लादाइन्य (Ladaenya)

लॅटिन भाषेतील संक्षिप्त प्रार्थनागीत. त्याला कोकणी भाषेत लातीन असे म्हणतात. पोर्तुगीज राजवटीत पाश्चात्त्य संगीताच्या प्रसारासाठी पॅरीश स्कूलमधून संगीताचे शिक्षण देण्यात येई. चर्चमधील सामूहिक प्रार्थनागीते पाश्चात्त्य संगीतशैलीने गाण्यास सुलभ व्हावे हा…

करवंद (Bengal currant)

करवंद हे काटेरी व सदापर्णी झुडूप अ‍ॅपोसायनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅरिसा करंडास असे आहे. ते भारतातील वनांत विशेषत: शु्ष्क व खडकाळ भागांत आढळते. याशिवाय श्रीलंका, जावा, तिमोर येथेही ते आढळते.…

रायनी (Rayni)

लोकविधीप्रसंगी पूर्व विदर्भात गायला जाणारा गानप्रकार. विवाहप्रसंगी किंवा नामकरणविधीसमयी डाहाका गायनाचा जो विधी संपन्न होत असतो त्याला ‘रायनी’ किंवा ‘उतरन’ असे संबोधण्यात येते. रायनी शब्दाचे राहनी, राहानी व राहान असे…

मोहडोंबरी (Mohdombari)

आदिवासीतील कोलाम जमातीचा सण.कोलामी भाषेत या सणाला ‘बुर्री’ किंवा ‘भुर्री’ असे नाव आहे. या सणामध्ये मोहफूल आणि मोहाच्या झाडाचे महात्म्य असते, म्हणून कोलामांनी मराठी भाषिक लोकांसाठी ‘मोहडोंबरी’ हे नाव ‘बुर्री’…

बेरड (Berad)

महाराष्ट्रातील भटक्या व विमुक्त जमातीपैकी एक. कर्नाटकातील धारवाड आणि बिजापूर जिल्ह्यात मुख्यता त्यांची वस्ती आहे. महाराष्ट्रातील सोलापूर,कोल्हापूर तसेच सीमाभागात हे लोक आढळतात. तेलगु बोरा आणि तमिळ वेडन यांच्याशी या जमातीचा…

लप्पक (Lappak)

स्त्रीप्रधान गंमत प्रकारातील महाराष्ट्रातील नाट्याविष्कार. हा नाट्यप्रकार दलित कलावंतांनी जोपासलेला आणि विकसित केलेला कलाप्रकार असून स्त्रीवर्गात हा नाट्यप्रकार प्रसिद्ध होता. लप्पक या संज्ञेला ‘लापणिक’ किंवा ‘लापिका’ हे शब्द जवळचे आहेत.…

राधा (Radha)

झाडीपट्टीतील लोकनाट्य. दंडार आणि खडी गंमत या दोन लोकनाट्यांनंतर लोकप्रियतेच्या कसोटीवर उतरणारे हे लोकनाट्य होय. रात्रभर चालणारा हा लोकरंजनप्रकार राधा या एकाच पात्राभोवती फिरत असतो. खडी गंमत या झाडीपट्टीतील अन्य…

येडेश्वरी (Yedeshwari)

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न…

बोहाडा (Bohada)

मुखवटा नृत्ये. जगभरात धर्मधारणांसह सर्वदूर मुखवटा नृत्य उत्सव सादर होतो. महाराष्ट्रातील आदिवासी भागात ‘बोहाडा’ नावाने मुखवट्यांचा किंवा स्वांगांचा (सोंगाचा) उत्सव होतो. विशेषतः ठाणे, नगर व नासिक जिल्ह्यात साधारण चैत्र-वैशाखात हा…

रणमाले (Ranmale)

गोव्यातील सत्तरी आणि सांगे तालुक्यांत सादर केला जाणारा पारंपरिक लोकनाट्यप्रकार. गोव्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही गावांतूनही हे लोकनाट्य सादर केले जाते. रणमाल्यातील सर्व कलाकार हे पुरूष असून ते…

मुसळांखेळ (Muslakhel)

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला गोव्यातील एक नृत्यप्रकार.या नृत्यात सहभागी होणारे सर्व कलाकार ख्रिस्ती पुरुष असून ते हातात बांबूपासून बनविलेले दीड ते दोन मीटर उंचीचे मुसळ घेऊन नाचतात. या नृत्याच्या वेळी दोन…

मांडो-धुलपद (Mando-Dhulpad)

गोव्यातील ख्रिस्ती लोकांचे कोकणी नृत्यगीत.यात संगीत, काव्य आणि नृत्याचा एकत्रित आविष्कार पाहायला मिळतो. गोव्यात १५१० साली पोर्तुगिजांचे आगमन झाले. त्यानंतर गोव्यात पोर्तुगीज भाषा आणि पाश्चात्त्य संगीत रूजण्यास प्रारंभ झाला. पाश्चात्त्य…

मांड (Mand)

गोव्यातील गावाशी संबंधित धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करण्यासाठी परंपरेने राखून ठेवलेली सामायिक मालकीची पवित्र जागा. ही जागा बहुधा गावाच्या केन्द्रभागी असते. गावाच्या मूळपुरुष अथवा गृहपुरुष नावाच्या दैवताच्या प्राकारात असलेल्या अंगणालाही…

मिथ्यकथा (Myth)

धर्मनिष्ठ लोकांच्या दृष्टीने अंतिम सत्य सांगणारी आणि पवित्रतर वास्तववादी लोकांच्या दृष्टीने कल्पित व अवास्तव आणि कलावंत-साहित्यिक वगैरेंच्या दृष्टीने कलात्मक सत्याचा अंतर्भाव असलेली विशिष्ट प्रकारची कथा. पुराणकथा, दैवतकथा इ. तिची पर्यायी…

आख्यायिका (legend)

पारंपरिक गोष्टी म्हणजे आख्यायिका. मुख्यत: संत, वीरपुरुष, लोकोत्तर स्त्रिया, लोकनेते यांच्याभोवती आख्यायिकांची गुंफण झालेली दिसते. लोकसाहित्याचाच त्या एक भाग असल्यामुळे त्यांचे कर्तृत्व बहुधा अनामिकच असते. तथापि ज्या लोकसमूहात त्या प्रचलित…