(प्रस्तावना) पालकसंस्था : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | समन्वयक : उज्ज्वला माटे | विद्याव्यासंगी : प्रीती म. साळुंके
विद्युत व चुंबकत्व या प्रेरणांच्या व्यावहारिक उपयोगांशी निगडित असलेली अभियांत्रिकीची शाखा म्हणजे विद्युत अभियांत्रिकी होय. एखाद्या देशाची औद्योगिक व आर्थिक प्रगती तेथील दरडोई विजेच्या खपावरून मोजली जाते. परिणामी ही अभियांत्रिकीची एक सर्वांत महत्त्वाची शाखा झाली आहे.

वीज ही ऊर्जा दूर अंतरावर व मोठ्या प्रमाणात वाहून नेण्याच्या दृष्टीने सोयीची आहे. ती बहुधा रूपांतरित करून वापरील जाते. विद्युत उर्जेचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतरण (उदा., पिठाची गिरणी, विजेचा पंखा यांसारखी यंत्रोपकरणे फिरवणे), विद्युत उर्जेचे उष्णतेमध्ये रूपांतरण (उदा., पाणी तापविणे, अन्न प्रक्रिया इ.), विद्युत उर्जेचे प्रकाशामध्ये रूपांतरण (उदा., विद्युत दिवे इ.); तसेच या क्रियांशी निगडित संयंत्रे, यंत्रे, उपकरणे (उदा., विद्युत्‌ चालित्र, विद्युत जनित्र इ.) यांचा सैद्धांतिक अभ्यास करून त्यांचे अभिकल्प (आराखडे) तयार करणे; ती तयार करणे व त्यांचे कार्य चालू ठेवणे, त्यांचे नियमन करणे, देखभाल ठेवणे व दुरूस्ती करणे इ. गोष्टींचा या शाखेत अभ्यास केला जातो.

विद्युत उर्जेचीनिर्मिती, मापनपद्धती, वितरणपद्धती; विजेचे उपयोग, तिचे नियमन आणि नियंत्रण; विजेपासून संरक्षण याचाही या शाखेत अंतर्भाव होतो. विद्युत अभियांत्रिकी विषयासंदर्भात तांत्रिक माहिती गणितीय समीकरणाची क्ल‍िष्टता टाळून उपलब्ध करण्याचा प्रयत्न सदर ज्ञानमंडळात केलेला आहे. या शाखेचा विस्तार पाहता वाचकांच्या सोयीकरिता माहितीचे पुढीलप्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे :
१. मूलभूत विद्युत अभियांत्रिकी
२. विद्युत मंडल, जालक, विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र
३. विद्युत यंत्र
४. विद्युत मापनपद्धती
५. विद्युत ऊर्जा निर्मिती
६. विद्युत प्रेषण
७. विद्युत ऊर्जा वितरण आणि संरक्षण
८. शक्ती इलेक्ट्रॉनिकी आणि प्रचोदन/चालन
९. नियंत्रण यंत्रणा
१०. विद्युत अधिष्ठापन आणि संकीर्ण

पारेषण वाहिनीचे स्वयं पुनर्योजन (Auto Reclosing of Transmission lines)

पारेषण वाहिनीचे स्वयं पुनर्योजन (Auto Reclosing of Transmission lines)

विद्युत शक्तीचे मोठ्या प्रमाणात वहन पारेषण वाहिन्यांमार्फत केले जाते. प्रत्येक वाहिनीवर नियंत्रण व रक्षण फलक (Control  & Protection Panel) बसवून ...
प्रकाशकीय तंतू (Optical fibre)

प्रकाशकीय तंतू (Optical fibre)

आ. १. प्रकाशकीय तंतू तंतु-प्रकाशकी : जॉन टिंडल या भौतिकीविदांनी १८७० साली संपूर्ण अंतर्गत परावर्तनाचा उपयोग करून काचेच्या वक्र दंडामधून ...
प्रतिक्रिय शक्ती (Reactive Power)

प्रतिक्रिय शक्ती (Reactive Power)

