मेंढी (Sheep)

स्तनी वर्गाच्या समखुरी (आर्टिओडॅक्टिला) गणातील बोव्हिडी कुलाच्या कॅप्रिनी उपकुलात मेंढीचा समावेश होतो. तिचे शास्त्रीय नाव ओव्हिस एरिस आहे. शीप ही संज्ञा ओव्हिस प्रजातीतील अनेक जातींसाठी वापरली जाते. भारतात मात्र ओव्हिस…

मॅहॉगनी (Indian mahogany)

मॅहॉगनी हा पानझडी वृक्ष मेलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव स्वाएटेनिया मॅहॉगनी आहे. तो मूळचा मध्य अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथील आहे. स्वाएटेनिया प्रजातीतील स्वाएटेनिया मॅक्रोफिला आणि स्वाएटेनिया ‍ह्यूमिलिस या…

मृगळ (Mrigala)

मृगळ या माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनिडी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव सिऱ्हिनस मृगाला आहे. मृगाला हा शब्द बंगाली भाषेतील आहे. मृगळ हा गोड्या पाण्यातील मासा असून…

मूग (Moong bean)

मूग ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना रेडिॲटा आहे. ती मूळची भारतीय उपखंडातील असून भारत, चीन आणि दक्षिण आशियातील काही देशांत तिची लागवड होते. हिमालयात ती…

मुसळी, सफेद (Indian spider plant)

सफेद मुसळी ही उष्ण प्रदेशाच्या आर्द्र वनातील वनस्पती आहे. ती ॲस्पॅरागेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लोरोफायटम बोरिविलियानम आहे. चोपचिनी ही वनस्पतीही ॲस्पॅरागेसी याच कुलातील आहे. सफेद मुसळी मूळची भारतातील…

मुशी (Dogfish)

कास्थिमत्स्य वर्गातील सेलेची उपवर्गाच्या प्लुरोट्रिमॅटा गणात शार्क माशांचा समावेश होतो. कॅरकॅऱ्हिनस प्रजातीतील शार्कच्या लहान जातींना मुशी म्हणतात. मुशी हा सागरी मासा भारत, पाकिस्तान, चीन, जपान, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, इंडोनेशिया इत्यादी…

मुळा (Radish)

एक पालेभाजी. मुळा हे क्षुप ब्रॅसिकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव रॅफॅनस सटायव्हस आहे. मोहरी व कोबी या वनस्पतीही ब्रॅसिकेसी कुलातील आहेत. मुळा वनस्पतीचे मूलस्थान पश्‍चिम आशिया असावे, कारण वन्य…

मुरडशेंग (Indian screw tree)

एक उपयुक्त औषधी आणि धाग्यांसाठी वापरली जाणारी वनस्पती. मुरडशेंग ही वनस्पती स्टर्क्युलिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हेलिक्टेरिस आयसोरा आहे. तिला केवण असेही म्हणतात. भारत, चीन, मलेशिया, सौदी अरेबिया आणि…

मुचकुंद (Dinner plate tree)

मुचकुंद हा सदाहरित वृक्ष स्टर्क्युलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टेरोस्पर्मम ॲसरिफोलियम आहे. टेरोस्पर्मम सुबरिफोलियम या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. मुचकुंद हा वृक्ष मूळचा दक्षिण आशियातील भारत ते म्यानमार…

मुंगूस (Mongoose)

एक सस्तन प्राणी. मुंगसाचा समावेश स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील मांसाहारी गणाच्या हर्पेस्टिडी कुलात होतो. आफ्रिकेत, आशियात आणि यूरोपात मिळून त्यांच्या ३३ जाती आढळतात. त्यांपैकी बऱ्याच जाती आफ्रिकेत आढळतात. भारतात त्यांच्या…

मुंगी (Ant)

सर्वांना परिचित असलेला उपद्रवी संधिपाद कीटक. मुंगी हा कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणाच्या फॉर्मिसिडी कुलातील प्राणी आहे. या गणात मधमाश्या, गांधील माश्या, भुंगे इ. कीटकांचा समावेश होतो. जगात सर्वत्र मुंग्या आढळतात.…

मिरी (Black pepper)

जगात सर्वत्र वापरण्यात येणारा मसाल्यातील एक पदार्थ. मिरी ही बहुवर्षायू वेल पायपरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पायपर नायग्रम आहे. ही आरोही वनस्पती मूळची दक्षिण भारतातील असून ती भारतात नैर्ऋत्येकडील…

मिरची (Chilli)

जगात सर्वत्र मसाल्यांमध्ये वापरला जाणारा एक पदार्थ. मिरची ही वनस्पती सोलॅनेसी कुलाच्या कॅप्सिकम प्रजातीतील आहे. बटाटा व टोमॅटो या वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहेत. मिरची ही मूळची अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून…

मिज माशी (Midge fly)

ज्वारीच्या पिकावर वाढणारा एक उपद्रवी कीटक. मिज माशीचा समावेश कीटक वर्गाच्या डिप्टेरा गणात केला जातो. तिची ३०–३४ कुले आहेत. त्यांपैकी सीसिडोमाइडी कुलातील काही जातींच्या माश्या गहू, ज्वारी व बाजरी यांसारख्या…

मालती (Common myrtle)

मालती ही सुगंधी वनस्पती मिर्टेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मिर्टस कॉम्युनिस आहे. मिर्टस प्रजातीत केवळ दोन जाती असून त्यांपैकी ही जाती भारतात आढळते. मालती ही वनस्पती मूळची भूमध्य सागरी…