भारत-पाकिस्तान युद्ध, १९४७ (Indo-Pak War, 1947)

पार्श्वभूमी : ३ जून १९४७ रोजी ब्रिटिश सरकारने ‘भारतीय स्वातंत्र्य कायद्या’ला संमती देऊन ब्रिटिश इंडियाची फाळणी भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशांत करण्याची घोषणा केली. या कायद्यानुसार ब्रिटिश इंडियातील…

भारत-पाकिस्तान युद्ध, १९६५ (Indo-Pak War, 1965)

पार्श्वभूमी : काश्मीर हे पाकिस्तानात विलीन व्हावे ही सुप्त इच्छा १९४७-४८च्या युद्धानंतरसुद्धा पाकिस्तानने जोपासली होती आणि काश्मीर पादाक्रांत करण्याची संधीच पाकिस्तानचे नेते शोधीत होते. १९६५च्या लढाईला खालील गोष्टी कारणीभूत ठरल्या.…

कारगिल युद्ध : १९९९ (Kargil War : 1999)

पार्श्वभूमी : १९४७, १९६५ आणि १९७१ या लढायांमध्ये काश्मीरला भारतापासून तोडण्याचे निष्फळ प्रयत्न पाकिस्तानने केले होते. १९८६ सालापासून सियाचीन हिमनदाच्या ताब्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पाकिस्तानचा सियाचीन हिमनदाचा ताबा घेण्याचा…

इंग्रज-शीख युद्ध, पहिले (First Anglo-Sikh War)

भारतातील साम्राज्यविस्ताराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी शिखांविषयी अवलंबिलेले धोरण व त्यातून उद्भवलेले दोन युद्धे भारताच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी १८४५-४६ साली झालेले हे पहिले युद्ध. पार्श्वभूमी : रणजीतसिंगांनी आपल्या वडिलांच्या जहागिरीचे एका…

पालखेडचा संग्राम (Battle of Palkhed)

पहिला बाजीराव आणि निजाम-उल-मुल्क यांच्यामध्ये १७२८ साली औरंगाबादच्या नैऋत्येस २८ मैलांवर (सु. ४५ किमी.) असलेल्या पालखेड (गोदावरी नदीच्या तीरावर महाराष्ट्रातील सध्याच्या पुणतांबे गावाजवळ) येथे झालेला संग्राम. जगाच्या इतिहासात एक महत्त्वाची…

पर्ल हार्बरवरील हल्ला (Pearl Harbor Attack)

दुसर्‍या महायुद्धकाळात जपानने अमेरिकेतील हवाई राज्याच्या ओआहू बेटावरील नाविक तळावर दि. ७ डिसेंबर १९४१ रोजी अनपेक्षितपणे केलेला हवाई हल्ला. पार्श्वभूमी : जर्मनी, इटली आणि जपान या तीन अक्ष (Axis) राष्ट्रांमध्ये…

१९६२ च्या पराभवाचे विश्लेषण (Analysis of the defeat of 1962)

प्रामुख्याने भारताच्या अग्रवर्ती धोरणाला प्रतिसाद म्हणून चिनी सैन्याने २० ऑक्टोबर १९६२ रोजी तवांग विभागात केलेल्या हल्ल्याने आरंभ झालेल्या भारत-चीन युद्धाची समाप्ती २० नोव्हेंबरला चिन्यांच्या एकतर्फी युद्धबंदीच्या घोषणेने झाली. भारतीय सैन्याचा…

दिएन-बिएन फूची लढाई (Battle of Dien-Bien Phu)

हे उत्तर व्हिएटनाममधील एक रणक्षेत्र असून तिथे दि. १३ मार्च ते ८ मे १९५४ दरम्यान वसाहतवादी फ्रेंच सैन्य आणि आधुनिक कम्युनिस्ट व्हिएटनामचे सर्वेसर्वा निर्माते हो-चि-मिन्ह यांच्या स्वातंत्र्यसेनेमध्ये झालेले घनघोर युद्ध.…

असलउत्तरची लढाई (Battle of Asaluttar)

भारत- पाकिस्तान १९६५ च्या युद्धामधील एक लढाई. पार्श्वभूमी : पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील खेमकरन या गावापासून पाच किमी. दूर असलेले असलउत्तर हे एक खेडेगाव. १९६५ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सर्वश्रेष्ठ रणगाड्यांच्या तुकडीचा येथे…

लोंगेवालाची लढाई (Battle of Longewala)

भारत-पाकिस्तान १९७१ च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : नोव्हेंबर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान हातातून जाणार याची जाणीव झाल्यानंतर भारताच्या पश्चिम सीमेवरील जास्तीत जास्त प्रदेश काबीज करून युद्धसमाप्तीनंतर होणाऱ्या वाटाघाटीदरम्यान आपले पारडे…

परभारी युद्ध (Proxy War)

ज्या दोन देशांमधील संघर्षात एक किंवा दोन्ही प्रतिस्पर्धी वेगवेगळ्या कारणांसाठी एकमेकांशी प्रत्यक्ष युद्ध करण्याचे टाळतात; परंतु आपले उद्दिष्ट त्यांना अनुकूल असलेल्या दुसऱ्या संघटनेमार्फत साधण्याचा प्रयत्न करतात, त्याला परभारी युध्द अशी…

पानिपतची तिसरी लढाई (Third Battle Of Panipat)

पार्श्वभूमी : अफगाणिस्तानच्या पातशाहाने संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या आधिपत्याखाली आणल्यावर मुघल सत्तेवर स्वारी करण्याचे त्याने ठरविले आणि अफाट सैन्य घेऊन १७६० साली तो खैबर खिंडीतून पेशावरमार्गे पंजाब प्रांत पार करून दिल्लीवर…

बार्बारोसाची लढाई (Battle of Barbarossa)

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी-रशिया यांत झालेले (दि. २२ जून १९४१–६ डिसेंबर १९४१) युद्ध. या मोहिमेला ‘बार्बारोसा मोहीम’ हे सांकेतिक नाव दिले होते; तर रशियाचे इतिहासकार मात्र त्याला महान देशभक्तीचे युद्ध (Great…

भोपाळची लढाई (Battle of Bhopal)

मोगलांचे, विशेषत: निजाम-उल्-मुल्क व मराठे यांत झालेले इ. स. १७३७-३८ दरम्यानचे युद्ध. पार्श्वभूमी : निजाम-उल्-मुल्कला दिल्लीमध्ये बोलावून त्याचा जंगी सत्कार करण्यात आला. पहिल्या बाजीरावांचा निर्णायक पराभव करण्यासाठी त्याला बादशाहाने ३४,०००…

कांगावची लढाई (Battle of Kangaw)

पार्श्वभूमी : जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर हल्ला करून दुसऱ्या महायुद्धात आपला सहभाग नोंदविला होता. तोपर्यंत युरोप, रशिया आणि उत्तर आफ्रिका यांतच लढाई सीमित होती. जपानने आशियात ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधात रणशिंग…

  • 1
  • 2
Close Menu
Skip to content