भुंगा (Carpenter bee)

कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा (कलापंखी) गणाच्या झायलोकोपिडी (काष्ठनिवासी) कुलात भुंग्यांचा समावेश होतो. त्यांना भ्रमर व सुतारी भुंगा असेही म्हणतात. ते जगात सर्वत्र आढळत असून त्यांच्या सु. ५०० जाती आहेत. भारतात त्यांच्या…

भारद्वाज (Crow pheasant)

तांबूस-पिंगट रंगाची पिसे असलेला व प्रथमदर्शनी कावळ्यासारखा दिसणारा एक पक्षी. भारद्वाजाचा समावेश पक्षिवर्गाच्या क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस सायनेन्सिस आहे. कोकिळ, पावशा व चातक या पक्ष्यांचा…

भारंगी (Bharangi)

एक औषधी झुडूप. भारंगी ही वनस्पती व्हर्बिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लेरोडेंड्रॉन सेरॅटम आहे. रॉथिका सेराटा अशा शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. साग हा वृक्ष याच कुलातील आहे. भारंगी…

लिंबू (Lime)

(लाइम). लिंबू हा रूटेसी कुलाच्या सिट्रस प्रजातीतील मध्यम उंचीचा वृक्ष आहे. ईडलिंबू, पपनस, महाळुंग, मोसंबे, संत्रे व चकोतरा या वनस्पतीही याच प्रजातीतील आहेत. सिट्रस प्रजातीत प्रमुख चार जाती असून त्यांच्यातील…

ऱ्‍होडोडेंड्रॉन (Rhododendron)

आवृतबीजी फुलझाडांच्या एरिकेसी कुलातील एक प्रजाती. या प्रजातीमध्ये सु. १००० जाती असून या वनस्पतींमध्ये उंची, आढळ, फुलांचे रंग आणि उपयोग यांमध्ये विविधता आढळून येते. ऱ्‍होडोडेंड्रॉन प्रजाती मूळची आशिया, उत्तर अमेरिका,…

प्रजनन, मानवी (Human Reproduction)

प्रत्येक सजीव हा प्रजननाद्वारे अस्तित्वात आलेला असतो. सर्व सजीवांच्या प्रजननाचा आढावा प्रजनन नोंदीत घेतलेला आहे. पुढील नोंद मानवी प्रजननाविषयी आहे. मानवामध्ये प्रजनन लैंगिक पद्धतीने घडून येते. प्रजननासाठी आवश्यक असलेली इंद्रिये…

यकृत पर्णकृमी (Liver fluke)

यकृत पर्णकृमीचा समावेश चपटकृमी संघाच्या ट्रिमॅटोडा वर्गाच्या डायजेनिया कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव फॅसिओला हेपॅटिका आहे. हा पर्णकृमी अंत:परजीवी असून त्याचे जीवनचक्र मेंढी आणि गोगलगाय या दोन पोशिंद्यामध्ये पूर्ण होते.…

मोनेरा सृष्टी (Monera kingdom)

सजीवांच्या पंचसृष्टींपैकी एक सृष्टी. मोनेरा सृष्टीत आदिकेंद्रकी व एकपेशीय सजीवांचा समावेश होतो. या सजीवांना जीवाणू (बॅक्टेरिया) म्हणतात. १८६६मध्ये एर्न्स्ट हाइन्रिख हेकेल या वैज्ञानिकाने मोनेरा ही संज्ञा वापरली. जीवाणू हे सूक्ष्मदर्शी…

मुंगीखाऊ (Ant–eater)

ज्या प्राण्यांच्या आहारात मुख्यत: मुंग्यांचा किंवा वाळवीचा समावेश होतो, अशा प्राण्यांना मुंगीखाऊ म्हणतात. हे सर्व सस्तन प्राणी आहेत. या प्राण्यांमध्ये दातांची कमी संख्या, शरीरावर दाट केस, खवले, लांब व चिकट…

मानवाची उत्क्रांती (Evolution of Man)

स्तनी वर्गातील नरवानर गणात आधुनिक मानवाचा समावेश होतो. नरवानर गणातील आता अस्तित्वात नसलेल्या पूर्वजांपासून आधुनिक मानवाची उत्क्रांती झाली आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या या दीर्घ प्रक्रियेला सु. ६० लाख वर्षांचा कालावधी लागलेला…

मांजर (Cat)

एक सर्वपरिचित सस्तन प्राणी. स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील फेलिडी (मार्जार) कुलात मांजराचा समावेश केला जातो. सिंह, वाघ व चित्ता हे मार्जार कुलातील वन्य प्राणी आहेत. जगात सर्वत्र मांजरे दिसून येतात.…

मत्स्य अधिवर्ग (Superclass Pisces)

रज्जुमान संघातील जलचर प्राण्यांचा अधिवर्ग. मत्स्य अधिवर्गात माशांचा समावेश होत असून त्यांना सामान्यपणे मत्स्य, मीन किंवा मासा म्हणतात. मासे अनियततापी म्हणजे थंड रक्ताचे असून ते कल्ल्यांनी श्‍वसन करतात. पोहण्यासाठी आणि…

भूऔष्णिक ऊर्जा (Geothermal energy)

पृथ्वीच्या कवचात निसर्गत: आढळणारी उष्णता म्हणजेच भूऔष्णिक ऊर्जा. ही ऊर्जा भूकवचाच्या खडकातील विभंग आणि उष्ण जागा यांमध्ये उपलब्ध असते. भूपृष्ठभागाखाली खोलवर शिलारस वितळलेल्या अवस्थेत असतो. या शिलारसामुळे पृष्ठभागाखाली काही किमी.…

मेद (Lipids)

शरीराला ऊर्जा पुरविणाऱ्या पोषकद्रव्यांच्या कर्बोदके, मेद आणि प्रथिने या तीन मुख्य गटांपैकी एक गट. सर्व सजीवांच्या पेशींमध्ये निरनिराळे मेद पदार्थ असतात. निरनिराळ्या पेशींमध्ये त्यांचे प्रमाण कमीजास्त असून शरीराच्या विविध कार्यांसाठी…

म्हैस (Water buffalo)

समखुरी गणातील बोव्हिडी कुलाच्या बोव्हिनी उपकुलातील एक सस्तन प्राणी. मादीला म्हैस तर नराला रेडा म्हणतात. भारतीय रेड्यांचा वापर पाणी वाहून नेण्यासाठी अनेक वर्षे होत असल्याने ब्रिटिशांनी भारतातील म्हशींना ‘वॉटर बफेलो’…