(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : प्रीती सांळुंके
कोणत्याही रोगाची चिकित्सा, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध यांचा संकलित अभ्यास करणारे विज्ञानाधिष्ठित शास्त्र म्हणजे वैद्यकशास्त्र होय. याकरिता वैद्य, परिचारिका आणि इतर तज्ञ एकत्रित कार्यरत असतात.
वैद्यकशास्त्राच्या नवजात शिशुविज्ञान (Neonatology), बालरोगविज्ञान (Paediatrics), प्रसूतिविद्या आणि स्त्रीरोगविज्ञान (Obstetrics & Gynaecology), शरीरशास्त्र (Anatomy), नेत्रविज्ञान (Ophthalmology), कर्ण-नासिका-कंठ चिकित्सा (Ear, Nose and Throat Surgery), जठरांत्रविज्ञान (Gastroenterology), हृद्रोगविज्ञान (Cardiology),अंत:स्रावविज्ञान (Endocrinology), दंतवैद्यक (Dentistry), तंत्रिकाविज्ञान (Neurology),शरीरक्रियाविज्ञान (Physiotherapy), सामाजिक वैद्यक (Community Medicine) अशा अनेक शाखा-उपशाखा आहेत.
वैद्यकीय चिकित्सेकरिता क्ष-किरण, प्रतिमादर्शन, आधुनिक यंत्र व्यवस्था अशी अनेक तंत्रे विकसित झाली आहेत, ज्यामुळे रोगाचे प्राथमिक परीक्षण करणे सोपे जाते.औषधशास्त्राच्या वापराने अनेक जीवघेणे आजार बरे होतात. रोगाची लक्षणे आणि प्रसारमाध्यमे यांवरून रोगप्रतिबंधात्मक उपाय केले जातात. सामाजिक वैद्यक या शास्त्राद्वारे सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.
निरोगी आयुष्यासाठी औषध, आहार आणि व्यायाम यांचीही आवश्यकता आहे.आधुनिक वैद्यकशास्त्र याविषयामध्ये मानवी शरीराचा अभ्यास होतो. मानवी शरीराचे अवयव, अवयवसंबंधित आजार व त्यांची चिकित्सा यांचाही उल्लेख होतो. या शास्त्राद्वारे आपणांस सर्व शरीरविषयक माहिती उपलब्ध होते.
वैद्यकशास्त्र हा विषय व्यापक असल्याकारणाने त्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या अनेक संकल्पनांचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. याकरिता पूर्वप्रकाशित मराठी विश्वकोशामध्ये अनेक नोंदींवर लिखाण करण्यात आले. सदर माहितीचे अद्ययावतीकरण करून वाचकाला प्रमाणभूत शास्त्रीय माहिती एकत्रित उपलब्ध करून देण्यासाठी ‘आधुनिक वैद्यकशास्त्र’ या विषयाचे स्वतंत्र ज्ञानमंडळ तयार करण्यात आले आहे.या विषयांतर्गत मानवी अवयव, विविध शरीरसंस्था (म्हणजेच चेतासंस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था यांचेही विस्तृत वर्णन दिले आहे. तसेच विविध वैद्यकीय संकल्पना आणि वैद्यकीय उपकरणे यांचीही माहिती दिली आहे. प्रस्तुत माहिती जिज्ञासू वाचकांसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
अल्झायमर आजार (Alzheimer’s disease)

अल्झायमर आजार

वृद्ध व्यक्ती म्हणजेच ज्यांचे वय ८५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा व्यक्तींपैकी ५०% व्यक्तींमध्ये हा आजार पाहावयास मिळतो. पार्श्वभूमी ...
आपत्कालीन गर्भनिरोधन (Emergency birth control)

आपत्कालीन गर्भनिरोधन

कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता शरीरसंबंध आला तरी त्यानंतरही वापरता येण्याजोग्या गर्भनिरोधक औषधांना अथवा साधनांना आपत्कालीन गर्भनिरोधके असे म्हणतात; तर ...
ऋतुनिवृत्ती (Menopause)

ऋतुनिवृत्ती

स्त्रीची मासिक पाळी बंद होणे व जननक्षमता संपणे (त्यास विराम मिळणे) या स्थितीला ऋतुनिवृत्ती अथवा रजोनिवृत्ती असे म्हणतात. ही वयानुसार ...
कर्करोग : लक्षणे  (Cancer symptoms)

कर्करोग : लक्षणे

कर्करोग हा अनेक रोग एकत्र येऊन झालेला असतो. त्यामुळे या रोगात कोणतेही लक्षण दिसू शकते. त्याचप्रमाणे कर्करोगाची व्याप्ती किती आहे ...
कर्करोग आणि आनुवंशिकता (Cancer and heredity)

