तारमार्गामार्फत ग्राहकापर्यंत विद्युत पुरवठा केला जातो. पारेषण वाहिनीसाठी मनोरे (Tower) उभारले जातात आणि ...
विद्युत शक्तिचलित वाहने (Electrical vehicles)

विद्युत शक्तिचलित वाहने (Electrical vehicles)

विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांचे प्रामुख्याने विद्युत वाहन आणि संकरित (hybrid) विद्युत वाहन असे दोन प्रकार आहेत. अ) विद्युत वाहन : ...
वि‌द्युत शक्ती प्रकल्पाचे विद्युत दाब नियंत्रण (Voltage control of electrical power system)

वि‌द्युत शक्ती प्रकल्पाचे विद्युत दाब नियंत्रण (Voltage control of electrical power system)

विद्युत् ऊर्जा ही रोहित्रे व तारांचे जाळे इत्यादी घटकांमार्फत ग्राहकांना पुरविली जाते. सर्वच ग्राहकांची अशी अपेक्षा असते की, त्यांना मिळणाऱ्या ...
विद्युत शक्ती प्रणालीचे अर्थशास्त्र (Economies of Electrical Energy Generation, Transmission and Distribution System)

विद्युत शक्ती प्रणालीचे अर्थशास्त्र (Economies of Electrical Energy Generation, Transmission and Distribution System)

विद्युत् ऊर्जा निर्माण करताना व या ऊर्जेचा ग्राहकांना पुरवठा करताना आवश्यक असलेल्या आर्थिक खर्चाचे योग्य प्रकारे नियोजन करणे नेहमीच गरजेचे ...
विद्युत शक्तीवर चालणारे पंप (Electric power Pump)

विद्युत शक्तीवर चालणारे पंप (Electric power Pump)

आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यात पंप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. घरगुती जीवनात पाणी पुरवठ्यापासून औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा तसेच रासायनिक प्रक्रियेसाठी ...
विद्युत सेवा वाहिनी (Electrical energy Distribution system)

विद्युत सेवा वाहिनी (Electrical energy Distribution system)

आ. विद्युत वितरण योजना विद्युत् जनित्रांमध्ये (Generators) विद्युत् ऊर्जा निर्माण केली जाते व तारांच्या जाळ्यांमार्फत ग्राहकांपर्यंत पुरविली जाते. या तारांच्या ...
विद्युत हरात्मकता (Electrical Harmonics)

विद्युत हरात्मकता (Electrical Harmonics)

संगणकाला कॅथोड किरण दोलनदर्शक जोडला असता विद्युत प्रवाहाचे तरंग विरूपित झालेले दिसतात. संगणक बंद करून विद्युत प्रवाहाचे तरंग तपासले असता ...
विद्युत् रोध तापमानांक (Resistance Temperature Coefficient)

विद्युत् रोध तापमानांक (Resistance Temperature Coefficient)

अनेक धातूंच्या मूळ गुणधर्मांनुसार असे आढळून येते की, एखाद्या धातूच्या संवाहकाचे तापमान वाढविले, तर त्या संवाहकाच्या विद्युत् रोधही वाढतो.  हा ...
वीज (ग्राहक अधिकार) नियम २०२० [The Electricity (Rights of Consumers) Rules, 2020]

वीज (ग्राहक अधिकार) नियम २०२० [The Electricity (Rights of Consumers) Rules, 2020]

विद्युत अधिनियम २००३ अस्तित्वात आल्यावर विद्युत निर्मिती, पारेषण, वितरण आणि ग्राहक विषयक तरतुदी या सर्व बाबतीत बराच फरक पडला. दोन-तीन ...
शक्तिगुणक मापक (Power Factor Meter)

शक्तिगुणक मापक (Power Factor Meter)

एककला प्रत्यावर्ती धारा विद्युत मंडलामधील शक्ती (P) खालील पद्धतीने दर्शविली जाते : शक्ती (P)= V I cos Ø  येथे V ...
संकालनदर्शक (Synchroscope)

संकालनदर्शक (Synchroscope)

संकालनदर्शक प्रत्यावर्ती (AC) विद्युत शक्तिप्रणालीमधील (AC electrical power systems) कोणत्याही दोन प्रणाली म्हणजेच जनित्र किंवा विद्युत जालक (generator or power ...
संतुलित व्हीट्स्टन सेतू आणि त्याचा वापर (Balanced Wheatstone's bridge & it's use)

संतुलित व्हीट्स्टन सेतू आणि त्याचा वापर (Balanced Wheatstone’s bridge & it’s use)

मूलत: एकसरीत जोडलेल्या चार संरोधांनी बनलेल्या चौकोनी विद्युत जालाला सेतुमंडल म्हणतात. आ.१ मध्ये दाखविल्याप्रमाणे  सेतुमंडलाची जोडणी केल्यास प्राथमिक व्हीट्स्टन सेतू ...
सम्पनर परीक्षण (Back to back test of transformers)

सम्पनर परीक्षण (Back to back test of transformers)

रोहित्राचे निर्भार परीक्षण व विद्युत मंडल संक्षेप परीक्षण यापेक्षा अधिक चांगले परीक्षण म्हणजे रोहित्राचे बॅक टू बॅक परीक्षण होय. या ...
सिरॅमिकरहित निरोधक (Non-ceramic Insulators)

सिरॅमिकरहित निरोधक (Non-ceramic Insulators)

विद्युत पारेषण आणि वितरण वाहिन्यांसाठी मनोरे (Tower) किंवा खांब उभारले जातात. मनोरे व खांब जमिनीत रोवलेले असल्याने भूविभवाला (Earth potential) ...