(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : प्रीती सांळुंके
कोणत्याही रोगाची चिकित्सा, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध यांचा संकलित अभ्यास करणारे विज्ञानाधिष्ठित शास्त्र म्हणजे वैद्यकशास्त्र होय. याकरिता वैद्य, परिचारिका आणि इतर तज्ञ एकत्रित कार्यरत असतात.
वैद्यकशास्त्राच्या नवजात शिशुविज्ञान (Neonatology), बालरोगविज्ञान (Paediatrics), प्रसूतिविद्या आणि स्त्रीरोगविज्ञान (Obstetrics & Gynaecology), शरीरशास्त्र (Anatomy), नेत्रविज्ञान (Ophthalmology), कर्ण-नासिका-कंठ चिकित्सा (Ear, Nose and Throat Surgery), जठरांत्रविज्ञान (Gastroenterology), हृद्रोगविज्ञान (Cardiology),अंत:स्रावविज्ञान (Endocrinology), दंतवैद्यक (Dentistry), तंत्रिकाविज्ञान (Neurology),शरीरक्रियाविज्ञान (Physiotherapy), सामाजिक वैद्यक (Community Medicine) अशा अनेक शाखा-उपशाखा आहेत.
वैद्यकीय चिकित्सेकरिता क्ष-किरण, प्रतिमादर्शन, आधुनिक यंत्र व्यवस्था अशी अनेक तंत्रे विकसित झाली आहेत, ज्यामुळे रोगाचे प्राथमिक परीक्षण करणे सोपे जाते.औषधशास्त्राच्या वापराने अनेक जीवघेणे आजार बरे होतात. रोगाची लक्षणे आणि प्रसारमाध्यमे यांवरून रोगप्रतिबंधात्मक उपाय केले जातात. सामाजिक वैद्यक या शास्त्राद्वारे सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.
निरोगी आयुष्यासाठी औषध, आहार आणि व्यायाम यांचीही आवश्यकता आहे.आधुनिक वैद्यकशास्त्र याविषयामध्ये मानवी शरीराचा अभ्यास होतो. मानवी शरीराचे अवयव, अवयवसंबंधित आजार व त्यांची चिकित्सा यांचाही उल्लेख होतो. या शास्त्राद्वारे आपणांस सर्व शरीरविषयक माहिती उपलब्ध होते.
वैद्यकशास्त्र हा विषय व्यापक असल्याकारणाने त्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या अनेक संकल्पनांचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. याकरिता पूर्वप्रकाशित मराठी विश्वकोशामध्ये अनेक नोंदींवर लिखाण करण्यात आले. सदर माहितीचे अद्ययावतीकरण करून वाचकाला प्रमाणभूत शास्त्रीय माहिती एकत्रित उपलब्ध करून देण्यासाठी ‘आधुनिक वैद्यकशास्त्र’ या विषयाचे स्वतंत्र ज्ञानमंडळ तयार करण्यात आले आहे.या विषयांतर्गत मानवी अवयव, विविध शरीरसंस्था (म्हणजेच चेतासंस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था यांचेही विस्तृत वर्णन दिले आहे. तसेच विविध वैद्यकीय संकल्पना आणि वैद्यकीय उपकरणे यांचीही माहिती दिली आहे. प्रस्तुत माहिती जिज्ञासू वाचकांसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
पोलिओ लस (Polio vaccine)

पोलिओ लस

पोलिओ अथवा बालपक्षाघात हा एक लहान मुलांना विषाणू संसर्गामुळे होणारा रोग आहे. याला वारे जाणे असेही म्हणतात. वारे गेलेला पाय ...
प्यूट्झ-जेघर लक्षणसमूह  (Peutz-Jegher’s Syndrome, PJS)

प्यूट्झ-जेघर लक्षणसमूह

प्यूट्झ या डच संशोधकाने १९२१ मध्ये या लक्षणसमूहाची मांडणी केली. नंतर जेघर या अमेरिकन संशोधकानेही त्याला दुजोरा दिला. त्यानंतर हा ...
प्रदाहक आंत्ररोग (Inflammatory bowel diseases, IBD)

प्रदाहक आंत्ररोग

आतड्याच्या प्रदाहक आजारांमध्ये क्रॉन आजार (Crohn’s disease) आणि व्रणकारी बृहदांत्रशोथ (Ulcerative colitis) अशा दोन आजारांचा समावेश होतो. यातील क्रॉनचा आजार ...
प्रवासी आरोग्य (Emporiatrics/ Traveller’s Health)

प्रवासी आरोग्य

एखाद्या व्यक्तीला प्रवासादरम्यान आरोग्यसंबंधित अडचणी उद्भवू शकतात. अशा वेळी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचारपद्धती यांचा अभ्यास ज्या वैद्यकीय शाखेमध्ये ...
प्रसवोत्तर दक्षता (Postnatal care)

प्रसवोत्तर दक्षता

प्रसूतीनंतर ६-८ आठवड्यांचा कालावधी हा प्रसवोत्तर कालावधी (Postnatal period) म्हणून ओळखला जातो. प्रसवोत्तर दक्षतेचे महत्त्व  : प्रसूतीनंतरच्या कालावधीमध्ये मातेला शारीरिक ...
प्रोजेस्टेरॉनयुक्त गर्भनिरोधक अंत:क्षेपणे (Female contraceptive injections containing progesteron)

