बुलबुल (Bulbul)
मनुष्यवस्तीमध्ये झाडाझुडपांवर दिसणारा व टोपी घातल्यासारखा वाटणारा लांब शेपटीचा एक पक्षी. बुलबुल पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस गणातील पिक्नोनोटिडी कुलात होतो. पिक्नोनोटस प्रजातीतील सर्व पक्ष्यांना सामान्यपणे बुलबुल म्हणतात. भारतात पिक्नोनोटस कॅफर…