जोखीम बचाव (Hedging)

वस्तू, चलने किंवा जीवन विमा पॉलिसी यांच्या किमतीतील चढ-उतारांमुळे होणाऱ्या नुकसानाची संभाव्यता मर्यादित किंवा कमी करण्यासाठी वापरलेली एक व्यवस्थापन रणनीती. विमा पॉलिसी खरेदी न करता जोखीमचे हस्तांतरण करणे म्हणजे जोखीम…

वनस्पती सृष्टी (Plant kingdom)

सजीवांच्या वर्गीकरणासाठी रॉबर्ट व्हिटाकर यांनी प्रतिपादित केलेल्या पंचसृष्टींपैकी (मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय/कवक, प्राणी आणि वनस्पती) ही एक सृष्टी आहे. वनस्पती सृष्टीतील सजीव बहुपेशीय व दृश्यकेंद्रकी आहेत. वनस्पती पेशींना पेशीभित्तीकेचे संरक्षक आवरण…

जकात संघ (Custom Union)

जकात संघ हा दोन किंवा अधिक देशांच्या व्यापारांतील अडथळे दूर करणे, सीमा शुल्क कमी करणे अथवा रद्द करणे आणि अभ्यांश (कोटा) काढून टाकणे यांसाठी केलेला करार होय. म्हणजेच दोन किंवा…

अकालजनन (Heterochrony / Heterochronism)

शावकरूपजनन (Paedomorphosis) ही काही उभयचर प्राण्यांमध्ये आढळून येणारी एक अवस्था. यास अकालजनन असेही म्हणण्याची पद्धत आहे. या प्रकारात सामान्य वयात  प्रजननक्षम होण्याऐवजी त्यापूर्वीच सजीव प्रजननक्षम होतो. १८७५ मध्ये अर्न्स्ट हेकेल…

कॉबवेब प्रमेय (Cobweb Theorem)

प्रामुख्याने कृषी वस्तूंचे उत्पादन व त्यांच्या किमतींसंबधित व्यापारचक्रांचे स्पष्टीकरण करणारे एक प्रमेय. प्रसिद्ध अर्थसास्त्रज्ञ निकोलस कॅल्डॉर यांनी प्रमेयाच्या वैशिष्ट्यपूर्ण आकृत्या स्पष्ट करण्यासाठी सर्वप्रथम ‘कॉबवेब’ हा शब्दप्रयोग केला. कॉबवेब याचा अर्थ…

पक्षी जीनोम प्रकल्प (B10K Project)

निसर्गात सुमारे १०,३०० विविध प्रजातींचे पक्षी आढळतात. या त्यांच्या विविधतेचे कारण जनुकीय अभ्यासातून शोधण्याचे वैज्ञानिकांनी ठरवले. यातूनच ‘पक्षी दहा हजार जीनोम प्रकल्प (B10K)’ या प्रकल्पाची निर्मिती झाली. पक्ष्यांची संख्या १०…

सायलेंट स्प्रिंग (Silent Spring)

रासायनिक कीटकनाशके वापराचा दुष्परिणाम, पर्यावरण व निसर्गचक्रासंदर्भातील एक पुस्तक. सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक प्रख्यात सागरी जीवशास्त्रज्ञ, आधुनिक पर्यावरण संरक्षण मोहिमेच्या प्रणेत्या रेचेल कार्सन यांनी १९६२ मध्ये लिहिले. या पुस्तकाने जगभर…

हीमोग्लोबिन : रसायनशास्त्र (The Chemistry of Hemoglobin)

हीमोग्लोबिन हे एक संयुक्त प्रथिन (Conjugate protein) आहे. त्याच्या रंगावरून त्याला क्रोमोप्रोटीन (Chromoprotein) असेही म्हणतात. हीमोग्लोबिनच्या संयुक्त रेणूमध्ये ‘हीम’ या नावाचा उपांग गट (Prosthetic group) आणि ‘ग्लोबिन’ नावाचे प्रथिन आहे.…

आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक (African Development Bank)

आफ्रिका खंडातील देशांचा सर्वांगीण विकास व्हावा या मुख्य उद्देशाने स्थापित जागतिक स्तरावरील एक बहुद्देशीय वित्तीय संस्था. या बँकेची स्थापना १९६४ मध्ये आबीजान येथे करण्यात आली. खाम, सुदान येथील राष्ट्रसंघाच्या आर्थिक…

युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (Unit Trust of India – UTI)

सेबीची एक नोंदणीकृत वित्तीय संस्था. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया अधिनियम १९६३ नुसार १९६४ मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या वित्तीय संस्थेची स्थापन करण्यात आली. हे ट्रस्ट सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहे.…

वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा – २००३ (Fiscal Responsibility and Budget Management Act, 2003)

भारताच्या आर्थिक व्यवस्थापनाचा तोल सांभाळण्यासाठी तयार करण्यात आलेला एक वित्तीय कायदा. भारताची आर्थिक परिस्थिती १९९०-९१ मध्ये मोठ्या प्रमाणात घसरली. त्या वेळी भारताची वित्तीय तूट राष्ट्रीय उत्पादनाच्या ६.६% झाली; तर महसुलातील…

रेगनोमिक्स (Reaganomics)

अमेरिकेचे चाळीसावे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या सलग दोन कार्यकाळातील (१९८० ते १९८९) आर्थिक धोरणे व त्यामागील अर्थशास्त्रीय मतप्रणाली यांस रेगनोमिक्स असे संबोधतात. रेगन यांच्या मते, ‘सरकार हा समस्यांवरील उपाय नव्हे,…

वासुदेव मुलाटे (Vasudev Mulate)

मुलाटे, वासुदेव : (१३ ऑक्टोबर १९४३). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार, समीक्षक, प्रकाशक आणि ग्रामीण साहित्य चळवळीमधील अग्रणी साहित्यिक. चाळीसहून अधिक वर्षे त्यांनी मराठी साहित्यात आपले योगदान दिले आहे. कविता,कथा, कादंबरी,…

परिचर्या माहितीशास्त्र प्रतिकृती [Nursing Informatics Model]

शिक्षण, संशोधन आणि प्रशासन विज्ञान यांच्याद्वारे वैद्यकीय सराव प्रदान करण्यासाठी आरोग्यसेवा कशी वापरावी याचे वर्णन परिचर्या माहितीशास्त्र प्रतिकृतीद्वारे केले जाते. आवश्यक तांत्रिक ज्ञान प्रदान करण्यासाठी संगणक आणि माहिती शास्त्राच्या सहाय्याने…

ड्यूश बंडेस बँक (Deutsche Bundes Bank)

जर्मनीची एक मध्यवर्ती बँक. ड्यूश बंडेस बँक ही यूरोपातील मध्यवर्ती बँकिंग व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही बँक तिच्या वित्तीय सामर्थ्य व प्रचंड आकारामुळे यूरोपात अत्यंत प्रभावशाली आहे. यूरोपियन मध्यवर्ती…