(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा सु. देवरुखकर
संगीत हा विषय आवड म्हणून जरी उत्तम असला, तरी त्याची विश्वभरामध्ये पसरलेली विविध रूपे, प्रकार, शाखा-उपशाखा आणि या सर्वांमध्ये झालेले कार्य तसेच कालचक्राप्रमाणे होत आलेली परिवर्तने, या साऱ्यांचा मागोवा घेऊन तो मराठी रसिकांसमोर नेमक्या रंजकपणे आणि वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ नेऊन मांडणे हे शिवधनुष्यच आहे. प्राचीन काळापासून भारतात आणि इतरत्रही संगीतशास्त्राचा संचार आणि संसार अव्याहतपणे सुरू आहे, मात्र हिंदुस्थानात पूर्वीच्या मौखिक परंपरेला चिकटून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे मोजकेच दप्तर हाती लागते. “बदलते तीच कला” या नात्याने काही शोधण्याचा प्रयत्न करू गेल्यास आधुनिक कालखंडातील संगीतवैभवाचा मागोवा घेता येतो; पण कालौघात लुप्त झालेल्या आणि त्या त्या वेळी महत्त्वपूर्ण टप्पे ठरलेल्या गोष्टींचा धांडोळा घ्यायचाही हा प्रयत्न आहे. केवळ भारतापुरताच विचार करायचा तर वेदांच्या ऋचांपासून सुरू झालेला हा प्रवास वेगवेगळी मनोहर वळणे घेत, कधी भौतिक तर कधी आध्यात्मिक अंगे स्वीकारत दर्जा, विस्तार आणि वैविध्य अशा सर्व बाजूंनी वृद्धिंगत होत गेला.

भारतीय संगीताच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा प्रमुख संगीतपद्धती आपआपली आगळीवेगळी वैशिष्ट्ये जपत व जोपासत प्राचीन काळापासून विकसित होत गेल्या. त्यांच्या गायन, वादन, नृत्य इत्यादी उपविभागांचा आणि या प्रत्येकाची घराणी होऊन त्यांतील प्रत्येकाचा पुन्हा वेगळा ठसा उमटवणारा प्रवास सुरू झाला आणि परंपरेच्या पायावर नवविचारांची उभारणी करत तो अखंड प्रवाहीत राहिला.

पाश्चात्त्य संगीत जे सामान्यत: यूरोप, अमेरिकेतील लोकांचे संगीत म्हणून ओळखले जाते, याच्या अभिजात वा कलासंगीत व लोकप्रिय संगीत या दोन शाखा आहेत. यांमध्ये सिंफनी रचना, ऑपेरा, बॅले, ग्रामीण व लोकसंगीत, जॅझ, रॉक, चित्रपट आणि सुखात्मिका यांकरिता केलेल्या संगीतरचनांचा समावेश होतो.

संगीतक्षेत्रामध्ये इतरत्रही अशाच प्रकारची प्रक्रिया सुरू राहिली. गायन, वादन, नर्तन, संगीतसंयोजन इत्यादींमध्ये असंख्य कलाकारांनी तसेच संगीतातील काही प्रमुख घराण्यांनी आपापली परंपरा आणि स्वअभ्यास या सर्वांचा अजोड मेळ घालत अलौकिक रचनांची निर्मिती केली आणि या सर्वांनी मिळून अखिल मानवजातीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर आवश्यक असणारे मानसिक स्थैर्य आणि समाधान देण्याचे अतिशय मोलाचे कार्य संगीताद्वारे केले……. तेही अव्याहतपणे! या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न.

संगीतरत्नाकर (Sangitratnakara)

संगीतरत्नाकर

तेराव्या शतकातील पंडित शारंगदेव यांनी लिहिलेला भरत परंपरेतील एक महत्त्वाचा संगीतविषयक ग्रंथ. हा ग्रंथ म्हणजे प्राचीन संगीतविषयक अनेक ग्रंथांचे सार ...
सत्रिया नृत्य (Sattriya Dance)

सत्रिया नृत्य 

भारतातील आसाम राज्याचे शास्त्रीय नृत्य. १५ नोव्हेंबर २००० रोजी संगीत नाटक अकादमीने सत्रिया नृत्याला भारतीय शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता दिली ...
सामताप्रसाद (Samtaprasad)

सामताप्रसाद

मिश्र, सामताप्रसाद : (२० जुलै १९२०–३१ मे १९९४). प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीतकार व बनारस घराण्याचे तबलावादक. त्यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) ...
सी. आर. व्यास ( C. R. Vyas)

सी. आर. व्यास

व्यास, चिंतामण रघुनाथ : (९ नोव्हेंबर १९२४ – १० जानेवारी २००२). प्रसिद्ध हिंदुस्थान शास्त्रीय संगीत गायक व संगीतज्ञ. त्यांचा जन्म ...
सी. रामचंद्र (C. Ramachandra)

