गोकुळाष्टमी (Gokulashtami)

श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्णजयंती,जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो.देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच वसुदेवाने कंसभयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंदयशोदेकडे पोहोचविले.गोकुळात कृष्णजन्मामुळे आनंदीआनंद…

गुढी पाडवा (Gudhi Padwa)

चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी पाडवा असे नाव असून साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो. शालिवाहन शकारंभही (इ. स. सु. ७८ वर्षांनंतर) याच दिवशी असून दक्षिण भारतात तसेच…

कल्पवृक्ष (Kalpvriksh)

हिंदू पुराणकथांतील एक वृक्ष. स्वर्गातील मंदार, पारिजात, संतान, कल्पवृक्ष व हरिचंदन या पंचदेवतरूंत त्याची गणना असून तो इच्छित वस्तू देतो, अशी कल्पना आहे. भारतीय पुराणे व साहित्यातही त्याचे वर्णन आहे.…

पॅरान्थ्रोपस  इथिओपिकस (Paranthropus aethiopicus)

पॅरान्थ्रोपस पराजातींमधील सर्वांत कमी माहिती असलेली एक प्रजात. फ्रेंच पुरामानवशास्त्रज्ञ कॅमे ॲरमबूर्ग (१८८५–१९६९) आणि इव्ह कॉप्पन्स (जन्म : ९ ऑगस्ट १९३४) यांना इथिओपियामध्ये ओमो नदीच्या परिसरात एक खालचा जबडा मिळाला…

फ्ल्यूट (Flute)

सुषिर वाद्यवर्गातील एक प्रमुख पाश्चात्त्य वाद्य. तोंडाने हवा फुंकून वाजविण्याच्या या दंडगोलाकार वाद्याचे अनेक प्रकार आहेत. हे प्रकार सामान्यत: त्याची लांबी, छिद्र (रंध्र) संख्या तसेच वादनतंत्रे यांतील भिन्नतेमुळे पडले आहेत.…

अभिवाह (Flux)

धातू किंवा धातुपाषाण वितळविताना तयार होणाऱ्या द्रवाची तरलता (पातळपणा) वाढविण्यासाठी व नको असलेली मलद्रव्ये त्याच्यातून धातुमळीच्या स्वरूपात निघून जावीत म्हणून जे पदार्थ त्याच्यात टाकण्यात येतात, त्यांना ‘अभिवाह’ म्हणतात. धातुविज्ञानात अभिवाहांचा…

कल्हई (Tinning)

सामान्यपणे पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यांना शुद्ध कथिलाचा पातळ लेप देतात,अशा लेपाला कल्हई म्हणतात. शुद्ध कथिल विषारी नसते व त्याच्यावर हवेचा किंवा आंबट पदार्थांचा परिणाम होत नाही. त्यामुळे कल्हई केलेले पृष्ठ…

गन मेटल (Gun metal)

काशाचा (ब्राँझचा) हा एक प्रकार आहे. पोलादाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू होण्यापूर्वी तोफा ओतण्यासाठी या मिश्रधातूचा फार उपयोग होई म्हणून तिला गन मेटल (तोफेची धातू) हे नाव पडले. तीत तांबे…

नायक्रोम (Nichrome)

निकेल आणि क्रोमियम धातूंचे प्राधान्य असलेल्या मिश्रधातू. या मिश्रधातूंच्या तारांचा उपयोग प्रामुख्याने विद्युत् रोधन व विद्युत् रोधापासून उष्णतानिर्मितीसाठी होतो. उच्च तापमान दीर्घकाल सहन करता येणे हा ह्या मिश्रधातूंचा मुख्य गुण…

वीरभद्र (Virbhadra)

गोव्यात सादर केले जाणारे एक विधीनृत्य. ते साखळी या गावी चैत्र पौर्णिमेला तर फोंडा, केपे, सांगे इत्यादी भागात धालोत्सवाची वा शिगमोत्सवाची सांगता करताना सादर केले जाते. गोव्यावर कदंबांची आणि विजयनगरची…

पिराजीराव सरनाईक (Pirajirao Sarnaik)

सरनाईक, पिराजीराव : (जन्म : २८ जुलै १९०९ – मृत्यू : ३० डिसें.१९९२). महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर. जन्म कोल्हापूर येथे अत्यंत गरीब घराण्यात झाला. त्यांनी बालपणी कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील पंत अमात्य…

शिगमो (Shigmo)

होळीच्या दिवसात गोवा आणि कोकणात सादर केला जाणारा एक प्रमुख लोकोत्सव. या उत्सवात  फक्त पुरुष सहभागी होऊन पारंपरिक संगीत,नृत्य,अभिनय आणि हस्तकलांचे आविष्करण घडवितात. मूळ संस्कृत सुग्रीष्मक या शब्दापासून शिगमो या…

सुंवारी (Suwanri)

अतिप्राचीन असा गोमंतकीय लोकसंगीतप्रकार.यात पाच-सहा पुरूषवादक आणि गायक असतात. त्यांची संख्या जास्तही असू शकते. त्यात दोन किंवा तीन घुमटवादक शामेळ वादक, एक कांसाळेवादक,एखादा झांजवादक आणि अन्य गायक कलाकार असतात. हा…

किसनराव हिंगे (Kisanrao Hinge)

हिंगे, किसनराव : (जन्म : १८ ऑगस्ट १९२९ – १ जून १९९८).महाराष्ट्रातील प्रसिद्ध सेवाव्रती शाहीर. जन्मस्थळ पुणे. वडिलोपार्जित व्यवसाय - बेलदार. संगमरवरी दगडावर नक्षीकाम करून उपजीविका करणाऱ्या सामान्य कुटुंबात त्यांचा…

हुईक (Huik)

महाराष्ट्रातील काही भागांत भैरवनाथाच्या यात्रेमध्ये पुढील वर्षाचे अनुमान व्यक्त करणारे जे भाकीत सांगितले जाते, त्याला हुईक असे म्हणतात. संगमनेर तालुक्यातील डीग्रस येथील भैरवनाथ मंदिर प्रसिद्ध आहे.येथे भव्य असा भैरवनाथाचा तांदळा…