पन्हाळे-काजी लेणी-समूह (Rock-cut caves at Panhale-Kaji)
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ. दापोलीपासून सु. ३० किमी., तर दापोली-खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून १९ किमी. अंतरावर हे ठिकाण आहे. पन्हाळे गावाच्या दक्षिणेकडील डोंगर-माथ्यावर ‘पन्हाळे’ नावाचा एक दुर्ग आहे. जवळच…
