प्राणिविज्ञान (Zoology)

जीवविज्ञान विषयातील ही एक शाखा असून या शाखेत प्राणिसृष्टीचा सांगोपांग अभ्यास केला जातो. प्राणिविज्ञान ज्ञानशाखेत अस्तित्वात असलेल्या तसेच विलुप्त झालेल्या प्राण्यांची संरचना, भ्रूणविज्ञान, उत्क्रांती, वर्गीकरण, प्राण्यांच्या सवयी, वितरण आणि परिसंस्थांबरोबर…

पौगंडावस्था (Adolescence)

मुलामुलींचे बालपण संपून तारुण्य सुरू होईपर्यंतच्या संक्रमण कालावधीला सामान्यपणे पौगंडावस्था म्हणतात. किशोरावस्था किंवा कुमारावस्था म्हणून ओळखला जाणारा हा काळ वयाच्या १०–१८ वर्षांदरम्यानचा असतो. वयात येत असताना मुलामुलींच्या जीवनातील हा काळ…

पोलिओ (Polio)

विषाणूंमुळे होणारा एक तीव्र व संक्रामक रोग. पोलिओचे विषाणू मेंदू व मेरुरज्जूतील चेतापेशींना हानी पोहोचवतात आणि त्यामुळे आंशिक किंवा पूर्ण पक्षाघात होऊ शकतो. प्रामुख्याने लहान बालके या रोगाला संवेदनशील असून…

पोफळी (Areca nut tree)

नारळासारखा दिसणारा आणि त्याच्यासारखा उंच व सरळ वाढणारा एक वृक्ष. पोफळी वृक्ष अॅरॅकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अॅरेका कॅटेचू आहे. सामान्य भाषेत या वृक्षाला व त्याच्या फळांना सुपारी असे…

पोपट (Parrot)

इंग्रजी भाषेत पॅरट, लोरिकीट आणि पॅराकीट अशी सामान्य नावे असलेल्या पक्ष्यांना मराठी भाषेत ‘पोपट’ म्हणतात. पक्षिवर्गाच्या सिटॅसिफॉर्मिस गणात (शुक गण) पोपटांचा समावेश केला जातो. या गणात सु. ७६ प्रजाती आणि…

पोकळा (Amaranth)

अॅमरँटेसी कुलातील या वर्षायू क्षुपाचे शास्त्रीय नाव अॅमरँथस ब्लायटम आहे. ही वनस्पती मूळची भूमध्य समुद्र प्रदेशातील आहे. अनेक ठिकाणी ती तणासारखी वाढलेली दिसून येते. हिरवा पोकळा आणि तांबडा पोकळा असे…

पेरू (Guava)

पेरू हा सदाहरित वृक्ष मिर्टेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिडियम गुयाव्हा आहे. लवंग, निलगिरी व मिरी या वनस्पतीदेखील या कुलात समाविष्ट आहेत. पेरू मूळचा मेक्सिकोतील व मध्य अमेरिकेतील असून…

पुनर्नवा (Spreading hogweed)

पुनर्नवा ही वनस्पती निक्टॅजिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बोऱ्हॅविया डिफ्यूजा आहे. गुलबक्षी व बुगनविलिया वनस्पतीही याच कुलातील आहेत. भारतात बोऱ्हॅविया  प्रजातीच्या सहा जाती आढळतात. पुनर्नवा ही बहुवर्षायू वनस्पती कोठेही…

पुदिना (Corn mint)

पुदिना ही लॅमिएसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव मेंथा अर्व्हेन्सिस आहे. तुळस व सब्जा या वनस्पतीदेखील याच कुलात समाविष्ट आहेत. जगात सर्वत्र मेंथा प्रजातीच्या १३–१८ जाती असून भारतात मेंथा…

पुत्रजीवी (Putrajiva)

पुत्रजीवी हा सदाहरित वृक्ष पुत्रंजिव्हेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव पुत्रंजीवा रॉक्सबर्गाय आहे. तो मूळचा भारत आणि श्रीलंका येथील पर्जन्यवनांतील असून पूर्वी त्याचा समावेश यूफोर्बिएसी कुलात होत असे. पुत्रजीवी हा…

पिस्ता (Pistachio)

पिस्ता हा पानझडी वृक्ष अॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव पिस्टाशिया वेरा आहे. आंबा, काजू व बिब्बा या वनस्पतीही ॲनाकार्डिएसी कुलातील आहेत. पिस्ता मूळचा मध्य आशिया आणि मध्य-पूर्व प्रदेश या…

पिसे (Feathers)

पिसे ही पक्ष्यांच्या बाह्यत्वचेवरील वाढ असून त्यांचे शरीरावर वैशिष्ट्यपूर्ण आवरण असते. पिसांमुळे पक्ष्यांचे शरीर झाकले जाते आणि शरीराला विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्यांच्या साहाय्याने पक्षी उडतात, उडत असताना झेप, दिशा…

पिसू (Flea)

एक लहान व पंख नसलेला बाह्य परजीवी कीटक. पंख नसलेल्या आणि ज्यांची मुखांगे त्वचा भेदून रक्त ओढण्यासाठी अनुरूप असतात, अशा कीटकांचा समावेश कीटक वर्गाच्या ‘सायफनॅप्टेरा’ या गणात केला जातो. या…

पिवळा कांचन (Yellow orchid tree)

फॅबेसी कुलाच्या सिसॅल्पिनीऑइडी उपकुलातील काही वनस्पती कांचन या नावाने ओळखल्या जातात. त्यांपैकी पिवळा कांचन, कांचन, रक्त कांचन आणि सफेद कांचन या जाती महत्त्वाच्या आहेत. या वनस्पतींच्या फुलांच्या रंगांवरून त्यांना मराठी…

पारिस्थितिकी (Ecology)

पारिस्थितिकी ही जीवविज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत सजीवांचा एकमेकांशी तसेच सजीवांचा पर्यावरणाशी असलेला आंतरसंबंध यांचा अभ्यास आणि विश्लेषण केले जाते. सजीवांचे एकमेकांशी संबंध कसे असतात, त्यांचा एकमेकांवर कसा परिणाम…