सुवर्णप्राशन (Suvarnaprashan)

सुवर्ण म्हणजे सोने. प्राशन करणे म्हणजे पिणे अथवा पाजणे. सुवर्ण प्राशनाचा अंतर्भाव लेहन या प्रकारात होतो. लेहन म्हणजे चाटवणे. काश्यपसंहितेनुसार लेह बनविण्यासाठी पूर्व दिशेला तोंड करावे आणि धुतलेल्या दगडावर थोड्या…

Read more about the article ग्रॅफिन (Graphene)
3d generated image of graphene structure

ग्रॅफिन (Graphene)

ग्रॅफिन हे कार्बनच्या ग्रॅफाइट, कोळसा, अब्जांशनलिका आदी बहुरूपकांचे मूळ संरचनात्मक रूप आहे. पूर्णतः कार्बनने घडलेले ग्रॅफिन स्फटिकरुपी असून ते द्विमितीय आहे. ग्रॅफिनचे ग्रॅफाईटशी असलेल्या साम्यामुळे ग्रॅफिन हे नाव हांस पीटर बोहम् यांनी १९९४ मध्ये दिले.…

पुंज कण (Quantum dots)

पुंज कणांचा शोध : अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पदार्थ आकारमानाने लहान लहान करत गेल्यावर काही अब्जांश मीटर मापाच्या आतील पदार्थांच्या गुणधर्मांमध्ये आमुलाग्र व वैशिष्ट्यपूर्ण बदल होतात. परंतु हे जेव्हा अर्धसंवाहक आणि…

बकीबॉल (Buckyball)

अब्जांश कण अनेक प्रकारचे असतात. कार्बनच्या विविध अब्जांश कणांमध्ये ‘कार्बन-६०’ (सी-६०; C-60) हा एक वैशिष्ट्यपूर्ण रेणू आहे. कार्बन मूलद्रव्याची संयुजा चार आहे. त्यामुळे मूलद्रव्यांच्या आवर्ती तक्त्यामधील चौथ्या गटातील अन्य मूलद्रव्याप्रमाणेच…

Read more about the article सुधीर फडके (बाबूजी) (Sudhir Phadke)
सुधीर फडके

सुधीर फडके (बाबूजी) (Sudhir Phadke)

फडके, सुधीर : (२५ जुलै १९१९ – २९ जुलै २००२). प्रसिद्ध मराठी भावगीतगायक आणि चित्रपटक्षेत्रातील निर्माते, संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र ऊर्फ सुधीर विनायकराव फडके. पण बाबूजी या…

रक्तगट (Blood group)

मानवी रक्ताचे एक प्रकारचे वर्गीकरण. सर्व मानवांच्या रक्तामध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तपट्टिका आणि रक्तद्रव हेच घटक असतात. घटकांच्या स्तरावर मात्र माणसामाणसांच्या रक्तात फरक असतो. जसे, तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर असणाऱ्या…

रक्त (Blood)

मानवासहित सर्व पृष्ठवंशी प्राणी व काही अपृष्ठवंशी प्राणी यांच्या शरीरात मुख्यत: वाहकाचे कार्य करणारा एक द्रव म्हणजे रक्त. रक्त लाल रंगाचे असून ते हृदयापासून निघून रक्तवाहिन्यांद्वारे शरीरात फिरते आणि परत…

यकृत (Liver)

पृष्ठवंशी प्राण्यांमधील एक महत्त्वाचे इंद्रिय. यकृत मनुष्याच्या शरीरातील आकारमानाने मोठी ग्रंथी असून त्याद्वारे अनेक गुंतागुंतीची कार्ये घडून येत असतात. मानवी शरीरात ते उदरगुहेच्या वर उजव्या भागात व मध्यपटलाखाली आणि जठर…

प्रजनन (Reproduction)

प्रजनन ही एक जैविक प्रक्रिया असून या प्रक्रियेद्वारे सजीवांकडून नवीन सजीव म्हणजे संतती निर्माण होत असते. प्रजनन हे सर्व सजीवांचे मूलभूत लक्षण आहे; प्रत्येक सजीव याच प्रक्रियेमुळे अस्तित्वात येतो. सजीवांमध्ये…

रेनडियर (Reindeer)

स्तनी वर्गातील समखुरी गणाच्या मृग कुलातील (सर्व्हिडी कुलातील) एक प्राणी. त्याचे शास्त्रीय नाव रँगिफर टॅरँडस आहे. ते आर्क्टिक व उपआर्क्टिक शीत प्रदेशांत आढळतात. उत्तर ध्रुवाकडील प्रदेश, टुंड्रा व तैगा येथे…

मानवी मेंदू (Human Brain)

मेंदू हा मानवी चेतासंस्थेचे इंद्रिय आहे. मेंदू आणि मेरुरज्जू मिळून मध्यवर्ती चेतासंस्था बनते. मेंदू हा चेतापेशी, सहयोगी पेशी व रक्तवाहिन्या यांनी बनलेला असतो. प्रौढ मानवी मेंदूत सु. ८६ अब्ज चेतापेशी…

माइनमूळ (Indian coleus)

माइनमूळ ही बहुवर्षायू वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कोलियस बार्बेटस आहे. ती कोलियस फेर्स्कोलाय किंवा प्लेक्ट्रँथस बार्बेटस अशा शास्त्रीय नावांनीही ओळखली जाते. माइनमूळ मूळची भारतातील असून हिमालयाच्या परिसरात…

मांदेली (Golden anchovy)

खाऱ्या पाण्यातील एक खाद्य मासा. मांदेलीचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिइडी कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव कोइलिया डुस्सुमिरी आहे. उष्ण प्रदेशातील सर्व समुद्रात मांदेली मासे आढळतात. भारतात मुंबई व…

मांडूळ (Sand boa)

दुतोंड्या साप या नावाने सर्वपरिचित असलेला एक बिनविषारी साप. मांडूळ सापाचा समावेश सरीसृप वर्गाच्या बोइडी कुलातील एरिक्स उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिक्स जॉनाय आहे. अजगर व डुरक्या घोणस…

महाळुंग (Citron)

महाळुंग हा सदापर्णी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिट्रस मेडिका आहे. लिंबू व बेल या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. महाळुंग हा वृक्ष मूळचा भारतातील असून भारताच्या पूर्व भागातील…