(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : रवीन्द्र बा. घोडराज
प्रदीर्घ अशा अश्मयुगानंतर मानवाने केलेल्या धातुविज्ञानातील प्रगतीमुळे संस्कृती- चा विकास झपाटयाने होत गेला. अठराव्या शतकात औद्योगिकीकरणास चालना मिळून अनेक अवघड असे अभियांत्रिकी प्रकल्प मार्गी लागले. धातुविज्ञानातील या सर्व प्रगतीचा संक्षिप्त आढावा मराठी विश्वकोशाच्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या १ ते २० खंडांत घेण्यात आला असून, अनेक मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. २०१७ नंतरच्या वर्षात मूलभूत आणि अनुप्रयुक्त विज्ञानात अनेक शोध लागून या शोधांचा उपयोग धातुतंत्रज्ञानात करण्यात आला आहे. यामुळे अभियांत्रिकीमधील अनेक आधुनिक आविष्कार शक्य होत आहेत. धातुविज्ञान फक्त धातूपुरते मर्यादित न राहाता यात अनेक पदार्थांचा समावेश झाल्यामुळे ते अधिक उपयुक्त आणि सर्वसमावेशक झाले आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्यांचे विविध ज्ञानशाखांबद्दलचे कुतूहल वाढीस लागले आहे. एकविसाव्या शतकात सर्वच ज्ञानशाखांमधील कृतिम भिंती कोसळत असताना समांतर आणि दुसऱ्या ज्ञानशाखेत उपयोगी पडू शकतील अशा बाबींचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर मराठी विश्वकोशात असलेल्या धातुविज्ञानातील माहितीचे किंवा नोंदीचे अद्ययावतीकरण करणे आणि नवीन संकल्पनाची भर टाकणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उदिष्ट्य निश्चित करण्यात आले. त्यासाठी या विषयाचा पुढील अंगांनी विचार केला गेला आहे : प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुविज्ञानामधील संकल्पना आणि त्यावर आधारित संशोधनाच्या नवीन दिशा, पोलादासारख्या औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या मिश्र धातुंचे उत्पादन, पृष्ठभाग धातुविज्ञान, भौतिकी आणि रासायनिक धातुविज्ञान, संरचनात्मक धातुविज्ञान आणि प्रगत धातुविज्ञान.

धातु व अधातूंचे जोडकाम
कोणत्याही प्रकारचे अभियांत्रिकीय संरचनात्मक काम तयार करताना किंवा उभारताना धातू अथवा अधातूंचे अनेक भाग एकत्र जोडावे लागतात. दोन किंवा जास्त ...

धातु–आमापन
धातुकातील धातूचे प्रमाण काढण्याच्या क्रियेला धातु-आमापन म्हणतात (धातुक म्हणजे कच्चा स्वरूपातील धातू). हे प्रमाण काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यांत जुन्या ...

धातुकांचे शुद्धीकरण
धातुकातील उपयुक्त व निरुपयोगी भाग वेगळे करण्याची क्रिया. निसर्गात सापडणारी उपयुक्त धातुके बहुतेक वेळा निरुपयोगी खनिजांमध्ये कमीअधिक प्रमाणात मिसळलेली आढळतात ...

धातुमळी
धातुकाचे (Ore)प्रगलन करून शुद्ध धातूचा रस तयार करताना वापरण्यात येणारे अभिवाह आणि धातुकातील अधातवी खनिजे यांमधील रासायनिक विक्रियेने तयार होणारे, ...

धातुरचनाविज्ञान

धातुरूपण
अभियांत्रिकी कामामध्ये व इतर व्यवहारांत निरनिराळ्या धातू व मिश्रधातूंपासून विविध प्रकारच्या संरचना वा वस्तू निरनिराळ्या पद्धतींनी तयार करतात. उदा., इमारतींचे ...

