ऑलिव्ह (Indian Olive)

ऑलिव्ह : ( लॅ.ओलिया फेरुजिनिया , कुल-ओलिएसी). सु. १५ मी. उंचीचा हा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष भारतात काश्मीर ते कुमाऊँ प्रदेशात २,४०० मी. उंचीपर्यंत आढळतो. उत्तर भारतात त्याची लागवड केली…

तुळस (Sacred basil)

भारतात सर्वत्र आढळणारी एक सुगंधी वनस्पती. तुळस लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ऑसिमम सँक्टम आहे. ऑसिमम टेन्यूफ्लोरम या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. तुळस ही मूळची जगाच्या पूर्व भागाच्या…

तुती (Mulberry)

खाद्य फळांसाठी आणि रेशीम निर्माण करणाऱ्या कीटकांच्या अळ्यांच्या खाद्य पानांसाठी प्रसिद्ध असलेली एक वनस्पती. मोरेसी कुलातील मोरस प्रजातीच्या दीर्घायू वृक्षांना किंवा झुडपांना सामान्यपणे तुती म्हणतात. जगभर या प्रजातीच्या १०–१६ जाती…

तिलापी (Tilapia)

अस्थिमत्स्य वर्गाच्या पर्सिफॉर्मीस गणाच्या सिचलिडी कुलातील एक मासा. याचे शास्त्रीय नाव ओरिओक्रोमिस मोझाम्बिका असून पूर्वी तो तिलापी मोझाम्बिका असा ओळखला जात असे. तो मूळचा दक्षिण आफ्रिकेतील असून १९५२ मध्ये तमिळनाडू…

प्राचीन मृत्तिका कला (Ancient Ceramic Art)

प्राचीन काळापासून मृत्तिकेचा (मातीचा) उपयोग विविध कलावस्तू बनविण्याकरिता होत आहे. त्यांचा समावेश प्राचीन मृत्तिका कला या संज्ञेमध्ये होतो.  निसर्गात आढळणारे मातकट, अतिसूक्ष्मकणी द्रव्य म्हणजे मृत्तिका. यास सामान्यत: माती असे संबोधतात.…

तिलपुष्पी (Foxglove)

तिलपुष्पी ही द्विवर्षायू वनस्पती सपुष्प वनस्पतींच्या प्लान्टेजिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव डिजिटॅलीस पुर्पुरिया आहे. ही वनस्पती मूळची यूरोपच्या उष्ण प्रदेशातील असून आता तिचा प्रसार सर्व उष्ण प्रदेशांत झाला आहे.…

तिरंदाज मासा (Archer fish)

तिरंदाज माशाचा समावेश पर्किफॉर्मीस गणाच्या टॉक्झोटिडी कुलात होत असून सामान्यपणे आढळणाऱ्या माशाचे शास्त्रीय नाव टॉक्झोटिस जॅक्युलॅट्रिक्स आहे. या कुलात टॉक्झोटिस ही एकच प्रजाती असून त्यात सात जातींचे तिरंदाज मासे आहेत.…

तितर (Partridge)

मध्यम आकाराचा कोंबडीसारखा एक पक्षी. तितराचा समावेश कोंबडीच्या फेजिॲनिडी कुलातील फ्रँकोलायनस प्रजातीत होतो. जगभर या प्रजातीच्या सु. ४० जाती असून त्यांपैकी पाच आशियात तर उर्वरित जाती आफ्रिकेत आढळतात. भारतात करडा…

तामण (Queens flower)

तामण हा पानझडी वृक्ष लिथ्रेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव लॅगरस्ट्रोमिया स्पेसिओजा आहे. हा वृक्ष मूळचा दक्षिण आशियातील असून भारत, श्रीलंका, म्यानमार, चीन, मलेशिया या देशांत आढळतो. तामणाच्या फुलांच्या पाकळ्या…

ताड (Palmyra palm)

नीरा या पेयासाठी आणि ताडगोळा या फळांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. ताड हा वृक्ष अ‍ॅरॅकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बोरॅसस फ्लॅबेलिफर आहे. शिंदी, खजूर, माड (नारळ) या वनस्पतींही अ‍ॅरॅकेसी कुलातील…

ताग (Jute)

धाग्यांसाठी उपयुक्त अशी एक वनस्पती. स्पर्मानिएसी कुलातील कॉर्कोरस प्रजातीच्या वनस्पतींना ताग म्हणतात. पूर्वी ताग या वनस्पतीचा समावेश टिलिएसी कुलात आणि त्यानंतर माल्व्हेसी कुलात केला जात असे. आता तिचा समावेश स्पर्मानिएसी…

तांबट (Coppersmith barbet)

तांबट हा साधारणपणे चिमणीच्या आकाराचा शेवाळी हिरव्या रंगाचा पक्षी आहे. पिसिफॉर्मिस गणाच्या मेगॅलेमिडी कुलातील हा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव मेगॅलेमा हीमासेफॅला आहे. दक्षिण आशिया आणि दक्षिणपूर्व आशियातील हा निवासी…

तलवार मासा ( Sword fish)

मत्स्यवर्गातील हा एक सागरी अस्थिमासा असून याचे शास्त्रीय नाव झिपिअस ग्लेडियस आहे. पर्सिफॉर्मिस गणातील झिपिइडी कुलात त्यांचा समावेश होतो. हा मासा आकाराने मोठा व स्थलांतर करणारा आहे. त्याचा वरचा जबडा…

तरळी (Oil sardine)

अस्थिमीन वर्गाच्या चर्मपरअर उपवर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिडी कुलातील एक मासा. याचे शास्त्रीय नाव सार्डिनेला लाँगिसेप्स आहे. काही ठिकाणी या माशाला तारली असेही म्हणतात. भारताची पश्चिम किनारपट्टी, श्रीलंका, पाकिस्तान, इराण, ओमान,…

तमाल (Indian cassia)

लॉरेसी कुलातील एक सदापर्णी वृक्ष. याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम तमाला आहे. भारतीय मसाल्यांमध्ये तमालपत्र (तेजपात) म्हणून या वनस्पतीची पाने वापरली जातात. हा मूळचा भारतातील वृक्ष असून हिमालयात सस. पासून ९००–२४००…