शिवसंहिता (Shivasamhita)

हा हठयोगावरील संस्कृत भाषेतील ग्रंथ असून तो पद्यात्मक आहे. त्याचा काळ १७ वे शतक मानला जातो. ग्रंथाचा कर्ता कोण आहे याविषयी माहिती उपलब्ध नाही. योगशास्त्र हे सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ असून…

फिंगर लेक्स (Finger Lakes)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्याच्या पश्चिम-मध्य भागातील सरोवरसमूह. पूर्वेकडील सिराक्यूस आणि पश्चिमेकडील जेनसीओ या दोन नगरांच्या दरम्यान हा सरोवरसमूह आहे. सुमारे १८ ते २४० मी. उंचीच्या गोलाकार टेकड्यांयुक्त लाटण प्रदेशात…

लॉबी, राजकीय (Lobby, Political)

लॉबी, राजकीय : विधिमंडळातील सभासदांवर सभागृहाच्या बाहेर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव टाकून आपल्या हितसंबंधांस अनुरूप असे निर्णय घेण्यास उद्युक्त करणे, यास लॉबिइंग म्हणतात. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास अमेरिकेच्या राजकीय प्रक्रियेत लॉबिइंगला महत्त्वाचे स्थान…

हवाई गुच्छित केबल (Aerial Bunched Cable / Conductor -ABC)

गावांमध्ये आणि शहरांमध्ये विद्युत पुरवठा दुय्यम वितरण प्रणालीने केला जातो. त्यात घरगुती, छोटे व्यावसायिक यांना २४० V एक कला (Single phase) किंवा ४१५ V त्रिकला (Three phase) या पातळीवर पुरवठा…

पारेषण वाहिनीचे तडित संरक्षण (Lightning Protection of Transmission Line)

विद्युत निर्मिती केंद्रांपासून शहरांपर्यंत वा औद्योगिक वसाहतीपर्यंत विद्युत वहन उच्च व्होल्टता पारेषण वाहिनीमार्फत केले जाते. ह्या पारेषण वाहिन्यांत तारमार्ग मनोऱ्यांच्या (Tower) आधाराने टाकला जातो. मनोऱ्यावरील सर्वांत खालील तार आणि जमीन…

लॉर्ड  जेम्स एल्जिन (James Bruce, Earl of Elgin)

एल्जिन, लॉर्ड  जेम्स : (२० जुलै १८११ — २० नोव्हेंबर १८६३). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८६२–६३ च्या दरम्यानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय. सातव्या अर्ल ऑफ एल्जिनचा मुलगा. त्याचा जन्म लंडन येथे झाला.…

एकल तार भूप्रत्यागमन वितरण पद्धती (Single Wire Earth Return Distribution System – SWER)

एखाद्या प्रदेशाच्या दुर्गम भागातील लोकसंख्या कमी असते व उद्योगधंदेही अशा भागात सहसा नसतात. त्यामुळे विजेची मागणी अल्प प्रमाणात असते. अशा भागात तेथील निवासी जनसमुदायाला वीज पुरवठ्यासाठी प्रस्थापित पद्धतीने दुय्यम वितरण…

मौर्यपूर्व काळातील सामरिक कार्यवाही (Strategic Action in Pre-Mourya Empires)

प्राचीन काळापासून भारतात लढाया होत आल्या आहेत. इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ४०० वर्षांपर्यंत भारतात छोटीछोटी राज्ये, टोळ्या आणि जमाती होत्या. त्यांच्यात वारंवार युद्धे होत असत. आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात पायदळ आणि…

मूलभूत अधिकार (Fundamental Rights)

मूलभूत अधिकार : व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा विचार लोकशाही तत्त्वज्ञानाचाच भाग होय. ह्या दृष्टीने मूलभूत अधिकार म्हणजेच मानवी हक्क किंवा नैसर्गिक हक्क होत.…

जोव्हानी दा व्हेराझानो (Giovanni da Verrazano)

व्हेराझानो, जोव्हानी दा (Verrazano, Giovanni da) : (१४८५ – १५२८). इटालियन मार्गनिर्देशक आणि समन्वेषक. त्यांचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्सजवळील व्हाल दी ग्रेव्ह येथील एका व्यापारी कुटुंबात झाला. फ्लॉरेन्स येथे उच्च दर्जाचे…

चतुर्व्यूह (Fourfold aspects of a structured procedure)

योगशास्त्राची रचना चार मुख्य घटकांवर आधारित असल्यामुळे योगशास्त्राला चतुर्व्यूह म्हटले जाते. ज्याप्रमाणे चिकित्साशास्त्रात (आयुर्वेदात) रोग, रोगाचे कारण, आरोग्य (रोगाचा नाश) आणि औषध (रोग नष्ट करण्याचे साधन) या चार गोष्टींचा विचार…

मार्को पोलो (Marco Polo)

पोलो, मार्को : (१२५४– ८ जानेवारी १३२४). आशियातील देशांत, विशेषत: चीनमध्ये, प्रवास करणारा इटालियन साहसी प्रवासी व व्यापारी. त्याचा जन्म व्हेनिसमध्ये झाला. त्याच्या लहानपणीच आईचे निधन झाले. व्हेनिसमधील त्याच्या लहानपणीच्या…

नवमानवतावाद (Neo humanism)

नवमानवतावाद: प्रख्यात भारतीय राजकीय विचारवंत आणि क्रांतीचे धुरंधर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांनी आपल्या वैचारीक आणि राजकीय जीवनाच्या अखेरच्या पर्वात पुरस्कारिलेले राजकीय तत्त्वज्ञान. नवमानवतावाद किंवा मूलगामी मानवतावाद  रॅडिकल ह्यूमॅनिझम म्हणून प्रसिद्ध आहे.…

श्रीपाद अमृत डांगे (Shripad Amrut Dange)

डांगे, श्रीपाद अमृत : (१० ऑक्टोबर १८९९- २२ मे १९९१). एक ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी. नासिक येथे सामान्य कुटुंबात जन्म. शालेय शिक्षण नासिक येथे. उच्च शिक्षणाकरिता ते मुंबईचा…

प्रत्यक्ष लोकशाही (Direct Democracy)

प्रत्यक्ष लोकशाही : लोकशाही शासन पद्धतीमध्ये प्रत्यक्ष आणि प्रातिनिधीक लोकशाही असे दोन महत्वाचे प्रकार आहेत. नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारित राज्यव्यवस्था म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही होय. प्राचीन ग्रीक काळातील अथेन्स या मगर…