शिलप्पधिकारम् (Silappathikaram)

शिलप्पधिकारम् : प्राचीन, अभिजात तमिळ महाकाव्य. इळंगो अडिगळ या कवीने ते सु. दुसऱ्या शतकात रचले. इळंगो अडिगळ हा शेंगुट्टवन या चेर राजाचा धाकटा भाऊ. त्याने तरुणपणापासूनच जैन संन्याशाचे आयुष्य व्यतीत…

माकुरानो सोशि (Makurano Soushi)

माकुरानो सोशि : हेइआन कालखंडामधील रोजनिशी. द पिलो बुक हे या रोजनिशीचे इंग्रजी शीर्षक होय. ही गेंजी मोनोगातारी  या साहित्य कृतीइतकीच महत्वाची आहे. सेई शोनागुन ह्या स्त्री लेखिकेने लिहिलेली ही…

गानवर्धन, पुणे (Ganvardhan, Pune)

गायन, वादन, नृत्य यांचा समाजात प्रसार व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन कृष्णा गोपाल ऊर्फ कृ. गो. धर्माधिकारी यांनी ८ नोव्हेंबर १९७८ रोजी पुण्यामध्ये या संस्थेची स्थापना केली. संगीत सभांमध्ये कला…

सत्य (Truth)

सत्य या शब्दाला अनेक अर्थ आहेत. या विश्वाच्या मुळाशी असलेले तत्त्व अंतिम सत्य या शब्दात व्यक्त केले जाते, त्या वेळी सत्य हे ‘Reality’ (सद्वस्तू, वास्तव) या इंग्रजी शब्दाचे भाषांतर असते.…

अभिनिवेश

महर्षि पतंजलींनी वर्णिलेल्या पाच क्लेशांपैकी अभिनिवेश हा एक क्लेश आहे. व्युत्पत्तीनुसार अभिनिवेश या शब्दाचा अर्थ - ‘अभि’- सर्व बाजूंनी, ‘नि’-खाली, ‘विश्’- प्रवेश करणे असा होतो. योगदर्शनानुसार अभिनिवेश ही पारिभाषिक संज्ञा…

प्रातिभ (ज्ञान)

विश्वातील सर्व वस्तूंचे योग्याला होणारे ज्ञान म्हणजे प्रातिभ ज्ञान होय. हे प्रातिभ ज्ञान योग्याला विवेकख्यातीच्या अनुषंगाने विनासायास होते, त्यासाठी कोणतेही प्रयत्न लागत नाहीत. पुरुष आणि प्रकृती (त्रिगुण) यांमधील भेदाचे ज्ञान…

अस्तेय

पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी अस्तेय हा तिसरा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा । योगसूत्र २.३०). अस्तेय म्हणजे ‘चोरी न करणे’. पातंजल योगसूत्रावरील व्यासभाष्यात आणि व्यासभाष्यावरील तत्त्ववैशारदी या वाचस्पति मिश्रांनी…

नागफणा (Spathiphyllum)

आकर्षक व घरेलू बागेत (Indoor), तसेच संपूर्ण सावली अथवा उन - सावलीत वाढणारे फुलझाड. यास पीस लिली (Peace lily) असेही म्हणतात. शास्त्रीय नाव स्पॅथिफायलम वॉलिसीआय  (Spathiphyllum wallisii). हे अ‍ॅरेसी (Araceae)…

पुणे भारत गायन समाज (Pune Bharat Gayan Samaj)

पुणे भारत गायन समाज : हिंदुस्थानी संगीताच्या प्रसार-प्रचारार्थ आणि संगीतप्रशिक्षण यासाठी कार्यरत असलेली एक जुनी संगीतसंस्था. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी जिज्ञासूंना सहज संगीत शिकता यावे या हेतूने दि. १ सप्टेंबर…

राजेंद्र केशवलाल शाह (Rajendra Keshavlal Shah)

शाह, राजेंद्र केशवलाल : (२८ जानेवारी १९१३ - २ जानेवारी २०१०). गुजराती भावकवी, गुजरातमधील कपडवंज (जि. खेडा) येथे जन्म. वयाच्या दुसऱ्या वर्षीच वडील वारल्याने त्यांचे बालपण हालअपेष्टांत गेले. तत्त्वज्ञान हा…

बंदीप्रत्यक्षीकरण (Habeas corpus)

बंदीप्रत्यक्षीकरण : अटक केलेल्या व्यक्तीस प्रत्यक्ष न्यायालयापुढे हजर करण्यासाठी अवलंबिण्यात येणारी कायदेविषयक प्रक्रिया. तिला इंग्रजीमध्ये हेबिअस कॉपर्स ही संज्ञा आहे. हेबिअस कॉपर्स ह्या मूळ लॅटिन संज्ञेचा अर्थ ‘शरीर हजर कर……..’…

सत्य

पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी सत्य हा दुसरा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा:| योगसूत्र  २.३०). पतंजलींनी योगसूत्रात सत्याची व्याख्या दिलेली नाही. योगसूत्रावरील भाष्यात व्यासांनी सत्याची व्याख्या ‘जो पदार्थ जसा असेल…

सत्तांतरोत्तर पदपुरस्कार पद्धती (Spoils system)

सत्तांतरोत्तर पदपुरस्कार पद्धती : (स्पॉइल्स सिस्टिम). अधिकारारूढ पक्षाने आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची – अनुयायांची उच्च शासकीय पदांवर नियुक्ती करण्यासाठी उपयोजलेली एक पद्धती. या पद्धतीला संरक्षक व्यवस्था असे देखील म्हटले जाते. या…

अस्मिता

महर्षि पतंजलींनी वर्णिलेल्या पाच क्लेशांपैकी अस्मिता हा एक क्लेश आहे. अस्मिता या शब्दाचा व्युत्पत्तीद्वारे होणारा अर्थ – ‘मी आहे अशी भावना’ असा होतो. पातंजल योगसूत्रानुसार दृक्-शक्ती (पुरुष) आणि दर्शन-शक्ती (बुद्धी)…

औरंगजेबाची किल्ले मोहीम (Aurangzeb’s Fort Expedition)

दिल्लीचा मोगल बादशाह औरंगजेब (१६१८—१७०७) याने दक्षिणेत मराठ्यांविरुद्ध केलेली मोहीम. औरंगजेबाला मराठ्यांच्या वाढत्या सत्तेला छ. शिवाजी महाराजांच्या हयातीत आळा घालता आला नाही. त्याच्या अकबराखेरीज सर्व मुलांनी, नातवांनी व सरदारांनी दक्षिणेत…