(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : रवीन्द्र बा. घोडराज
प्रदीर्घ अशा अश्मयुगानंतर मानवाने केलेल्या धातुविज्ञानातील प्रगतीमुळे संस्कृती- चा विकास झपाटयाने होत गेला. अठराव्या शतकात औद्योगिकीकरणास चालना मिळून अनेक अवघड असे अभियांत्रिकी प्रकल्प मार्गी लागले. धातुविज्ञानातील या सर्व प्रगतीचा संक्षिप्त आढावा मराठी विश्वकोशाच्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या १ ते २० खंडांत घेण्यात आला असून, अनेक मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. २०१७ नंतरच्या वर्षात मूलभूत आणि अनुप्रयुक्त विज्ञानात अनेक शोध लागून या शोधांचा उपयोग धातुतंत्रज्ञानात करण्यात आला आहे. यामुळे अभियांत्रिकीमधील अनेक आधुनिक आविष्कार शक्य होत आहेत. धातुविज्ञान फक्त धातूपुरते मर्यादित न राहाता यात अनेक पदार्थांचा समावेश झाल्यामुळे ते अधिक उपयुक्त आणि सर्वसमावेशक झाले आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्यांचे विविध ज्ञानशाखांबद्दलचे कुतूहल वाढीस लागले आहे. एकविसाव्या शतकात सर्वच ज्ञानशाखांमधील कृतिम भिंती कोसळत असताना समांतर आणि दुसऱ्या ज्ञानशाखेत उपयोगी पडू शकतील अशा बाबींचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर मराठी विश्वकोशात असलेल्या धातुविज्ञानातील माहितीचे किंवा नोंदीचे अद्ययावतीकरण करणे आणि नवीन संकल्पनाची भर टाकणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उदिष्ट्य निश्चित करण्यात आले. त्यासाठी या विषयाचा पुढील अंगांनी विचार केला गेला आहे : प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुविज्ञानामधील संकल्पना आणि त्यावर आधारित संशोधनाच्या नवीन दिशा, पोलादासारख्या औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या मिश्र धातुंचे उत्पादन, पृष्ठभाग धातुविज्ञान, भौतिकी आणि रासायनिक धातुविज्ञान, संरचनात्मक धातुविज्ञान आणि प्रगत धातुविज्ञान.
काडतूस पितळ
तांबे आणि जस्त विविध प्रमाणांत एकत्र वितळवून पितळाचे विविध प्रकार तयार करतात. ७० % तांबे व ३० % जस्त असलेल्या ...
कार्बुरीकरण
कार्बुरीकरण ही एक उष्मारासायनिक कवच-कठिणीकरण प्रक्रिया आहे. या प्रकारची प्रक्रिया ही कवच/ पृष्ठभाग (Case) आणि गाभा (core) यात वेगवेगळे गुणधर्म ...
काळे बीड
कासे
तांबे आणि कथिल यांचे मिश्रधातू कासे या नावाने प्राचीन काळापासून उपयोगात आहेत. पण नंतरच्या यांत्रिक युगात त्यांचे प्रकार आणि उपयोग ...
क्रमवीक्षक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक
क्रमवीक्षक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक हे प्रामुख्याने नमुन्याच्या पृष्ठभाग किंवा पृष्ठभागाजवळील संरचना अभ्यासण्यासाठी वापरले जाते. यामुळे आपण विविध कार्बनी आणि अकार्बनी पदार्थांचे ...
गंजणे
कोणत्याही प्रकारची धातू आणि तिच्या परिसरातील घटक यांच्यामधील विद्युत, रासायनिक किंवा रासायनिक विक्रियेमुळे धातूची स्फटिकीय रचना ढासळून तिच्या गुणधर्मांवर होणारा ...
गन मेटल
काशाचा (ब्राँझचा) हा एक प्रकार आहे. पोलादाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू होण्यापूर्वी तोफा ओतण्यासाठी या मिश्रधातूचा फार उपयोग होई म्हणून ...
चूर्ण धातुविज्ञान
धातूंची बारीक पूड तयार करणे व ती साच्यात दाबून व तिला उष्णता देऊन तिच्यातील सुटे कण एकजीव होतील असे करून ...
जलीय धातुविज्ञान
पाण्यातील विद्रावात घडून येणाऱ्या विक्रियांचा उपयोग करून घेऊन एखाद्या धातुकातील (कच्च्या धातूतील) धातू काढून घेण्याच्या प्रक्रियांसंबधीच्या विज्ञानास जलीय धातुविज्ञान म्हणतात ...
जस्त : शोध आणि उत्पादन
तांबे आणि जस्त यांचे मिश्रधातू म्हणजे पितळ (Brass). इ. स. पू. १५०० च्या सुमारास वापरात असलेल्या पितळी वस्तू हडप्पा संस्कृतीतील ...
जस्तविलेपन
लोखंड व पोलाद यांच्या वस्तूंचे गंजण्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्यावर जस्ताचा लेप (मुलामा) देण्याची पद्धती. छपरांचे पन्हाळी पत्रे, सपाट पत्रे, सांडपाण्याच्या ...
डेल्टा धातू
डेल्टा धातू हे उच्च तन्यता असलेले पितळ आहे. पितळाच्या संघटनात ३% लोखंड घालून हे पितळ तयार करतात. अशा प्रकारे याच्या ...
तन्य ओतीव लोखंड
लोखंडातील अंतर्गत कण संरचनेस फेराइट (Ferrite) असे नाव आहे. ही प्रावस्था (Phase ) मऊ आणि चिवट असते. लोखंडामध्ये कार्बन मिसळल्यास ...
तप्त संक्षारण
तप्त संक्षारण ही क्रिया प्रामुख्याने गॅस टरबाइन, डीझेल एंजिन, उष्णोपचार भट्टी किंवा दूषित उष्ण वायूंच्या संपर्कात येणाऱ्या उपकरणांमधे आढळून येते ...
दाबविद्युत पदार्थ
ग्रीक व्युत्पत्तीनुसार “पिझो” म्हणजे दाब आणि म्हणून जे पदार्थ दाबाचा – यांत्रिक प्रतिबलाचा म्हणजे एकक क्षेत्रफळावरील प्रेरणेचा – वापर केल्यानंतर ...
दिल्ली लोहस्तंभ
नवी दिल्ली येथील कुतुब संकुलात अनेक स्मारके आहेत. त्यांपैकी ‘कुव्वतुल इस्लाम’ ही मशीद महत्त्वपूर्ण आहे. गेली सोळाशे वर्षे न गंजता ...
दृढ ग्रॅफाइट लोखंड
द्वारण पद्धती
द्रव धातू (Molten Cast Iron) साच्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला मार्ग म्हणजे द्वारण पद्धती. या पद्धतीची रचना पुढील उद्दिष्ट्ये समोर ठेवून केली ...
द्वारण पद्धतीचा हिशोब : तन्य बीड आणि काळे बीड
तन्य बिडाचे उत्पादन करताना मॅग्नेशियमची प्रक्रिया केली असल्याने धातू रसामध्ये पातळ मळी (Dross) तयार होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तन्य ...
धातु
निसर्गात सापडण्याऱ्या मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार स्थूलमानाने धातू आणि अधातू असे दोन वर्ग पाडतात. त्यांतील पहिल्या वर्गाच्या मूलद्रव्यास घासून ...