ऑर्किड (Orchid)

सपुष्प  वनस्पतींच्या ऑर्किडेसी या कुलातील ऑर्किड (आमर) ही एक वनस्पती आहे. अंटार्क्टिका तसेच वाळवंट सोडून सर्व वनप्रकारांमध्ये ऑर्किड आढळतात. उष्णकटिबंधात यांच्या अनेक जाती आढळत असून त्या अपिवनस्पती (दुसर्‍या वनस्पतींच्या आधारे…

उडीद (Black gram)

एक कडधान्य. उडीद ही वर्षायू व शिंबावंत (शेंगा येणारी) वेल फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना मुंगो आहे. ही वनस्पती मूळची भारतातील आहे. ती प्राचीन काळापासून उडदाच्या डाळीसाठी लागवडीखाली आहे. तिचा…

आले (Ginger)

आले हे त्याच नावाच्या लहान बहुवर्षायू ओषधीचे मूलक्षोड (जमिनीलगत आडवे वाढणारे मांसल खोड) आहे. हे मूलक्षोड (आल्याचे गड्डे) शाखित असून हाताच्या पंजासारखे असतात. त्यांची बोटे जवळजवळ व एकमेकांना चिकटलेली असतात.…

आंबा (Mango)

आंबा हा सदाहरित वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मॅँजिफेरा इंडिका आहे. भारतात आंब्याची लागवड सु. ४,००० वर्षांपूर्वीपासून होत असावी, असे मानतात. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत यूरोपातील लोकांनी भारतातून ही वनस्पती…

कांदा (Onion)

कांदा या वनस्पतीचे मूलस्थान इराण व त्या शेजारचा प्रदेश असून भारतात पुरातन काळापासून याची लागवड होत आहे. कांदा ही आवरणयुक्त कंद असलेली बहुवर्षायू वनस्पती आहे. ती लिलिएसी कुलातील असून तिचे…

कापूस (Cotton)

कापूस हा एक वस्त्रनिर्मितीकरिता लागणारा वनस्पतिजन्य मऊ, पांढरा व तंतुमय पदार्थ आहे. कपाशीच्या बोंडापासून कापूस मिळतो. कपाशी ही उष्ण प्रदेशीय वनस्पती माल्व्हेसी कुलातील आहे. कपाशीच्या लागवड केल्या जाणार्‍या गॉसिपियम आर्बोरियम(देवकापूस), गॉ.हर्बेशियम, गॉ.हिरसुटम आणि गॉ.…

कान (Ear)

कण्याचे आणि शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य करणारे पृष्ठवंशीय प्राण्यांमधील इंद्रिय. मनुष्याच्या आणि इतर बहुतांशी सस्तन प्राण्यांमध्ये कानाचे बाह्य, मध्य आणि आंतरकर्ण असे तीन भाग पुढीलप्रमाणे पडतात. बाह्यकर्ण हा कानाची पाळी…

वातदोष (Vata Dosha)

शरीरातील तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे वात. वातालाच वायू असेही म्हणतात. वात आवश्यक प्रमाणात शरीरात असताना शरीरातील विविध व्यापार सुरळीत चालण्यास मदत करतो. मात्र आवश्यक प्रमाणापेक्षा कमी किंवा अधिक झाल्यास…

पित्तदोष (Pitta Dosha)

शरीरातील तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे पित्त. जर पित्त आवश्यक प्रमाणात शरीरात उपस्थित असेल तर ते शरीरातील विविध व्यापार सुरळीतपणे चालण्यास मदत करते. मात्र आवश्यक प्रमाणापेक्षा पित्त कमी किंवा जास्त…

कफदोष (Kapha Dosha)

शरीरातील तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे कफ. कफाला श्लेष्मा असेही म्हणतात. कफ आवश्यक प्रमाणात शरीरात असताना शरीरातील व्यापार सुरळीत चालण्यास मदत करतो. मात्र आवश्यक प्रमाणापेक्षा कमी किंवा अधिक झाल्यास रोग…

Read more about the article अर्बुद (Tumour)
कर्करोगग्रस्त गालावरील अर्बुद

अर्बुद (Tumour)

शरीराच्या एखाद्या भागातील पेशींची अपसामान्य वाढ होऊन तयार होणार्‍या निरुपयोगी गाठीला 'अर्बुद' असे म्हणतात. पेशींच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे पेशीविभाजनासाठीची जनुके पेशीविभाजन नियंत्रित करतात. काही रसायने, किरणोत्सार, विषाणू इत्यादींमुळे पेशीविभाजनावर परिणाम घडून…

अर्धशिशी (Migraine)

अर्धशिशी म्हणजे वारंवार आणि बहुधा डोक्याच्या एकाच बाजूला होणारी तीव्र डोकेदुखी. ही बहुधा एका बाजूची तर कधी दोन्ही बाजूंची असते. डोकेदुखीबरोबर ओकार्‍या होतात. या रोगास चेतासंस्था कारणीभूत असली तरी रक्ताभिसरण…

अमीबाजन्य विकार (Amoebiasis)

अमीबाजन्य विकार हा आमांश या रोगाचा एक प्रकार आहे. अमीबा या एकपेशीय आदिजीवाच्या एंटामीबा हिस्टॉलिटिका जातीमुळे हा रोग होतो. हा रोग जगातील सर्व देशांत आढळतो. आफ्रिका, दक्षिण अमेरिका व आग्नेय…

अभयारण्य (Sanctuary)

भारतामध्ये केंद्र शासनाने वन्य जीव रक्षणाच्या उद्देशाने काही नैसर्गिक प्रदेश संरक्षित केले आहेत. हे राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये व राज्यस्तरीय वनोद्याने या तीन प्रमुख प्रकारांत आढळून येतात. वन्य जीव व त्यांचे…

अबोली (Fire-cracker flower)

अबोली हे अ‍ॅकँथेसी कुलातील बहुवर्षायू  झुडूप असून ते क्रॉसँड्रा इन्फंडिबुलिफॉर्मिस या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. याचे मूळ स्थान श्रीलंका असून भारतात व मलेशियात याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. भारतात उत्तर प्रदेश, पश्चिम…