जलस्थित्यंतर चक्र (Hydrological cycle)

पृथ्वीवरील पाण्याचे अखंडपणे सुरू असलेले अभिसरण. महासागरावरून वातावरणात जाणाऱ्या, वातावरणातून जमिनीवर येणाऱ्या आणि जमिनीवरून पुन्हा महासागरात जाणाऱ्या पाण्याचे अभिसरण जलस्थित्यंतर चक्र किंवा जलचक्र या संज्ञेने दाखविले जाते. पाण्याचे पृथ्वीवरील प्रमाण…

इंत्रुज (Entrudo)

गोव्यातील ख्रिस्ती लोकांचा उत्सव. तो कार्निव्हलच्या (Carnival) दिवसात साजरा करतात. इंत्रुज हा कार्निव्हलचाच एक भाग मानतात. हा शब्द मूळ पोर्तुगीज Entrudo या शब्दावरून आला. त्याचा अर्थ मांस भक्षणाला निरोप देणे…

शिवा-संभा कवलापुरकर (Shiwa-Sambha Kawlapurkar)

कवलापुरकर, शिवा-संभा : महाराष्ट्रात्तील नामवंत तमाशा कलावंत. शिवा-संभा हे दोन भाऊ. अत्यंत हजरजबाबी आणि उत्स्फूर्त अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य. शिवा-संभाचा जन्म सातु खाडे कवलापूरकर यांच्या घराण्यात कवलापूर ता. मिरज, जिल्हा…

जलसंसाधने (Water resources)

पृथ्वीवरील जल हे एक नैसर्गिक आणि अत्यंत महत्त्वाचे संसाधन असून त्याने पृथ्वीचा ७१% भाग व्यापलेला आहे. जलसंसाधन हे जीवोत्पत्तीच्या आधीपासून अस्तित्वात असून ते व्यय होऊन पुन:पुन्हा निर्माण होणारे अक्षय्य संसाधन…

जलव्याल (Hydra)

आंतरदेहगुही संघाच्या हायड्रोझोआ वर्गातील एक जलचर प्राणी. आंतरदेहगुही संघात प्राण्यांची दोन रूपे आढळतात. बहुशुंडक आणि छत्रिक. जलव्याल बहुशुंडक आहे. भारतात सामान्यत: आढळणाऱ्या जलव्यालाचे शास्त्रीय नाव हायड्रा व्हल्गॅरिस आहे. ध्रुवीय शीतप्रदेश…

जल प्रदूषण (Water pollution)

ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. जल प्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जल…

जल परिसंस्था (Aquatic ecosystem)

जल परिसंस्थेत तिच्यातील अजैविक घटक व जैविक घटक यांमध्ये आंतरक्रिया होतात आणि परस्परांमध्ये पदार्थांची देवाणघेवाण होते. ही परिसंस्था पाण्यातील सजीवांचे निवासक्षेत्र असते. या परिसंस्थेत सागरी पर्यावरण तसेच सरोवरे, नद्या, तलाव,…

जलजीवालय (Aquarium)

जलजीवालय म्हणजे खाऱ्या व गोड्या पाण्यातील प्राणी ठेवण्यासाठी, ज्याची एक बाजू तरी पारदर्शी असेल, असे मुद्दाम तयार केलेले बंदिस्त क्षेत्र. जलजीवालय ही साहचर्याने राहणाऱ्या सजीवांची मानवनिर्मित परिसंस्था असून जलचरांच्या नैसर्गिक…

जरदाळू (Apricot)

रोझेलिस या गणातील रोझेसी कुलामधील प्रूनस या प्रजातीत पीच, चेरी, अलुबुखार व बदाम अशा वनस्पती येतात. याच प्रजातीत जरदाळू याचा समावेश होतो. या वृक्षाच्या फळालाही जरदाळू म्हणतात. भारतातील वनस्पतीचे शास्त्रीय…

जमालगोटा (Purging croton)

ही वनस्पती एरंडाच्या यूफोर्बिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रोटॉन टिग्लियम आहे. चीन, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका व भारत या देशांत ही वनस्पती वनांत तसेच बागांमध्ये आढळते. भारतात ही पश्चिम बंगाल,…

जनुकीय समुपदेशन (Genetic counselling)

जनुकीय विकारांची रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना माहिती करून देण्याच्या प्रक्रियेला जनुकीय समुपदेशन म्हणतात. या प्रक्रियेत जनुकीय विकाराचे स्वरूप व त्याचे परिणाम, घ्यावयाची काळजी, रुग्णाला असणारे धोके आणि तो जनुकीय आजार…

जनुकीय संकेत (Genetic code)

प्रथिन निर्मितीसाठी सजीवांच्या जनुकांमध्ये असलेली सांकेतिक माहिती. सर्व सजीवांसाठी प्रथिने आवश्यक असतात. पेशीमध्ये ही प्रथिने वेगवेगळ्या २० ॲमिनो आम्लांपासून तयार होतात. प्रथिनांमधील ॲमिनो आम्ले पेप्टाइड बंधाने जोडलेली असतात. प्रथिनांच्या निर्मितीत…

जनुकीय परिवर्तित पिके (Genetically modified crops)

वनस्पतींच्या जनुकीय संरचनेत बदल करण्याला जनुकीय परिवर्तन म्हणतात. पिकांमध्ये कीडरोधी गुणधर्म निर्माण करण्यासाठी, त्यांचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी तसेच त्यांची वाढ आणि उत्पन्न सुधारण्यासाठी पिके देणाऱ्या वनस्पतींच्या जनुकीय संरचनेत बदल केला जातो.…

जनुकीय अभियांत्रिकी (Genetic engineering)

जैव तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या सजीवाच्या जीनोममध्ये बदल करण्याच्या तंत्राला ‘जनुकीय अभियांत्रिकी’ म्हणतात. या तंत्रात एखादया सजीवाच्या जीनोममध्ये बाहेरील नवीन जनुक घातला जाऊन त्या सजीवाच्या आनुवंशिक गुणधर्मात इच्छित व आवश्यक…

जनुक (Gene)

सजीवांच्या आनुवंशिक घटकांचे एकक. जनुके ही पेशीच्या केंद्रकातील गुणसूत्रांवर असतात आणि ती सजीवांची आनुवंशिक लक्षणे निश्चित करतात. विशिष्ट जनुके गुणसूत्राच्या विशिष्ट भागावर असतात. एक गुणसूत्र म्हणजे डीएनए (डीऑक्सिरिबो - न्यूक्लिइक…