सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर (Incremental Capital Output Ratio – ICOR)

विकसनशील देशांच्या संदर्भात विशेषत्वाने वापरली जाणारी एक अर्थशास्त्रीय संकल्पना. भांडवल उत्पादन गुणोत्तर मुख्यत्वे दोन प्रकारचे आहेत. एक सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर (ACOR) आणि दुसरे सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर (ICOR). यांपैकी…

लॉरेन्झ वक्र (Lorenz Curve)

प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ मॅक्स ओ. लॉरेन्झ यांनी १९०५ मध्ये उत्पन्न अथवा संपत्ती यामधील असमान वितरण दर्शविण्यासाठी ज्या आकृतिबंधाची मांडणी केली, त्यास ‘लॉरेन्झ वक्र’ म्हणतात. लॉरेन्झ वक्रामधील फलन सामान्यपणे आकृतिबंधातील आडव्या…

पर्यावरणीय लेखापरीक्षण (Environmental Audit)

कंपनी, आस्थापना, संस्था, संघटना इत्यादींच्या कामगिरीचे पर्यावरणासंदर्भात मूल्यमापन करणे म्हणजे पर्यावरणीय लेखापरीक्षण होय. हे औद्योगिक उत्पादन व प्रक्रियांचे पर्यावरणाच्या दृष्टीने होणारे लेखापरीक्षण आहे. भारतातील पर्यावरण संरक्षण अधिनियम १९७० अनुसार पर्यावरणीय…

औद्योगिक आणि वित्तीय पुनर्रचना मंडळ (Board of Industrial and Financial Reconstruction – BIFR)

भारतातील आजारी औद्योगिक आस्थापनांचे आजारपण निश्चित करणे आणि संभाव्य आस्थापनांचे पुनरुज्जीवन करणे यांसाठी निर्माण केलेले मंडळ. १९८०च्या दशकातील भारतातील औद्योगिक क्षेत्रातील आजारी उद्योगांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीकडे लक्ष केंद्रीत होऊन सरकारने…

प्रदूषण कर (Pollution Tax)

प्रदूषण कर ही पर्यावरणातील प्रदूषण कमी करणे आणि त्याचा पर्यावरणावरील नकारात्मक परिणाम कमी करणे यांसाठी आर्थिक घटकांची संरचना होय. प्रदूषण कर हे प्रदूषणनियंत्रणावरील उपाय म्हणून व्यापक प्रमाणात वापरले जाणारे साधन…