कर्करोग आणि आनुवंशिकता

आनुवंशिकता आणि कर्करोग यांचा संबंध प्राचीन काळापासून दाखवला गेला आहे. नेपोलियन बोनापार्ट हा पोटाच्या कर्करोगाने मरण पावला, याची इतिहासात नोंद ...
कर्करोगकारक घटक (Carcinogens)

कर्करोगकारक घटक

कर्करोग होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना कर्करोगकारक घटक असे म्हणतात. तंबाखूचे सेवन, आहाराबाबत वाईट सवयी तसेच काही प्रमाणात आनुवंशिकताही कर्करोगाला कारणीभूत ...
कांजिण्या (Chickenpox/Varicella)

कांजिण्या

कांजिण्या हा जगभर सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. ताप, अस्वस्थता व विशिष्ट प्रकारचे उत्‍स्फोट (पुरळ-फोड) या स्वरूपात आढळणारा ...
कोथ (Gangrene)

कोथ

आजारपणामुळे, जखमेमुळे अथवा जीवाणूबाधेमुळे शरीराच्या एखाद्या भागातील ऊती रक्तपुरवठ्याअभावी मृत होतात. त्यावर पूतिक्रिया (Putrefaction) झाली तर या अवस्थेला कोथ असे ...
गर्भनिरोधन : नैसर्गिक पद्धती (Natural birth control)

गर्भनिरोधन : नैसर्गिक पद्धती

कोणतेही साधन अथवा औषधी न वापरता गर्भधारणा टाळण्याच्या उपायांना नैसर्गिक पद्धती म्हटले जाते. प्राचीन काळापासून या पद्धती वापरल्या जातात. आजही ...
गर्भस्थ गर्भनिरोधक साधने (Intrauterine contraceptive devices, IUD)

गर्भस्थ गर्भनिरोधक साधने

अनैच्छिक गर्भधारणा टाळण्याकरिता गर्भस्थ गर्भनिरोधक साधने वापरतात. गर्भपिशवीचे अस्तर आणि स्त्रीबीजनिर्मिती, फलन आणि अस्तरामध्ये गर्भ रूजणे या सर्वांचा अतिशय नाजूक ...
गार्डनर लक्षणसमूह  (Gardner’s syndrome)

गार्डनर लक्षणसमूह

विशिष्ट आजार आणि लक्षणसमूह यांत धूसर अशी सीमा रेषा असते. आजार (Disease) हे बाह्य इजा न होता शरीराच्या एखाद्या भागामध्ये ...
जराचिकित्सा आणि जरावैद्यक (Geriatrics & Gerontology)

जराचिकित्सा आणि जरावैद्यक

वयोवृद्धपणामुळे व्यक्तींमध्ये उद्भवणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक परिणामांचा अभ्यास वैद्यकशास्त्रामध्ये केला जातो. जराचिकित्सा : (Geriatrics). वयोवृद्ध व्यक्तींची देखभाल करण्याचे ...
जागतिक अस्थिसुषिरता दिवस (World Osteoporosis Day)

जागतिक अस्थिसुषिरता दिवस

अस्थिसुषिरता या आजाराचा प्रतिबंध, निदान आणि उपचार यांबाबत जनजागृती करण्यासाठी २० ऑक्टोबर हा दिवस जागतिक अस्थिसुषिरता दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा ...
जागतिक कर्करोग दिवस (World Cancer Day)

जागतिक कर्करोग दिवस

कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग ...
जागतिक मधुमेह दिवस  (World Diabetes Day)

जागतिक मधुमेह दिवस

मधुमेह या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण ...
जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस (World Mental Health Day)

जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस

मानसिक स्वास्थ्याबद्दल जनजागृती करण्यासाठी  १० ऑक्टोबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस म्हणून साजरा करतात. सामाजिक स्तर उंचावण्याकरिता मानसिक ...
जागतिक संततिनियमन दिवस (World Contraception Day)

जागतिक संततिनियमन दिवस

कुटुंबनियोजनाच्या विविध पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करणे या हेतूने २६ सप्टेंबर हा जागतिक संततिनियमन दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. लैंगिक ...
जागतिक हिवताप दिवस (World Malaria Day)

जागतिक हिवताप दिवस

हिवताप या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा केला जातो. हिवतापाच्या समूळ ...
जागतिक हृदय दिवस (World Heart Day)

जागतिक हृदय दिवस

हृदयविकारासंबंधित जनजागृती करण्याचा दिवस म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा करतात. या दिवसाला जागतिक हृदय दिवस असे संबोधतात ...
दीर्घकालीन अवरोधी फुप्फुसरोग (Chronic Obstructive pulmonary diseases)

दीर्घकालीन अवरोधी फुप्फुसरोग

(सीओपीडी; क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज). श्वसनमार्गातील वायुप्रवाह अवरोधित करून श्वासोच्छवासास त्रास निर्माण करणाऱ्या पुरोगामी फुप्फुसाच्या रोगाचा एक गट. या आजारामध्ये ...