(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

चौदावा लूई (Louis XIV)

चौदावा लूई

लूई, चौदावा : (५ सप्टेंबर १६३८ – १ सप्टेंबर १७१५). फ्रान्सचा मध्ययुगातील श्रेष्ठ व लोकहितैषी राजा. बूर्बाँ  घराण्यातील तेरावा लूई ...
जगतशेठ घराणे (House of Jagatseth)

जगतशेठ घराणे

बंगालमधील एक इतिहासप्रसिद्ध श्रीमंत व्यापारी व सावकारी कुटुंब. ‘जगतशेठ’ ही पदवी मोगल सम्राटांकडून दिली जात होती. या घराण्याचा इतिहास १६५२ ...
जतीन मुखर्जी (Bagha Jatin) (Jatindranath Mukherjee)

जतीन मुखर्जी

मुखर्जी, जतीन : (६ डिसेंबर १८७९ – १० सप्टेंबर १९१५). प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगालमधील नडिया जिल्ह्यातील कुष्टिया (कुष्टिया ...
जनाक्का शिंदे (Janakka Shinde)

जनाक्का शिंदे

शिंदे, जनाक्का : (१८७८ – २८ एप्रिल १९५६). महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्त्या आणि थोर समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांच्या लहान ...
जी. डी. लाड (G. D. Lad)

जी. डी. लाड

लाड, गणपती दादा : ( ४ डिसेंबर १९२२ – १४ नोव्हेंबर २०११ ). महाराष्ट्रातील प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारसरणीचे कृतिशील ...
जूझेप्पे गॅरिबॉल्डी (Giuseppe Garibaldi)

जूझेप्पे गॅरिबॉल्डी

गॅरिबॉल्डी, जूझेप्पे :  (४ जुलै १८०७–२ जून १८८२). इटालियन देशभक्त, इटलीच्या एकीकरणाचा एक प्रमुख पुरस्कर्ता आणि स्वातंत्र्ययुद्धाचा सेनानी. नीस (सार्डिनिया) ...
जेम्स मन्‍रो (James Monroe)

जेम्स मन्‍रो

मन्‍रो, जेम्स : (२८ एप्रिल १७५८ — ४ जुलै १८३१). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पाचवा राष्ट्राध्यक्ष (कार. १८१७—२५) व मुत्सद्दी. त्याचा ...
जॉन ई. ई. डी. ॲक्टन (John E.E.D. Acton)

जॉन ई. ई. डी. ॲक्टन

ॲक्टन, लॉर्ड जॉन ई. ई. डी. : (१० जानेवारी १८३४ – १९ जून १९०२). प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. नेपल्स (इटली) येथे जन्मला. त्याचे सर्व शिक्षण ओस्कॉट (इंग्लंड) व म्यूनिक (जर्मनी) येथे ...
जॉन बॅगनल बेरी (John Bagnell Buri)

जॉन बॅगनल बेरी

बेरी, जॉन बॅगनल : (१६ ऑक्टोबर १८६१ — १ जून १९२७). एक अभिजात आयरिश इतिहासकार. मॉनगन ह्या अल्स्टर (आयर्लंड) प्रांतातील ...
जॉन ॲडम (John Adam)

जॉन ॲडम

ॲडम, जॉन : (४ मे १७७५–४ जून १८२५). ब्रिटिश अंमलाखालील हिंदुस्थानचा जानेवारी १८२३ ते ऑगस्ट या काळातील हंगामी गव्हर्नर जनरल ...
जॉर्ज बँक्रॉफ्ट (George Bancroft)

जॉर्ज बँक्रॉफ्ट

बँक्रॉफ्ट, जॉर्ज : (३ ऑक्टोबर १८००–१७ जानेवारी १८९१). अमेरिकन इतिहासकार व मुत्सद्दी. वुस्टर (मॅसॅच्यूसेट्स) येथे जन्म. त्याचे वडील कॅथलिक पाद्री ...
जोन ऑफ आर्क (Joan of Arc)

जोन ऑफ आर्क

जोन ऑफ आर्क : (६ जानेवारी १४१२–३० मे १४३१). झान दार्क (फ्रेंच). फ्रान्समधील एक थोर स्त्री आणि संत. जोनचा जन्म दोंरेमी-ला ...
जोसेफ मॅझिनी (Giuseppe Mazini)

जोसेफ मॅझिनी

मॅझिनी, जोसेफ : (२२ जून १८०५ – १० मार्च १८७२). एक इटालियन देशभक्त, लेखक आणि लोकशाही राष्ट्रवादाचा व मानवी मूलभूत ...
जोसेफ, दुसरा (Joseph II, Holy Roman Emperor)

जोसेफ, दुसरा

जोसेफ, दुसरा : (१३ मार्च १७४१–२० फेब्रुवारी १७९०). पवित्र रोमन साम्राज्याचा १७६५–९० दरम्यानचा सम्राट आणि ऑस्ट्रियाचा राजा. ऑस्ट्रियन सम्राज्ञी माराया ...
झां बातीस्त कॉलबेअर (Jean-Baptiste Colbert)

झां बातीस्त कॉलबेअर

कॉलबेअर, झां बातीस्त : (२९ ऑगस्ट १६१९—६ सप्टेंबर १६८३). प्रसिद्ध फ्रेंच मुत्सद्दी व चौदाव्या लुईचा अर्थमंत्री. रीम्झ येथे एका सधन ...
झार (tzar/czar)  

झार

रशियातील मस्कोव्हीच्या (मॉस्को) राजपुत्रांनी धारण केलेले एक बिरुद. ही संज्ञा रोमन सम्राटांच्या सीझर या अभिधानाचा अपभ्रंश आहे. राजघराण्यातील इतर व्यक्तींनाही ...
झालवाड संस्थान (Jhalawar State)

झालवाड संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक संस्थान. ते राजपुतान्यात आग्नेयीस वसले होते. क्षेत्रफळ २,०७४ चौ. किमी. लोकसंख्या १,२२,२९९ (१९४१). उत्पन्न सु. चार लाख ...
झॅकरी मेकॉले (Zachary Macaulay)

झॅकरी मेकॉले

मेकॉले, झॅकरी : (२ मे १७६८ – १३ मे १८३८). प्रसिद्ध स्कॉटिश संख्याशास्त्रज्ञ आणि गुला​मगिरीविरोधी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते. त्यांचा जन्म ...
झॉर्झ क्लेमांसो (Georges Clemenceau)

झॉर्झ क्लेमांसो

क्लेमांसो, झॉर्झ : (२८ सप्टेंबर १८४१–२४ नोव्हेंबर १९२९). फ्रान्सचा पहिल्या महायुद्धकाळातील पंतप्रधान, एक फ्रेंच मुत्सद्दी आणि प्रसिद्ध वृत्तपत्रकार. म्वेलेराँ-एन परेड्स ...
झॉर्झ झाक दांताँ (Georges Jacques Dantaun)

झॉर्झ झाक दांताँ

दांताँ, झॉर्झ झाक :  (२६ ऑक्टोबर १७५९–५ एप्रिल १७९४). फ्रेंच राज्यक्रांतीतील एक प्रभावी वक्ता व मुत्सद्दी. त्याचा जन्म आर्सीस्यूरोब ऑबे ...