प्रत्यावर्ती धारा प्रणालीत बहुतेक सर्व उपकरणांना कार्य करण्यासाठी सक्रिय शक्तीबरोबरच प्रतिक्रिय शक्तीची आवश्यकता असते. उदा., रोहित्राचा विचार केल्यास त्याच्या कार्यासाठी ...
प्रत्यक्ष भार जोडणीने रोहित्र परीक्षण (TESTING OF TRANSFORMERS BY DIRECT LOADING)

प्रत्यक्ष भार जोडणीने रोहित्र परीक्षण (TESTING OF TRANSFORMERS BY DIRECT LOADING)

रोहित्राची कार्यक्षमता, त्याचे विद्युत् दाबनियमन आणि भारित अवस्थेत रोहित्राच्या निरनिराळ्या भागात होणारी तपमानवाढ तपासण्यासाठी रोहित्राला खराखुरा भार जोडून केलेल्या परीक्षणामुळे ...
प्रत्यावर्ती धारा विद्युत उपकेंद्र : भूसंपर्कन प्रणालीचे संकल्पन  (Design of Earthing system of A.C. Sub-station)

प्रत्यावर्ती धारा विद्युत उपकेंद्र : भूसंपर्कन प्रणालीचे संकल्पन (Design of Earthing system of A.C. Sub-station)

विद्युत उपकेंद्रात अनेक उपकरणे असतात आणि ती हाताळणाऱ्या प्रचालकांना (Operator) त्या आवारात वेळ पडेल तेव्हा संचार करावा लागतो. या दोहोंच्या ...
प्रेषणमार्गांची कार्यप्रभावितता (Transmission Line Performance)

प्रेषणमार्गांची कार्यप्रभावितता (Transmission Line Performance)

प्रेषणमार्गांची कार्यपद्धती योग्य रीतीने चालू आहे का हे ठरविण्यासाठी दोन निकष आहेत : (अ) कार्यक्षमता ( efficiency) आणि (ब) विद्युत् ...
प्रेषणमार्गांचे प्रकार (Transmission Line Models)

प्रेषणमार्गांचे प्रकार (Transmission Line Models)

विद्युत् उत्पादक केंद्रापासून जनित्राने निर्माण केलेली विद्युत् शक्ती विद्युत् ग्रहण केंद्राकडे नेणाऱ्या विद्युत् दाबाच्या मार्गाला प्रेषणमार्ग म्हणतात. साधारणपणे ही त्रिकला ...
प्रेषणमार्गाचे स्थिरांक (Transmission Line Constants)

प्रेषणमार्गाचे स्थिरांक (Transmission Line Constants)

प्रेषणमार्ग जेथून सुरू होतो तेथे विद्युत् उत्पादक केंद्र (वि. उ.) असते. तेथे जनित्र व रोहित्र असते. जेथे प्रेषणमार्ग संपतो तेथे ...
फॅक्ट (Flexible AC Transmission)

फॅक्ट (Flexible AC Transmission)

सद्यकालीन विद्युत यंत्रणेत (ग्रिड) विद्युत निर्मिती केंद्रे, उपकेंद्रे परस्परांना उच्च व्होल्टता पारेषण वाहिन्यांनी जोडलेली असतात. तंत्र-आर्थिक (Techno-Economic) दृष्टिकोनातून  ही  बाब ...
फ्रेडरिक एमन्स टर्मन (Frederick Emmons Terman)

फ्रेडरिक एमन्स टर्मन (Frederick Emmons Terman)

टर्मन, फ्रेडरिक एमन्स : (७ जून १९००–१९ डिसेंबर १९८२). अमेरिकन अभियंते व शिक्षणतज्ज्ञ. इलेक्ट्रॉनिकी व शिक्षण क्षेत्र यांमध्ये बजाविलेल्या कामगिरीबद्दल ...
भार प्रेषण केंद्र  (Load Dispatch Center)

भार प्रेषण केंद्र (Load Dispatch Center)

