(प्रस्तावना) पालकसंस्था : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर | समन्वयक : अवनीश पाटील | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

अक्कलकोट संस्थान (Akkalkot State)

अक्कलकोट संस्थान (Akkalkot State)

ब्रिटिश अंमलाखालील भारतातील सु. ५०० चौ. किमी. क्षेत्राचे एक मांडलिक संस्थान. अक्कलकोट संस्थान सोलापूर जिल्ह्यात सोलापूरच्या आग्नेयीस होते. हे संस्थान दुय्यम ...
अठराशे सत्तावन्नचा उठाव (Indian Rebellion of 1857) 

अठराशे सत्तावन्नचा उठाव (Indian Rebellion of 1857) 

भारतीयांनी १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. १८५७ च्या उठावामागे ...
अँड्रू जॉन्सन (Andrew Johnson)

अँड्रू जॉन्सन (Andrew Johnson)

जॉन्सन, अँड्रू : (२९ डिसेंबर १८०८–३१ जुलै १८७५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सतरावे राष्ट्राध्यक्ष व प्रसिद्ध मुत्सद्दी राजकारणी. सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम ...
अंधारकोठडी, कलकत्त्याची (Black Hole of Culcutta) 

अंधारकोठडी, कलकत्त्याची (Black Hole of Culcutta) 

ब्लॅक होल स्मारक, कोलकाता. कलकत्ता (विद्यमान कोलकाता) येथील फोर्ट विल्यम किल्ल्यातील कैद्यांना ठेवण्याची एक खोली. १७५६ मधील एका घटनेमुळे ती ...
अफांसो द अल्बुकर्क (Afanso de Albuquerque)

अफांसो द अल्बुकर्क (Afanso de Albuquerque)

अल्बुकर्क, अफांसो द (?-१४५३—१५ डिसेंबर १५१५). भारतातील पोर्तुगीज अंमलाखालील प्रदेशाचा दुसरा गव्हर्नर. पूर्वेकडे साम्राज्य स्थापण्याच्या आकांक्षेने १५०९ मध्ये हा भारतात आला. ...
अफूची युद्धे (Opium Wars)

अफूची युद्धे (Opium Wars)

एकोणिसाव्या शतकात इंग्लंड व चीन यांच्यामध्ये झालेली दोन युद्धे. अफूच्या व्यापारावरील चिनी निर्बंध हे या युद्धांचे तात्कालिक कारण असल्यामुळे यांना अफूची ...
अब्राहम लिंकन (Abraham Lincoln)

अब्राहम लिंकन (Abraham Lincoln)

लिंकन, अब्राहम :  (१२ फेब्रुवारी १८०९ — १५ एप्रिल १८६५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष. जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात ...
अमानुल्ला खान (Amanulla Khan)

अमानुल्ला खान (Amanulla Khan)

अमानुल्ला, अमीर : (१ जून १८९२ –२५ एप्रिल १९६०). अफगाणिस्तानचा  १९१९–२९ या काळातील अमीर. देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याने ...
अमृत कौर (Amrit Kaur)

अमृत कौर (Amrit Kaur)

राजकुमारी अमृत कौर : (२ फेब्रुवारी १८८९ – ६ फेब्रुवारी १९६४). प्रसिद्ध गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या व भारताच्या पहिल्या कॅबिनेट ...
अमेरिकेचे यादवी युद्ध (American Civil War)

अमेरिकेचे यादवी युद्ध (American Civil War)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दक्षिणेकडील घटक राज्ये व उत्तरेकडील घटक राज्ये यांच्यातील परस्परविरोधी हितसंबंधांतून उद्‌भवलेले १८६१–६५च्या दरम्यानचे यादवी युद्ध. ‘यादवी युद्ध’ ...
अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध (American Revolution)

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध (American Revolution)

उत्तर अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्घ १७७५ पासून १७८३ पर्यंत केलेले यशस्वी बंड. त्याला ‘स्वातंत्र्ययुद्धʼ किंवा ‘अमेरिकन क्रांतीʼ म्हणतात. सतरावे ...
अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा (United States Declaration of Independence)

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा (United States Declaration of Independence)

उत्तर अमेरिका खंडातील ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर आपले ध्येय व उद्दिष्ट जगाला समजावे आणि स्वतंत्र राष्ट्रांचे आपल्याला साहाय्य मिळावे, ...
अरुणा असफ अली (Aruna Asaf Ali)

अरुणा असफ अली (Aruna Asaf Ali)

अरुणा असफ अली : ( १६ जुलै १९०९ — २९ जुलै १९९६). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी महिला, छोडो भारत आंदोलनातील वीरांगना ...
अलवर संस्थान (Alwar State)

अलवर संस्थान (Alwar State)

ब्रिटिश अंमलाखालील सु. ८,००० चौ.किमी. क्षेत्राचे एक मांडलिक संस्थान. ह्या संस्थानचे क्षेत्र आजच्या राजस्थान राज्यातील जयपूर जिल्ह्याच्या ईशान्येस व भरतपूरच्या ...
अलेक्झांडर किन्‍लोक फॉर्ब्झ (Alexander Kinloch Forbes)

अलेक्झांडर किन्‍लोक फॉर्ब्झ (Alexander Kinloch Forbes)

फॉर्ब्झ, अलेक्झांडर किन्‍लोक : (७ जुलै १८२१ – ३१ ऑगस्ट १८६५). भारताविषयी विशेषतः गुजरातविषयी लिहिणारे एक ब्रिटिश इतिहासकार. जन्म लंडन ...
अल् महदी (मुहम्मद अहमद) (Al-Mahadi) (Muhammad Ahmad)

अल् महदी (मुहम्मद अहमद) (Al-Mahadi) (Muhammad Ahmad)

महदी, अल् : (१२ ऑगस्ट १८४४ – २२ जून १८८५). आधुनिक सूदानचा शिल्पकार व महदी क्रांतीचा सूत्रधार. त्याचे पूर्ण नाव ...
अल्लुरी सीताराम राजू (Alluri Sitarama Raju)

अल्लुरी सीताराम राजू (Alluri Sitarama Raju)

अल्लुरी सीताराम राजू : (४ जुलै १८९७ – ७ मे १९२४). भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक क्रांतिकारक. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील ...
आण्णासाहेब बाबाजी लठ्ठे (Annasaheb Babaji Latthe)

आण्णासाहेब बाबाजी लठ्ठे (Annasaheb Babaji Latthe)

लठ्ठे, आण्णासाहेब बाबाजी : (९ डिसेंबर १८७८ — १६ मे १९५०). कोल्हापूर संस्थानचे दिवाण व मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री. त्यांचा ...
आंतॉनियू बेर्नाद द ब्रागांस पेरैरा (Antonio Pereira)

आंतॉनियू बेर्नाद द ब्रागांस पेरैरा (Antonio Pereira)

पेरैरा, आंतॉनियू : (९ मे १८८३–१६ मार्च १९५५). विख्यात कायदेतज्ज्ञ व इतिहास संशोधक. ए. बी. द. ब्रागांस परैरा म्हणूनही परिचित ...
आप्पासाहेब पवार (Appasaheb Pawar)

आप्पासाहेब पवार (Appasaheb Pawar)

पवार, आप्पासाहेब गणपतराव : (५ मे १९०६ –३० डिसेंबर १९८१). महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ज्ञ, मुरब्बी प्रशासक, मराठ्यांच्या इतिहासाचे ख्यातकीर्त संशोधक आणि ...