दुःखत्रय-सांख्य (Dukhatraya-Sankhya)
दुःख ही संकल्पना ‘भारतीय तत्त्वज्ञान’ या क्षेत्रात निरनिराळ्या अर्थांनी आपल्यासमोर येते. सांख्यांच्या तत्त्वप्रणालीत दुःखाचे तीन प्रकार सांगितले आहेत. सांख्यकारिकेमधील प्रारंभीची आर्या ‒ दुःखत्रयाभिघाताज्जिज्ञासा तदभिघातके हेतौ | दृष्टे साऽपार्था चेन्नैकान्तात्यन्ततोऽभावात् ||…