माध्यमांतर (चित्रपट माध्यम)
चित्रपट हे माध्यम निर्माण झाल्यावर मूकपटांच्या काळापासूनच इतर माध्यमांतील कलाकृती चित्रपटमाध्यमात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. चित्रपटमाध्यमाची निर्मिती हुबेहूब नोंद करणाऱ्या यंत्रामुळे झाली. एखादी घटना कॅमेरा लावून टिपून ठेवता येते आणि…