(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

कॅप्टन लक्ष्मी सहगल (Captain Lakshmi Sahgal)

कॅप्टन लक्ष्मी सहगल

सेहगल, लक्ष्मी : (२४ ऑक्टोबर १९१४–२३ जुलै २०१२). भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद ...
केमाल आतातुर्क (Mustafa Kemal Ataturk)

केमाल आतातुर्क

केमाल आतातुर्क : (१२ मार्च १८८१–१० नोव्हेंबर १९३८). तुर्कस्तान प्रजासत्ताकाचा संस्थापक आणि पहिला अध्यक्ष. गाझी मुस्ताफा पाशा हे त्याचे मूळ ...
कैसर विल्यम, दुसरा (Wilhelm II, German Emperor)

कैसर विल्यम, दुसरा

कैसर विल्यम, दुसरा : (२७ जानेवारी १८५९–४ जून १९४१). जर्मनीचा अखेरचा सम्राट व होहेंझॉलर्न घराण्यातील शेवटचा प्रशियाचा राजा. तिसरा फ्रीड्रिख ...
कोरियन युद्ध (Korean War)

कोरियन युद्ध

उत्तर व दक्षिण कोरिया ह्यांमध्ये १९५०–५३ च्या दरम्यान झालेला संघर्ष. हा संघर्ष मुख्यत्वे कम्युनिस्ट आणि कम्युनिस्टविरोधी विचारसरणीतून उद्‍भवला. ह्या युद्धाची ...
क्यूबाची क्रांति (Cuban Revolution)

क्यूबाची क्रांति 

दुसऱ्या महायुद्धानंतर क्यूबात घडलेली महत्त्वाची क्रांती. ३१ डिसेंबर १९५८ रोजी क्यूबाचे त्यावेळचे हुकूमशहा बातीस्ता यांनी देशांतर केले, बातीस्ता राजवट कोसळून ...
क्रिमियाचे युद्ध (Crimean War)

क्रिमियाचे युद्ध

मध्यपूर्वेतील प्रश्नांवर क्रिमिया ह्या ठिकाणी रशियाविरुद्ध ब्रिटन, फ्रान्स, सार्डिनिया आणि तुर्कस्तान ह्यांमध्ये झालेले युद्ध (१८५४–५६). ऑस्ट्रिया ह्यावेळी तटस्थ होता, तरी ...
क्लेमेन्स व्हेंट्‌सल मेटरनिख (Klemens Wenzel von Metternich)

क्लेमेन्स व्हेंट्‌सल मेटरनिख

मेटरनिख, क्लेमेन्स व्हेंट्‌सल : (१५ मे १७७३ — ११ जून १८५९). ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर (१८०९–४८) व प्रसिद्ध यूरोपीय मुत्सद्दी. त्याचा जन्म ...
खेडा सत्याग्रह (Kheda Satyagrah)

खेडा सत्याग्रह

भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील खेडा जिल्ह्यातील (Gujrat) शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन. ⇨ महात्मा गांधी (२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८) आणि ...
गिलॉटीन  (शिरच्छेद यंत्र) (Guillotine)

गिलॉटीन

गिलॉटीन : (शिरच्छेद यंत्र). अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील शिक्षा करण्याचे एक परिमाण. या यंत्रामुळे रक्तरंजित व भयभीत करणाऱ्या सार्वजनिक देहदंडाचा प्रघात ...
गौरीशंकर हीराचंद ओझा (Gaurishankar Hirachand Ojha)

गौरीशंकर हीराचंद ओझा

ओझा, गौरीशंकर हीराचंद : (१८६३—१९४०). एक भारतीय इतिहाससंशोधक व लेखक. राजस्थानातील पूर्वीच्या सिरोही संस्थानातील रोहेडा गावी जन्म. प्राथमिक शिक्षणानंतरचे त्यांचे ...
ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच  रस्पूट्यिन (Grigori Rasputin)

ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच  रस्पूट्यिन

रस्पूट्यिन, ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच  :  (२२ जानेवारी १८६९ — ३० डिसेंबर १९१६). रशियन लब्धप्रतिष्ठित साधू व झार राजदंपतीचा घनिष्ठ मित्र. त्याचे ...
चँग-कै-शेक (Chiang Kai-Shek)

चँग-कै-शेक

चँग-कै-शेक : (३० ऑक्टोबर १८८७ – ५ एप्रिल १९७५). एक ज्येष्ठ चिनी क्रांतिकारक व तैवानचा माजी अध्यक्ष. आधुनिक चीनचा शिल्पकार ...
चंपारण्य सत्याग्रह (Champaran Satyagraha)

चंपारण्य सत्याग्रह

भारतातील चंपारण्य (बिहार) भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा गांधी यांनी केलेला यशस्वी सत्याग्रह. या सत्याग्रहापासून महात्मा गांधींच्या सत्याग्रह या तत्त्वज्ञानाची, ...
चाफेकर बंधू (Chaphekar Brothers)

चाफेकर बंधू

चाफेकर बंधू : प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव अशी त्यांची नावे. त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत चाफेकर. ते कीर्तनकार ...
चार (४) मे चळवळ, चीनमधील : (May Fourth Movement)

चार

चीनमधील विद्यार्थ्यांनी साम्राज्यवादी प्रवृत्तीविरुद्ध ४ मे १९१९ रोजी केलेली एक प्रसिद्ध चळवळ. या चळवळीपूर्वी चीनमध्ये ताइपिंग बंड (१८४८- ६५), बॉक्सर ...
चार्टिस्ट चळवळ (Chartism)

चार्टिस्ट चळवळ

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील राजकीय व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इंग्लंडमधील श्रमिकांचा वर्गकलहावर आधारलेला पहिला लढा. आपल्या मागण्यांची सनद-चार्टर-सरकारकडून मान्य करून ...
चार्ल्स जेम्स फॉक्स (Charles James Fox)

चार्ल्स जेम्स फॉक्स

फॉक्स, चार्ल्स जेम्स : (२४ जानेवारी १७४९ – १३ सप्टेंबर १८०६). ब्रिटिश मुसद्दी व संसदपटू. लंडन येथे जन्म. ईटन व ...
चार्ल्‌स द गॉल (Charles de Gaulle)

चार्ल्‌स द गॉल

गॉल, चार्ल्‌स द : (२२ नोव्हेंबर १८९० — ९ नोव्हेंबर १९७०). फ्रान्सला प्रतिष्ठा करून देणारा कणखर, समर्थ व निःस्वार्थी नेता. उत्तर ...
चीनमधील प्रजासत्ताक क्रांती (Chinese Revolution of 1911)

चीनमधील प्रजासत्ताक क्रांती

चीनमधील मांचू राजवटीचे उच्चाटन व प्रजासत्ताकाची स्थापना यासाठी राष्ट्रवाद्यांनी घडवून आणलेली क्रांती. चीनच्या राजकीय, आर्थिक, वैचारिक आणि सामाजिक क्षेत्रांवर प्रभाव ...
चौदावा लूई (Louis XIV)

चौदावा लूई

लूई, चौदावा : (५ सप्टेंबर १६३८ – १ सप्टेंबर १७१५). फ्रान्सचा मध्ययुगातील श्रेष्ठ व लोकहितैषी राजा. बूर्बाँ  घराण्यातील तेरावा लूई ...