(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

उषा मेहता (Usha Mehata)

उषा मेहता

मेहता, उषा : (२५ मार्च १९२०–११ ऑगस्ट २०००). छोडो भारत आंदोलनातील सक्रिय स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांचा जन्म गुजरातमधील ...
एडवर्ड ऑगस्टस फ्रीमन (Edward Augustus Freeman)

एडवर्ड ऑगस्टस फ्रीमन

फ्रीमन, एडवर्ड ऑगस्टस : (२ ऑगस्ट १८२३ – १६ मार्च १८९२). प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. इंग्लंडमधील हारबोर्न (स्टॅफर्डशर) येथे जन्म. खासगी ...
एडवर्ड गिबन (Edward Gibbon)

एडवर्ड गिबन

गिबन, एडवर्ड : (२७ एप्रिल १७३७ — १६ जानेवारी १७९४). प्रसिद्ध इंग्लिश इतिहासकार. जन्म पट्‌नी (सरे) येथे एका सुखवस्तू कुटुंबात ...
एडवर्ड हाइड क्लॅरंडन (Edward Hyde, 1st Earl of Clarendon)

एडवर्ड हाइड क्लॅरंडन

क्लॅरंडन, एडवर्ड हाइड : (१८ फ्रेब्रुवारी १६०९–९ डिसेंबर १६७४). एक ब्रिटिश मुत्सद्दी व इतिहासकार. विल्टशरमधील जमीनदार घराण्यात जन्म. कायद्याचे शिक्षण घेऊन त्याने ...
एदुआर्त बेनेश (Edvard Benes)

एदुआर्त बेनेश

बेनेश, एदुआर्त : (२८ मे १८८४ — ३ संप्टेबर १९४८). चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताकाचा एक संस्थापक. बोहेमियातील कॉझलानी ह्या खेड्यात सधन शेतकरी ...
एमन डी व्हॅलेरा (Eamon de Valera)

एमन डी व्हॅलेरा

डी व्हॅलेरा, एमन : (१४ ऑक्टोबर १८८२ – २९ ऑगस्ट १९७५). आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक नेता, आयरिश प्रजासत्ताकाचा पंतप्रधान व अध्यक्ष ...
एरिक हॉब्सबॉम (Eric John Ernest Hobsbawm)

एरिक हॉब्सबॉम

हॉब्सबॉम, एरिक : (९ जून १९१७ – १ ऑक्टोबर २०१२) सुप्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार आणि मार्क्सवादी विचारवंत. त्यांचा जन्म लिओपोल्ड पर्सी ...
एलिझाबेथ, दुसरी (Elizabeth II)

एलिझाबेथ, दुसरी

एलिझाबेथ, दुसरी : (२१ एप्रिल १९२६ ­­­). इंग्‍लंड व उत्तर आयर्लंड यांची सध्याची राणी. हिचा जन्म लंडन येथे झाला. सहाव्या जॉर्जची ...
एल्फिन्स्टन कायदेसंहिता (बॉम्बे कोड ऑफ रेग्युलेशन-१८२७) (Bombay Regulation Act 1827)

एल्फिन्स्टन कायदेसंहिता

ब्रिटिश भारतात तयार झालेली दिवाणी कायद्याची एक समग्र संहिता. हिचे श्रेय मुंबई प्रांताचा तत्कालीन गव्हर्नर, मुत्सद्दी मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन (६ ...
ऑटो फोन बिस्मार्क (Otto von Bismarck)

ऑटो फोन बिस्मार्क

बिस्मार्क, ऑटो फोन : (१ एप्रिल १८१५ – ३० जुलै १८९८). जर्मन साम्राज्याचा जनक आणि जर्मनीचा पहिला चॅन्सेलर. याचा जन्म ...
ऑनॉरे गाब्रीएल रीकेती काँत द मीराबो (Mirabeau)

ऑनॉरे गाब्रीएल रीकेती काँत द मीराबो

मीराबो, ऑनॉरे गाब्रीएल रीकेती काँत द : (९ मार्च १७४९ – २ एप्रिल १७९१). फ्रेंच राज्यक्रांतिकालातील एक प्रभावी वक्ता आणि मुत्सद्दी ...
ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन (शेकाफे) (All India Scheduled Castes Federation)

ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन

एक देशव्यापी राजकीय पक्ष. भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी या पक्षाची स्थापना १७ ते २० जुलै १९४२ च्या नागपूर ...
ऑलिव्हर क्रॉमवेल (Cromwell, Oliver)

ऑलिव्हर क्रॉमवेल

क्रॉमवेल, ऑलिव्हर : (२५ एप्रिल १५९९ – ३ सप्टेंबर १६५८). पहिल्या चार्ल्‍सच्या वेळचा इंग्लंडच्या यादवी युद्धातील पार्लमेंट पक्षाचा एक सेनाप्रमुख. इंग्लंड, ...
ऑस्ट्रियन वारसा युद्ध (War of the Austrian Succession)

ऑस्ट्रियन वारसा युद्ध

ऑस्ट्रियन वारसाहक्क युद्धाचा एक प्रसंग दर्शविणारे फ्रेंच चित्रकार प्येअर ला फाँ याचे तैलचित्र. ऑस्ट्रियातील हॅप्सबर्ग गादीच्या वारसासाठी झालेले युद्ध (१७४०–१७४८) ...
कपुरथळा संस्थान  (Kapurthala State)

कपुरथळा संस्थान 

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्व पंजाबमधील एक संस्थान. त्याची लोकसंख्या ३,७८,३८० (१९५१) होती आणि त्याचे क्षेत्रफळ १,६८४ चौ. किमी. असून ब्रिटिश अंमलात ...
कर्नल जेम्स टॉड (James Tod)

कर्नल जेम्स टॉड

टॉड, कर्नल जेम्स : (२० मार्च १७८२–१७ नोव्हेंबर १८३५). राजपुतांच्या इतिहासाचा आद्य संशोधक व लेखक. इंग्लंडमधील इझ्लिंगटन येथे जन्म. १७९८ ...
काकोरी कट (Kakori conspiracy)

काकोरी कट

ब्रिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट. यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ ...
कामील्लो बेन्सो दी काव्हूर    (Camillo Benso, Count of Cavour)

कामील्लो बेन्सो दी काव्हूर   

काव्हूर, कामील्लो बेन्सो दी : (१० ऑगस्ट १८१० — ६ जून १८६१).  इटालियन राष्ट्रभक्त व मुत्सद्‌दी. पीडमॉटच्या एका सरदार घराण्यात ...
कुका आंदोलन (नामधारी चळवळ) (Kuka Movement)

कुका आंदोलन

पंजाब प्रांतातील एक प्रसिद्ध चळवळ. या आंदोलनास कुका चळवळ, नामधारी चळवळ, नामधारी शीख आंदोलन या नावांनीही संबोधले जाते. १९ व्या ...
कृष्णाबाई केळवकर (Krishnabai Kelvakar)

कृष्णाबाई केळवकर

केळवकर, कृष्णाबाई : (२६ एप्रिल १८७९ -२ सप्टेंबर १९६१) : कोल्हापूर संस्थानमधील पहिल्या स्त्री-वैद्य (डॉक्टर). त्यांचा जन्म अलिबाग येथे झाला ...