समुद्रपुष्प (Sea anemone)

(सी अनिमोन). सागरी परभक्षी प्राण्यांचा एक गट. ॲक्टिनियारिया गणातील आंतरगुही संघातील प्राण्यांना सामान्यपणे समुद्रपुष्प म्हणतात. या प्राण्यांचे रंग अनिमोन प्रजातीतील फुलांसारखे आकर्षक असल्याने त्यांना ‘सी अनिमोन’ असे इंग्लिश नाव पडले…

समस्थिती (Homeostasis)

(होमिओस्टॅसिस). सजीव स्वनियंत्रणाने त्यांच्या शरीराची अंतर्गत स्थिती संतुलित राखतात. या संतुलित स्थितीला समस्थिती म्हणतात. जसे उष्ण रक्ताच्या सजीवांच्या शरीराचे तापमान बाहेरील तापमान बदलले, तरी एका मर्यादेत राहते; हा समस्थितीचा भाग…

सफरचंद (Apple)

(ॲपल). एक फळ वनस्पती. सफरचंद ही वनस्पती रोझेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मॅलस प्युमिला आहे. गुलाब, रासबेरी, स्ट्रॉबेरी इ. वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. सफरचंद या वनस्पतीचे मूळस्थान पूर्व यूरोप…

संप्रेरके (Hormones)

(हॉर्मोन्स). प्राणी किंवा वनस्पती यांच्यातील संदेशवाहक रासायनिक संयुगाला ‘संप्रेरक’ म्हणतात. पेशींच्या, ऊतींच्या वा इंद्रियांच्या क्रियांचे नियंत्रण, नियमन तसेच त्यांच्यात समस्थिती राखण्याचे कार्य संप्रेरकांद्वारे होते. संप्रेरके सजीवांच्या विशिष्ट भागात निर्माण होतात,…

सप्ताळू (Peach/Nectarine)

(पीच/नेक्टरीन). चवदार फळांसाठी प्रसिद्ध असलेला रोझेसी कुलातील एक लहान वृक्ष. सप्ताळू हा पानझडी वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव प्रूनस पर्सिका आहे. जरदाळू, बदाम, चेरी या वनस्पतीही रोझेसी कुलातील असून त्या…

सप्तपर्णी (Indian devil’s tree)

(इंडियन डेव्हिल्स ट्री). एक सदाहरित वृक्ष. सप्तपर्णी हा वृक्ष ॲपोसायनेसी कुलातील असून भारतात सामान्यपणे ॲल्स्टोनिया स्कोलॅरिस या शास्त्रीय नावाची जाती आढळून येते. ॲल्स्टोनिया प्रजातीत एकूण ५० जाती असून भारतात त्यांपैकी…

संत्रे (Sweet orange)

(स्वीट ऑरेंज). सिट्रस प्रजातीतील फळांपैकी काही फळांचा ‘संत्रा’ किंवा ‘नारिंग’ असा गट करतात. या गटात गोड नारिंग (स्वीट लाइम; सिट्रस लिमेटा), आंबट नारिंग (ॲसिड लाइम; सिट्रस ऑरँटिफोलिया) आणि मँडरिन नारिंग…

सजीवसृष्टी (Living world)

(लिव्हिंग वर्ल्ड). आपल्या भोवतालची सृष्टी निर्जीव आणि सजीव यांची बनलेली आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांचा समावेश सजीवसृष्टीत केला जातो. सजीवसृष्टीला ‘जीवसृष्टी’ असेही म्हणतात. सजीव आणि निर्जीव यांच्यात काही मूलभूत फरक आहेत.…

शिंदी (Wild date palm)

(वाइल्ड डेट पाम). खजुराच्या झाडासारखा दिसणारा एक वृक्ष. शिंदी हा वृक्ष ॲरेकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव फीनिक्स सिल्व्हेस्ट्रिस आहे. ताड, माड, सुपारी हे वृक्षदेखील याच कुलातील आहेत. शिंदी हा…

शिंगे (Horns)

(हॉर्न्स). निरनिराळ्या प्राण्यांच्या डोक्यावरील टोकदार प्रवर्धाला (वाढलेल्या भागाला) शिंग म्हणतात. शिंगावर केराटीन आणि इतर प्रथिनांचे आवरण असून त्याच्या आत हाडांचा गाभा असतो. सस्तन वर्गातील रवंथ करणाऱ्या (रोमंथी) प्राण्यांच्या समखुरी गणातील…

विषमज्वर (Typhoid)

(टायफॉइड). साल्मोनेला टायफाय (साल्मोनेला एंटेरिका उपजाती टायफाय) नावाच्या जीवाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगाला ‘विषमज्वर’ म्हणतात. याला आंत्रज्वर, संततज्वर असेही म्हणतात. विषमज्वराची लक्षणे संसर्गापासून ६ ते ३० दिवसांनंतर दिसू लागतात आणि…

शिंगाळा (Singhala)

(सिंघाला). एक लोकप्रिय खाद्यमासा. शिंगाळ्याचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या ब्रॅगिडी कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव मिस्टस सिंघाला आहे. हा मासा अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, भारत या देशांतील गोड्या…

शिकरा (Shikra)

(शिक्रा). एक लहान आकारमानाचा शिकारी पक्षी. शिकरा पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या ॲक्सिपिट्रिफॉर्मिस गणाच्या ॲक्सिपिट्रिडी कुलात केला जात असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्सिपिटर बॅडियस आहे. या पक्ष्याच्या सहा उपजाती असून आशिया आणि…

शाश्वत विकास (Sustainable development)

(सस्टेनेबल डेव्हलपमेंट). भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला बाधा पोहोचू न देता वर्तमानकाळातील गरजा पूर्ण करण्याच्या विकासाला शाश्वत विकास म्हणतात. शाश्वत विकासात पृथ्वीवरील संसाधनांचा वापर विकासासाठी करताना पुढील पिढ्यांनीही संसाधनांचा…

शाल्मली (Red silk cotton tree)

(रेड सिल्क कॉटन ट्री). एक पानझडी वृक्ष. शाल्मली ही वनस्पती माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बाँबॅक्स सैबा आहे. हा वृक्ष मूळचा आशिया व ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग येथील असून भारत,…