ओस्वाल्ड थीओडोर ॲव्हरी (Oswald Theodore Avery)
ॲव्हरी, ओस्वाल्ड थिओडोर : (२१ ऑक्टोबर १८७७ – २० फेब्रुवारी १९५५). कॅनेडात जन्मलेले अमेरिकन जीवाणुशास्त्रज्ञ. आनुवंशिकतेसाठी डीएनए (डीऑक्सिरिबोन्युक्लिक आम्ल; DNA; Deoxyribonucleic Acid) महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असल्याचे त्यांच्या संशोधनातून निश्चित झाले. …