मगर (Crocodile)

मगरीचा समावेश सरीसृप वर्गाच्या क्रोकोडिलिया गणात होतो. आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडांत मगरी आढळून येतात. क्रोकोडिलिया गणात ॲलिगेटर, केमन व घडियाल या सरीसृप प्राण्यांचा समावेश करतात. ॲलिगेटर अमेरिका व…

भोकर (Assyrian plum)

बोरॅजिनेसी कुलातील भोकर या पानझडी वृक्षाचे शास्त्रीय नाव कॉर्डिया मिक्सा आहे. रक्तमूळ व भुरुंडी या वनस्पतीदेखील याच कुलात समाविष्ट आहेत. या वृक्षाला ‘इंडियन चेरी’ असेही म्हणतात. भोकर मूळचा चीनमधील असून…

ब्राह्मी (Indian pennywort)

ब्राह्मी ही वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्रीय नाव हायड्रोकॉक्टिल एशियाटिका आहे. सेंटेला एशियाटिका या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. ती मूळची आशियाच्या पाणथळ प्रदेशांतील असून विशेषकरून भारतात आणि श्रीलंकेत…

बुगनविलिया (Bougainvillea)

निक्टॅजिनेसी कुलातील बुगनविलिया प्रजातीमधील वनस्पतींना सामान्यपणे बुगनविलिया किंवा बोगनवेल म्हणतात. या प्रजातीत ४–१८ जाती असाव्यात, असे मानतात. ही वनस्पती मूळची ब्राझील (दक्षिण अमेरिका) येथील असून जगात सर्वत्र शोभेसाठी वाढविली जाते.…

बचनाग (Aconite)

रॅनन्क्युलेसी कुलातील ॲकोनिटम प्रजातीमधील दोन जाती भारतात बचनाग या नावाने ओळखल्या जातात. काळे तीळ, रानजाई व घाट लार्कस्पर या वनस्पतीही रॅनन्क्युलेसी कुलातील आहेत. ॲकोनिटम प्रजातीतील वनस्पती यूरोप आणि अमेरिकेतील थंड…

प्रथिने (Proteins)

प्रथिने ही संज्ञा व्यावहारिक भाषेत अन्नातील एक मुख्य घटक दाखविण्यासाठी वापरली जाते. कर्बोदके, मेद, जीवनसत्त्वे, खनिजे यांप्रमाणे प्रथिने सजीवांच्या अन्नाचा एक घटक आहेत. रासायनिकदृष्ट्या प्रथिने ही नायट्रोजनयुक्त संयुगे आहेत. या…

भूकंप (Earthquake)

एक नैसर्गिक पर्यावरणीय आपत्ती. पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ निर्माण होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक व जाणवण्याइतक्या बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात. भूकंपाचा धक्का कधीकधी एवढा जोरदार असतो की, त्यामुळे मोठमोठ्या इमारती…

भरती ऊर्जा (Tidal energy)

भरती-ओहोटी ऊर्जेचे उपयुक्त ऊर्जेत विशेषेकरून विजेत केलेले रूपांतरण. जलविद्युत्‌ ऊर्जेचा हा एक प्रकार असून भरती ऊर्जा हा नूतनक्षम ऊर्जेचा स्रोत आहे. दर दिवशी ठराविक वेळी समुद्राचे पाणी समुद्रकिनाऱ्याला पुढे येते…

फुलपाखरू (Butterfly)

सर्व कीटकांमधील आकर्षक कीटक. फुलपाखरे जगात सर्वत्र आढळतात. उष्ण प्रदेशांतील वर्षावनांत त्यांचे सर्वाधिक प्रकार आढळतात. त्यांचे पंख नाजूक व विविधरंगी असल्यामुळे ती मोहक दिसतात. फुलपाखरांचा समावेश कीटक वर्गाच्या लेपिडॉप्टेरा म्हणजे…

फळ (Fruit)

सपुष्प वनस्पतीतील बीजे धारण करणाऱ्या अवयवाला फळ म्हणतात. फुले आल्यानंतर त्यातील अंडाशयापासून फळ तयार होते. फळाचे फलभित्ती आणि बीज (बी, बिया) असे दोन भाग केले जातात. फलभित्ती अंडाशयाच्या भित्तीपासून बनलेली…

फंजाय सृष्टी (Fungi kingdom)

सजीवांच्या पंचसृष्टीपैकी एक सृष्टी. वनस्पती, प्राणी, प्रोटिस्टा आणि मोनेरा या सृष्टींपेक्षा फंजाय सृष्टी वेगळी मानली गेली आहे. या सृष्टीत दृश्यकेंद्रकी व एकपेशीय यीस्ट आणि बुरशी या सूक्ष्मजीवांचा तसेच दृश्यकेंद्रकी व…

प्लेग (Plague)

जीवाणूंमुळे मनुष्याला होणारा एक प्राणघातक संक्रामक रोग. एंटेरोबॅक्टेरिएसी कुलातील यर्सिनिया पेस्टिस  या जीवाणूंमुळे प्लेग हा रोग होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २००७ सालापर्यंत प्लेग हा एक साथीचा आजार मानला जात…

प्लीहा (Spleen)

सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये आढळणारे एक इंद्रिय. प्लीहा हे मनुष्याच्या लसीका संस्थेतील सर्वांत मोठे इंद्रिय असून ते उदरपोकळीच्या डाव्या बाजूला नवव्या आणि बाराव्या बरगड्यांदरम्यान असते. तिचा आकार साधारणपणे त्या व्यक्तीच्या मुठीएवढा…

मानवी जीनोम प्रकल्प (Human genome project)

मानवाची म्हणजे होमो सेपियन्सची संपूर्ण जनुकीय माहिती मिळविण्यासाठी राबविलेला एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प. मानवाची जनुकीय माहिती डीएनए क्रमांच्या स्वरूपात २३ गुणसूत्रांच्या जोड्यांमध्ये साठविलेली असते. या प्रकल्पात मानवाची गुणसूत्रे व तंतुकणिका…

मानव (Human)

मानवाचा समावेश स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील होमिनिडी कुलात करण्यात येतो. या कुलात लुप्त पूर्वगामी आणि आधुनिक मानवाचा समावेश होतो. मानवाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात येते; सृष्टी: प्राणी, संघ: रज्जुमान, उपसंघ: पृष्ठवंशी,…