देशाचा आर्थिक विकास व तंत्रज्ञानाची प्रगती होण्यासाठी विद्युत शक्तीचा अखंड पुरवठा ही महत्त्वाची गरज आहे. विविध क्षेत्रातील औद्योगिक कारखाने, शेतीसाठी ...
भारतीय कृत्रिम उपग्रह

भारतीय कृत्रिम उपग्रह

भारत सरकारची बंगळुरू येथे मुख्यालय असलेली भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO; इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) कृत्रिम उपग्रहासंदर्भात कार्य ...
भूपरिक्षित्र (Earth tester)

भूपरिक्षित्र (Earth tester)

भूयोजनाचा (earthing) रोध मोजण्यासाठी भूपरिक्षित्राचा (earth tester) उपयोग करतात. भूयोजनाचा रोध मर्यादित आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी भूपरिक्षित्र वापरतात. भूपरिक्षित्राचे ...
मानवी शरीर आणि विद्युत धारा (Human body & Electric current)

मानवी शरीर आणि विद्युत धारा (Human body & Electric current)

दूरदर्शन संच, संगणक, विद्युत धुलाई यंत्र, घरगुती प्रेक्षागृह (Home theatre) इत्यादी विविध गृहोपयोगी उपकरणांना मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे ...
मेसर : उपकरणात्मक तंत्रविज्ञान (MASER)

मेसर : उपकरणात्मक तंत्रविज्ञान (MASER)

मेसर हे रेडिओ आणि सूक्ष्मतरंग कंप्रता पट्ट्यांमध्ये (Frequency bands); १००० मेगाहर्टझ् ते १०० गिगाहर्टझ् म्हणजे ०.३ ते ३० सेंमी. तरंगलांबीदरम्यान; ...
मॉस्फेट (MOSFET)

मॉस्फेट (MOSFET)

मॉस्फेट म्हणजेच धातवीय ऑक्साइड अर्धसंवाहक क्षेत्र-परिणामकारक ट्रँझिस्टर (Metal oxide Semiconductor field-effect transistor, MOS transistor) होय. आ. १. मॉस्फेट : चिन्ह ...
यांत्रिक अनुनाद वारंवारता मापक (MECHANICAL RESONANCE FREQUENCY METER)

यांत्रिक अनुनाद वारंवारता मापक (MECHANICAL RESONANCE FREQUENCY METER)

आपण विद्युत पुरवठ्याची (Electric supply) वारंवारता मोजण्यासाठी विविध प्रकारच्या वारंवारता मापकांचा उपयोग करतो. विद्युत पुरवठ्याच्या वारंवारतेनुसार [Frquency (f)] मापकाची मोजण्यासाठी ...
रेषा मार्गक्रमण करणारा रोबॉट (Line Following  Robot)

रेषा मार्गक्रमण करणारा रोबॉट (Line Following Robot)

आ. १. रोबॉट प्रतिकृती हा एक स्वयंचलित रोबॉट असून तो  नावाप्रमाणे पांढऱ्या पृष्ठभागावरील काळ्या रेषेच्या अथवा काळ्या पृष्ठभागावरील पांढऱ्या रेषेचा ...
रोहित्राचे निर्भार आणि मंडल संक्षेप (किंवा लघु परिपथन) परीक्षण [Open circuit-no load & short circuit Test]

रोहित्राचे निर्भार आणि मंडल संक्षेप (किंवा लघु परिपथन) परीक्षण [Open circuit-no load & short circuit Test]

समपरिणामी रोहित्र : यामध्ये प्रत्यक्ष रोहित्र हे जणू एक आदर्श रोहित्र आणि एक ’समपरिणामी विद्युत्  संरोध’  यांचे मिळून तयार झाले आहे असे ...
रोहित्राचे विद्युत् दाबनियमन  (Voltage regulation of transformer)

रोहित्राचे विद्युत् दाबनियमन (Voltage regulation of transformer)

रोहित्राच्या प्राथमिक वेटोळ्यास पुरविलेला विद्युत् दाब स्थिर असताना व्दितीयक वेटोळ्याकडून निर्भार (no load) स्थितीत दिला जाणारा विद्युत् दाब (E2) व ...
Loading...