टाॅमस अल्वा एडिसन (Thomas Alva Edison)
एडिसन, टाॅमस अल्वा (११ फेब्रुवारी,१८४७ ते १८ ऑक्टोबर,१९३१). अमेरिकन संशोधक. तारायंत्र, ग्रामोफोन, प्रदीप्त दिवा (बल्ब), वीज पुरवठ्याचे देशव्यापी जाळे पसरविणारे विद्युत् जनित्र, चलच्चित्रपट प्रक्षेपक (सिनेमा प्रोजेक्टर), प्रत्याभरण (चार्जिंग) करता येणारी…