गायन समाज देवल क्लब (Gayan Samaj Deval Club)
अभिजात हिंदुस्थानी संगीत, नृत्य व नाट्य यांचे प्रशिक्षण देणारी व सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करणारी कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील विख्यात संगीतसंस्था. सुरुवातीस केवळ गाण्यावरील प्रेमापोटी विश्वनाथराव गोखले, त्र्यंबकराव दातार, गोविंदराव देवल, नातू…