सी. रामचंद्र

सी. रामचंद्र : (१२ जानेवारी १९१८— ५ जानेवारी १९८२). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक. मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. ‘सी ...
सुधीर फडके (बाबूजी) (Sudhir Phadke)

सुधीर फडके

फडके, सुधीर : (२५ जुलै १९१९ – २९ जुलै २००२). प्रसिद्ध मराठी भावगीतगायक आणि चित्रपटक्षेत्रातील निर्माते, संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक. त्यांचे ...
सुहासिनी रामराव कोरटकर (Suhasini Ramrao Koratkar)

सुहासिनी रामराव कोरटकर

कोरटकर, सुहासिनी रामराव : (३० नोव्हेंबर १९४४ – ७ नोव्हेंबर २०१७). भेंडीबाजार घराण्याच्या एक प्रतिभासंपन्न गायिका व संगीत रचनाकार. त्यांचा ...
सूर सिंगार संसद (Sur Singar Samsad)

सूर सिंगार संसद

तरुण, आश्वासक तसेच प्रथितयश आणि उच्च कोटींच्या कलाकारांसाठी संगीत क्षेत्रामध्ये कार्य करून प्रसिद्धीस आलेली भारतातील एक संस्था. आपल्या निरनिराळ्या उपक्रमाद्वारे ...
स्थायी/अस्ताई - अंतरा (Sthayi/Astai-Antara)

स्थायी/अस्ताई – अंतरा

हिंदुस्थानी अभिजात संगीत पद्धतीच्या गायनप्रकारांतील गीताचे (चीज) दोन भाग आहेत : पहिला अस्ताई (स्थायी), दुसरा अंतरा. पूर्वांगप्रधान रागात अस्ताईचा विस्तार ...
स्वर साधना समिती, मुंबई (Swar Sadhana Samiti, Mumbai)

स्वर साधना समिती, मुंबई

भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांच्या जतन-संवर्धनास वाहिलेली आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील असणारी एक प्रसिद्ध संस्था. तिची ...
स्वरजति (Swarjati)

स्वरजति

कर्नाटक ( दाक्षिणात्य ) संगीतातील रचनांचा एक प्रकार. या प्रकारातील संगीतरचना सर्वसाधारणपणे भक्ती, प्रेम, शौर्य इ. रसांवर आधारित असतात. विशेषतः ...
स्वरमेलकलानिधि (Swarmelkalanidhi)

स्वरमेलकलानिधि

मध्ययुगीन थाट पद्धती सांगणारा आद्य ग्रंथ. दाक्षिणात्य संगीतज्ञ पंडित रामामात्य यांनी १५५० मध्ये हा ग्रंथ लिहिला. पं. रामामात्य हे विजयनगरच्या ...
स्वाती तिरूनल ( Swathi Tirunal )

स्वाती तिरूनल

स्वाती तिरूनल : (१६ एप्रिल १८१३ — २७ डिसेंबर १८४६). कुलशेखर वंशातील त्रावणकोर संस्थानचा एक कलाभिज्ञ, संगीतप्रेमी कर्तबगार राजा. पूर्ण नाव स्वाती ...
हबीबुद्दीन खॉं (Habibuddin Khan)

हबीबुद्दीन खॉं

खाँ, हबीबुद्दीन : (? १८९९ — २० जुलै १९७२). भारतातील तबलावादनाच्या अजराडा घराण्यातील श्रेष्ठ तबलावादक. त्यांचा जन्म मेरठ येथे झाला ...
हिराबाई बडोदेकर (Hirabai Barodekar)

हिराबाई बडोदेकर

बडोदेकर, हिराबाई : (२९ मे १९०५ – २० नोव्हेंबर १९८९). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील ...
हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar)

हृदयनाथ मंगेशकर

मंगेशकर, हृदयनाथ : (२६ ऑक्टोबर १९३७). मराठी व हिंदी भावसंगीत तसेच चित्रपटसंगीत यांतील ख्यातनाम संगीतकार व गायक. त्यांचा जन्म प्रख्यात ...
हॉर्न (Horn)

हॉर्न

पाश्चिमात्य संगीतातील तोंडाने फुंकून वाजविण्याचे एक सुषिर वाद्य. हे वाद्य पितळ या धातूचे बनविलेले असून त्याच्या वेटोळ्या आकारात बसविलेल्या नळीची ...

होरी

उत्तर हिंदुस्थानी संगीतप्रकारातील एक शृंगार रसप्रधान गायन-प्रकार. याचा विषय प्रामुख्याने कृष्णाच्या रासलीला आणि राधा व गोपिकांच्या संगतीने रंगणारी होळी हा ...