धातुविज्ञान
धातुकांचे संस्करण, धातूंचे प्रगलन, धातूचे तुकडे तापवून किंवा थंड अवस्थेतच त्यांना विविध आकार देणे, धातूंचे जोडकाम करणे, धातूचा रस करून ...

धातूंची यंत्रणक्षमता
ओतकाम, घडाई, लाटण वा बहि:सारण या प्रक्रियांनी तयार केलेल्या ढोबळ आकाराच्या वस्तूला ठरावीक मापाचा आकार देण्यासाठी तिच्या पृष्ठभागावर जरूरीप्रमाणे यंत्रण ...

धातूंची संरचना
धातूंच्या कणांची एकमेकांसापेक्ष स्थिती. धातूंची संरचना व त्यातील बदल हे धातुभौतिकीचे व पर्यायाने घन अवस्था भौतिकीचे महत्त्वाचे अंग आहे. संरचनेच्या ...

धातूंचे अवक्षेपण कठिनीकरण
धातूंच्या कठिनीकरणाच्या तीन महत्त्वाच्या मूलभूत पद्धती आहेत, त्या अशा : १) शीतकाम, २) घन विद्रावण कठिनीकरण व ३) अवक्षेपण कठिनीकरण ...

धातूंचे उष्णता संस्करण
धातूची घन अवस्था कायम ठेवून उष्णतेच्या साह्याने तिच्या संरचनेत हवा तसा बदल घडवून आणण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत धातूचे तापमान पाहिजे ...

धातूंचे परीक्षण
धातूंचे परीक्षण : धातूच्या यंत्रभागांचे, वस्तूंचे वा त्यांच्या धातूंचे परीक्षण. आजच्या यंत्रयुगातील सर्व प्रकारच्या यंत्रसामग्रीला निरनिराळ्या धातूंची व मिश्रधातूंची जरूरी असते ...

धातूंचे यांत्रिक गुणधर्म
धातूंचे गुणधर्म निरनिराळ्या प्रकारचे असतात म्हणून त्यांचे वेगवेगळे वर्ग केलेले आहेत. यांत्रिक, रासायनिक, विद्युत् चुंबकीय असे त्यांतील प्रमुख प्रकार आहेत ...

नाय – हार्ड
पांढऱ्या बिडात निकेल व क्रोमियम मिसळून तयार होणाऱ्या मिश्रधातूंचा हा एक समूह आहे. नाय-हार्ड हे त्याचे व्यापारी नाव आहे. याच्या ...

नाय-रेझिस्ट

नायक्रोम
निकेल आणि क्रोमियम धातूंचे प्राधान्य असलेल्या मिश्रधातू. या मिश्रधातूंच्या तारांचा उपयोग प्रामुख्याने विद्युत् रोधन व विद्युत् रोधापासून उष्णतानिर्मितीसाठी होतो. उच्च ...

निकेल सिल्व्हर
चांदीसारखा दिसणारा निकेल, तांबे व जस्त यांचा मिश्रधातू. तांबे व निकेल यांची धातुके – कच्च्या स्वरूपातील धातू – वितळवून चिनी ...

निर्वात धातुविज्ञान
वातावरणातील ऑक्सिजनाने कित्येक धातू व मिश्रधातूंचे सहज ⇨ ऑक्सिडीभवन होते किंवा वातावरणातील वायू मिसळून धातू दूषित होतात. भट्टीत धातुक (कच्च्या स्वरूपातील ...

पितळ
तांबे व जस्त यांच्या मिश्रधातूंना ‘पितळ’ म्हणतात. पितळात तांबे प्रमुख धातू आणि जस्त मिश्रक धातू आहे. ५ – ४० टक्के ...

पृष्ठभाग यांत्रिक घर्षणपद्धत
धातू संशोधन संस्थेचे के.लू (चीन विज्ञान अकादमी, शेनयांग,चीन) यांनी ‘पृष्ठभाग यांत्रिक घर्षणपद्धत’ या तंत्रज्ञानाचा शोध लावला. या तंत्रज्ञानाने पदार्थामध्ये अतिरिक्त ...