प्रोजेस्टेरॉनयुक्त गर्भनिरोधक अंत:क्षेपणे 

फक्त प्रोजेस्टेरॉन असलेली स्त्रियांसाठीची गर्भनिरोधक अंत:क्षेपणे (Injection) बाजारात उपलब्ध आहेत. नुकतीच ही अंत:क्षेपणे राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात समाविष्ट केली गेली ...
बीसीजी लस (BCG Vaccine)

बीसीजी लस

बीसीजी (BCG; Bacille Calmette Guerin) लस ही क्षयरोग नियंत्रणासाठी वापरण्यात येत असलेली एकमेव लस आहे. इतिहास : रॉबर्ट कॉख यांनी ...
बृहदांत्र विपुटीविकार आणि विपुटीशोथ (Diverticulosis & Diverticulitis)

बृहदांत्र विपुटीविकार आणि विपुटीशोथ

बृहदांत्र विपुटीविकार (Diverticulosis) हा बृहदांत्रामध्ये म्हणजेच मोठ्या आतड्यात निर्माण झालेला दोष असतो. बृहदांत्र विपुटीविकार (Diverticulosis) : पचनसंस्थेच्या नलिकाकृती अवयवाची रचना ...
ब्यूर्गर रोग (Buerger’s disease/Thromboangiitis Obliterans)

ब्यूर्गर रोग

ब्यूर्गर रोग ब्यूर्गर रोग (घनाग्रदाहरक्तवाहिनीनाश) हा एक दुर्मीळ आजार असून त्यामध्ये हातापायांतील लहान व मध्यम आकाराच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊन खंडयुक्त ...
रासायनिक चिकित्सा  (Chemotherapy)

रासायनिक चिकित्सा

कर्करोगावर उपचार करण्यात येणाऱ्या औषधी उपचारांना रासायनिक चिकित्सा असे म्हणतात. औषधे ही सामान्यत: रसायनांपासून बनविलेली असतात म्हणून या उपचारांना रसायनोपचार ...
रासायनिक चिकित्सेचे दुष्परिणाम  (Side effects of chemotherapy)

रासायनिक चिकित्सेचे दुष्परिणाम

रासायनिक चिकित्सा ही कर्करोगावरील एक उपचार पद्धती आहे. या चिकित्सेअंतर्गत वापरण्यात येणाऱ्या औषधांचे काही ना काही दुष्परिणाम होत असतात. प्रत्येक ...
रिफॅम्पीसीन (Rifampicin)

रिफॅम्पीसीन

क्षयरोगासारख्या एकेकाळी दुर्धर समजल्या जाणाऱ्‍या आजारावर रिफॅम्पीसीन हे अतिशय प्रभावी प्रतिजैविक १९५७ पासून उपलब्ध आहे. क्षयरोगाच्या जीवाणूंचा नाश करून क्षयरोगाच्या ...
विन्सेंट संसर्ग (Vincent’s infection)

विन्सेंट संसर्ग

विन्सेंट संसर्ग विन्सेंटचा संसर्ग या आजारास विन्सेंटचे तोंड येणे, विन्सेंट्स अँजायना, ट्रेंच माऊथ किंवा तीव्र विनाशकारी हिरड्यांचा संसर्ग (Acute necrotizing ...
शारीरिक ठेवण (Posture)

शारीरिक ठेवण

एखादी व्यक्ती उभी राहिल्यानंतर किंवा बसल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या शरीराची जी अवस्था धारण करते, त्या शरीराच्या अवस्थेला शारीरिक ठेवण असे ...
शारीरिक स्वास्थ्य (Physical fitness)

शारीरिक स्वास्थ्य

परिणामकारक आणि उत्तम कार्य करण्याच्या शरीराच्या क्षमतेला शारीरिक स्वास्थ्य असे म्हणतात. उत्तम स्वास्थ्य ही ‍निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली आहे. कामाच्या व ...
संतुलन अवपात (Balance disorders)

संतुलन अवपात

शारीरिक संतुलन म्हणजे शरीरस्थिती स्थिर अवस्थेत राखणे होय. अंतर्कर्ण (Inner ear), डोळे (दृष्टी) आणि स्पर्शज्ञानाद्वारे शरीराला शारीरिक संतुलन राखण्यास मदत ...
स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया (Female contraception)

स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया

स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये स्त्री बीजवाहक नलिका (Fallopian tubes) बंद केल्या जातात. त्या दोऱ्याने बांधल्या जातात किंवा काही वेळा रबरीबंद (Rubber ...
हर्शस्प्रंग आजार  (Hirschsprung’s disease)

हर्शस्प्रंग आजार

गर्भधारणा झाल्यापासून अर्भकाची नैसर्गिक वाढ वेगवान व अतिशय चपखलपणे होते. निरोगी मूल जन्मल्यानंतरही शरीर रचना आणि कार्य अचूकपणे होत असते ...