वाम, गोड्या पाण्यातील (Fresh water eel)
गोड्या पाण्यातील एक खाद्य मत्स्य. याचा समावेश अँग्विलिफॉर्मिस (Anguilliformes) गणातील अँग्विलिडी (Anguillidae) कुलात होतो. या माशाचा आढळ गोड्या पाण्यात ३–१० मी. खोलीपर्यंत असतो. याचे शास्त्रीय नाव अँग्विला बेंगालेन्सिस (Anguilla bengalensis)…