किंजळ (Terminalia paniculata)

घोड्याच्या कानाच्या आकारासारखा पानांचा आकार असलेल्या या पानझडी वृक्षाचे कुल क्राँब्रेटेसी आहे. टर्मिनॅलिया पॅनिक्युलॅटा असे शास्त्रीय नाव असलेला हा वृक्ष हिरडा, अर्जुन आणि ऐन यांच्या प्रजातीतील आहे. संस्कृतमध्ये याला अश्वकर्णी म्हणतात. तो…

कुरतडणारे प्राणी (Rodents)

स्तनी वर्गामधील कुरतडणारे प्राणी म्हणजे कृंतक हा एक गण (रोडेंशिया) आहे. हे प्राणी कोणताही पदार्थ खाताना इतर प्राण्यांप्रमाणे दातांनी तोडून व चावून न खाता तो कुरतडतात. या गणामध्ये पुष्कळ कुले…

कोकिळ (Cuckoo)

पक्षी वर्गातील क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी कुलामधील पक्षी. या कुलात १२५ हून अधिक जाती आहेत. हे पक्षी जगात सर्वत्र आढळतात. भारतात कोकिळ सर्वत्र आढळतो. हिमालयात तो आढळत नाही, परंतु त्याच्या पायथ्याच्या…

Read more about the article ऑस्ट्रियन वारसा युद्ध (War of the Austrian Succession)
ऑस्ट्रियन वारसाहक्क युद्धाचा एक प्रसंग दर्शविणारे फ्रेंच चित्रकार प्येअर ला फाँ याचे तैलचित्र.

ऑस्ट्रियन वारसा युद्ध (War of the Austrian Succession)

ऑस्ट्रियातील हॅप्सबर्ग गादीच्या वारसासाठी झालेले युद्ध (१७४०–१७४८). हॅप्सबर्ग सम्राट सहावा चार्ल्स २० ऑक्टोबर १७४० मध्ये निपुत्रिक मरण पावला. त्याने आपली मुलगी माराया टेरीसाला वारसा मिळावा, अशी तजवीज सर्व यूरोपीय राष्ट्रांच्या संमतीने केली…

लॉर्ड जॉर्ज ईडन ऑक्‍लंड (George Eden, earl of Auckland)

ऑक्‍लंड, लॉर्ड जॉर्ज ईडन : (२५ ऑगस्ट १७८४ – १ जानेवारी १८४९). ब्रिटिश अंमलाखालील हिंदुस्थानचा १८३५ ते १८४२ या काळातील गव्हर्नर जनरल. ऑक्‍लंडने १८१४ मध्ये बॅरन झाल्यावर हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये प्रवेश केला. तो १८३० पासून १८३४ पर्यंत…

भूकंपाचे लघू स्तंभावर होणारे परिणाम (Effects of the earthquake on the short columns)

भूकंप मार्गदर्शक सूचना  २२ लघू स्तंभ (Short Columns) : पूर्वी झालेल्या भूकंपादरम्यान प्रबलित (Reinforced) काँक्रीटच्या इमारतींमध्ये एकाच मजल्यावर, विविध उंचीचे स्तंभ असलेल्या परंतु, त्यांपैकी लघु स्तंभांचे त्याच मजल्यावरील उंच स्तंभापेक्षा जास्त…

ऐतरेयोपनिषद (Aitareyopanishad)

हे ऋग्वेदाचे  उपनिषद आहे.ऋग्वेदाच्या  ऐतरेय आरण्यकाच्या दुसऱ्या विभागातील तत्त्वज्ञानात्मक अथवा ज्ञानकांडात्मक असलेल्या चार ते सहा अध्यायांना ऐतरेयोपनिषद म्हटले जाते. या उपनिषदाचा कर्ता महिदास ऐतरेय आहे. त्यानेच ४० अध्यायांचा ऐतरेय ब्राह्मण…

तुलनात्मक पुनर्रचना पद्धती (Comparative Reconstruction Method)

तुलनात्मक पुनर्रचना पद्धती : ऐतिहासिक भाषाविज्ञानात भाषांमध्ये काळानुसार होणाऱ्या बदलांचा अभ्यास होतो. भाषांमधील काही विशेष प्रकारच्या शब्दांतील ध्वनीविषयक आणि अर्थविषयक साम्यांचा अभ्यास करून ही साम्ये ज्या मूळ भाषेमुळे आली तिची…

तत्त्वज्ञान, धर्माचे (Philosophy of Religion)

कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा विचार न करता समग्र धर्मसंस्थेचा विचार चिकित्सकपणे करणाऱ्या शास्त्राला धर्माचे तत्त्वज्ञान म्हटले जाते. जीव-जगत्-ईश्वर (जगदीश) यांचा परस्परांशी असणारा संबंध प्रत्येक धर्म स्पष्ट करतो. तो स्पष्ट करत…

ओ. एन. व्ही. कुरूप (O. N. V. Kurup)

ओ. एन. व्ही. कुरूप : (२७ मे १९३१ - १३ फेब्रुवारी २०१६).ओट्टापलक्कल नीलाकंगन वेलुकुरुप. प्रसिद्ध मल्याळम् कवी,गीतकार व पर्यावरणतज्ञ. ओ. एन. व्ही. कुरूप यांना भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल २००७ चा…

दंतधावन व जिव्हानिर्लेखन (Tooth Brushing and tongue cleaning)

दंत म्हणजे दात व धावन म्हणजे धूणे किंवा स्वच्छ करणे. ही क्रिया सकाळी व काही खाल्ल्यावर करावयास सांगितली आहे. यासाठी स्वच्छ जागी उगवलेल्या विशिष्ट झाडांच्या काडीचा वापर करावा. यासाठी कडूलिंब,…

गंडूष व कवल (Gandusha and Kaval)

गंडूष म्हणजे तोंडात औषध धरून ते न गिळता केली जाणारी उपचारात्मक क्रिया. गंडूषासोबत कवल या क्रियेचा विचार ग्रंथांत नेहमी एकत्रितपणे केलेला आढळत असून ही सुद्धा थोड्याफार फरकाने गंडूषासारखी क्रिया आहे.…

चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषण (Critical Discourse Analysis)

सामाजिक आणि सांस्कृतिक भवतालाचे वस्तुनिष्ठ आकलन व विश्लेषण करणारी भाषावैज्ञानिक पद्धती. भाषा ही चिन्हव्यवस्था आहे आणि या व्यवस्थेतून सूचित होणारं सामाजिक, सांस्कृतिक वास्तव या दोहोंतील आंतरसंबंधांचा ही पद्धती शोध घेते.…

फना (Fana)

सूफी तत्त्वप्रणालीतील एक अवस्था. अध्यात्मसाधना करताना भक्ताचा जीव सात टप्प्यांतून जातो. त्याला 'मकामात' (मुक्काम) म्हणतात. यातही मनाच्या अनेक अवस्था असतातच. 'अनल्हक' (मी सत्य आहे) ही या संप्रदायाची मूलभूत धारणा. जीव आणि…

ओडिसी नृत्य (Odissi Dance)

ओरिसा प्रांतातील एक अभिजात नृत्यप्रकार.  भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये ओडिसी नृत्याचा उल्लेख एक शास्त्रीय नृत्यप्रकार म्हणून केला असून हा नृत्यप्रकार ‘ओडू’ म्हणजे ओरिसाकडून आला आहे. हा भारतातील एक अत्यंत पुरातन…