अपचन (Indigestion)

अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्‍या विकाराला 'अपचन' म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून पोट दुखण्यापर्यंत सर्व लक्षणांना ‘अपचन’ असे म्हणतात. अन्नाच्या पचनाला तोंडापासून…

अपघटन (Decomposition)

परिसंस्थेतील महत्त्वाची प्रक्रिया. मृत सेंद्रियघटकांतील सेंद्रिय रेणूंचे साध्या व कमी ऊर्जेच्या असेंद्रियसंयुगांमध्ये सावकाश रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे 'अपघटन'. संकीर्ण पदार्थ क्षीण होऊन त्याचे तुकडे होण्याच्या क्रियेससुद्धा अपघटन म्हणतात. हे संकीर्ण…

अन्नसाखळी (Food chain)

परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसर्‍या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण निम्नस्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत होते, याला अन्नसाखळी म्हणतात. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्नसाखळीत अन्न मिळविणे आणि दुसर्‍याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते.…

अन्नपरिरक्षण (Food preservation)

अन्नपरिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता, दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थितीत टिकविणे. अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व गुणवत्ता यांवर दुष्परिणाम घडवून आणण्यार्‍या घटकांवर नियंत्रण राखणे शक्य होते.…

एकदिश विद्युत् प्रवाह (Direct Current)

संवाहकातून वाहणारा विद्युत् प्रवाह म्हणजे इलेक्ट्रॉनांचा प्रवाह असतो. जो प्रवाह नेहमी एकाच दिशेने वाहतो त्याला एकदिश प्रवाह म्हणतात. जो विद्युत् प्रवाह आलटून पालटून पुढे जातो व मागे येतो त्याला प्रत्यावर्ती…

चंद्रकांत टोपीवाला (Chandrakant Topiwala)

टोपीवाला, चंद्रकांत : (०७-०८-१९३६).सुप्रसिद्ध गुजराती समीक्षक आणि कवी.आधुनिक कवितेचे अभ्यासक आणि समीक्षक म्हणून ते गुजराती साहित्यात सर्वश्रुत आहेत. कविता, अनुवाद, समीक्षा, संपादक या क्षेत्रात त्यांचे लक्षणीय कार्य आहे. जन्म वडोदरा…

अन्नजाळे (Food web)

प्रत्येक परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या असतात. त्या परस्परसंबंधाने जोडल्या जाऊन अन्नजाळी तयार होते. परिसंस्थेमध्ये स्वयंपोषी वनस्पतींनी तयार केलेली अन्नऊर्जा एक किंवा एकापेक्षा अधिक भक्षकांद्वारे ग्रहण केली जाते. अन्नजाळी ही ऊर्जा विनिमयाची…

अन्न आणि औषध प्रशासन (Food and drug administration)

अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये…

अनुकूलन (Adaptation)

वनस्पती वा प्राणी यांच्यामध्ये पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी होणार्‍या बदलाच्या प्रक्रियेला अनुकूलन म्हणतात. अनुकूलन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे सजीव त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत यशस्वी रीत्या जगण्यासाठी सक्षम होत असतात.…

विनोबा भावे (Vinoba Bhave)

भावे, विनोबा : (११ सप्टेंबर १८९५–१५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्याच्या पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्‍म झाला.…

निर्बाध वीजपुरवठा (UPS, Uninterruptible Power Supply)

विविध ठिकाणी (उदा., दवाखान्यात वेगवेगळ्या उपचारासाठी, रासायनिक उद्योगधंदे)  अशा ठिकाणी आपल्याला सतत ऊर्जेची गरज भासत असते. अशा ठिकाणी ऊर्जा स्रोताचा अभाव जाणवला तर खूप नुकसान होऊ शकते. अखंडित (निर्बाध) वीज…

ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt)

भट्ट,ध्रुव : (८ मे १९४७). ध्रुव प्रबोधराय भट्ट. ख्यातनाम गुजराती कादंबरीकार व कवी. जन्म नींगाला, जि. भावनगर (गुजरात) येथे. प्राथमिक शिक्षण जाफ्राबाद,केशोद येथे झाले. माध्यमिक आणि उच्च शिक्षण वाणिज्य शाखेतून…

मुहासिबी संप्रदाय (Muhasibi School)

एक इस्लामी संप्रदाय. इस्लामच्या तत्त्वज्ञानानुसार 'मुहासिबी' हा संप्रदाय नसून इस्लामचे शुद्ध अंतःकरणाने आचरण करण्याचा उपाय आहे. 'हिसाब' म्हणजे हिशोब. मोजदाद करणे. स्वतःच्या आचरणाला तटस्थवृत्तीने तपासणे. एखादे काम करताना आपला खरा…

खंडकारी (Chopper/ DC-DC Converter)

एकदिशादर्शकाचे चल एकदिशादर्शकामध्ये (DC to DC converter) रूपांतर करणे खूप गरजेचे आहे. कारण आजकाल अनेक उपकरणे एकदिशादर्शक विद्युत दाबावर (DC voltage) अवलंबून आहेत. जर आपण एकदिशादर्शक (Variable DC) चल स्रोतांचा…

काजू (Cashew)

काजू हा सदाहरित वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज…