रक्तचंदन (Red sandalwood)

रक्तचंदन वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव टेरोकार्पस सँटॅलीनस आहे. दक्षिण भारताच्या पूर्व घाटातील परिसरात हा वृक्ष आढळून येतो. श्रीलंका ते फिलिपीन्स या देशांच्या दरम्यान असलेल्या देशांमध्येही तो दिसून…

रज्जुमान संघ (Phylum chordata)

प्राणिसृष्टीचा एक संघ. रज्जुमान संघात सु. ५३,००० पेक्षा अधिक जातींचा समावेश केला गेला आहे. या संघातील सर्व प्राण्यांच्या शरीरात जीवनचक्रामध्ये कोणत्या तरी एका टप्प्याला पाठीच्या भागात एक ताठ व दांड्यासारखी…

रुई (Giant milkweed)

एक सर्वपरिचित फुलझाड. रुई वनस्पती ॲपोसायनेसी कुलाच्या ॲस्क्लेपीएडेसी उपकुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव कॅलॉट्रॉपिस जायगँशिया आहे. ती मूळची कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, थायलंड, श्रीलंका, चीन व भारत या देशांतील आणि…

रास्ना (Vanda)

सपुष्प वनस्पतींपैकी एक औषधी वनस्पती. रास्ना ही वनस्पती ऑर्किडेसी कुलातील असून ती व्हँडा रॉक्सबर्घाय किंवा व्हँडा टेसेलॅटा अशा शास्त्रीय नावांनी ओळखली जाते. ती भारत, चीन व श्रीलंका या देशांमध्ये आढळते. व्हँडा …

रासबेरी (Mysore raspberry)

रासबेरी वनस्पती रोझेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव रूबस निव्हियस आहे. रू. लॅसिओकार्पस  या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. गुलाब व ब्लॅकबेरी या वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. रासबेरीला गौरीफल असेही…

रावस (Indian salmon)

रावस माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या पर्सिफॉर्मीस गणाच्या पॉलिनीमिडी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एल्युथेरोनीमा टेट्राडॅक्टिलस आहे. भारतात तो पूर्व किनाऱ्यावर ओडिशा व पश्‍चिम बंगाल या राज्यांत, तर पश्‍चिम किनाऱ्यावर…

रायआवळा (Star gooseberry)

रायआवळा ही वनस्पती फायलँथेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव फायलँथस ॲसिडस असे आहे. सिक्का ॲसिडा  या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. ती मूळची मादागास्कर येथील असून आशिया, अमेरिका तसेच कॅरेबियन…

रामेठा (Woolly headed gnidia)

रामेठा ही वनस्पती थायमेलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लॅसिओसायफन एरिओसेफॅलस आहे. ती पश्‍चिम घाटातील महाबळेश्‍वरपासून केरळपर्यंत समुद्रसपाटीपासून सु. २,५०० मी. उंचीपर्यंतच्या डोंगराळ भागांत आढळून येते. ती श्रीलंका येथेही आढळते.…

रामफळ (Bullock’s heart)

रामफळ या पानझडी वृक्षाचा समावेश ॲनोनेसी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव ॲनोना रेटिक्युलॅटा आहे. सीताफळ व हिरवा चाफा या वनस्पतीही ॲनोनेसी कुलातील आहेत. रामफळ हा वृक्ष मूळचा वेस्ट इंडीजमधील…

रातराणी (Night queen)

सुगंधी फुले येणारे एक झुडूप. रातराणी ही बहुवर्षायू वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेस्ट्रम नॉक्टर्नम आहे. बटाटा व मिरची या वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहेत. रातराणी मूळची दक्षिण अमेरिकेच्या…

राजहंस (Swan)

ॲनॅटिडी या पाणपक्ष्यांच्या कुलातील ॲन्सरिनी या उपकुलाच्या सिग्नस प्रजातीतील पक्ष्यांना राजहंस म्हणतात. जगभरात राजहंस पक्ष्याच्या ६–७ जाती आढळतात. प्रामुख्याने तो समशीतोष्ण प्रदेशात आढळतो. त्याच्या चार जाती उत्तर गोलार्धात, एक जाती…

राजगिरा (Red amaranth)

पालेभाजीसाठी तसेच पौष्टिक बियांसाठी लागवड केली जाणारी एक सपुष्प वनस्पती. राजगिरा ॲमरँटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲमरँथस क्रूएंटस आहे. ती मूळची आशिया आणि आफ्रिका येथील आहे. ॲमरँथस  प्रजातीत सु.…

रांजा (Skate)

कास्थिमत्स्य वर्गातील राजीफॉर्मीस उपगणातील ऱ्हिनोबॅटिडी कुलातील एक खाद्य मासा. त्याचे शास्त्रीय नाव ऱ्हिंकोबॅटस जीडेन्सीस आहे. भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यावर ते आढळतात. मुंबईत तो लांग या नावाने ओळखला जातो. त्याचा…

रबर वृक्ष ( Rubber tree)

एक चिकाळ वनस्पती. रबर वृक्ष यूफोर्बिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव हेविया ब्राझीलिएन्सिस आहे. या वृक्षापासून मिळणाऱ्या चिकासारख्या पदार्थालाही रबर म्हणतात. एरंड ही वनस्पतीही यूफोर्बिएसी कुलातील आहे. रबर वृक्ष मूळचा…

रताळे (Sweet potato)

एक सर्वपरिचित कंदमूळ. रताळे ही वनस्पती कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आयपोमिया बटाटाज आहे. ती मूळची दक्षिण अमेरिकेतील असून इ.स.पू. ८००० वर्षांपासून लागवडीखाली आहे. कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलात सु. ५० हून…