एत्येन बॉनो दे काँदीयाक (Etienne Bonnot de Condillac)
काँदीयाक, एत्येन बॉनो दे : (३० सप्टेंबर १७१५—३ ऑगस्ट १७८०). प्रबोधनकालीन फ्रेंच तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म फ्रान्समधील ग्रनॉबल येथे एका कायदेपंडित घराण्यात झाला. सुरुवातीस त्याने धर्मोपदेशकाचा पेश पत्करला; पण त्याला धर्मशास्त्रापेक्षा…