चितळ (Spotted deer)

भारतात मोठ्या संख्येने आढळणारा मृग. स्तनी वर्गाच्या समखुरी गणातील मृग कुलात (सर्व्हिडी) चितळाचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्सिस ॲक्सिस आहे. श्रीलंका, बांगला देश, नेपाळ व भारत या देशांत…

चिचुंदरी (Asian house shrew)

उंदरासारखा दिसणारा एक सस्तन प्राणी. चिचुंदरी हा युलिपोटिफ्ला या गणातील आहे. या गणातील सोरीसिडी कुलाच्या पांढऱ्या दातांच्या प्रकारात संकस प्रजाती येते. संकस प्रजातीतील प्राण्यांना चिचुंदरी म्हणतात. या प्रजातीत १८ जाती…

चिकोरी (Chicory)

चिकोरी ही एक बहुवर्षायू वनस्पती ॲस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिकोरियम इंटीबस आहे. याच वनस्पतीच्या मुळांची भुकटी सामान्यपणे कॉफीच्या भुकटीत स्वाद आणण्यासाठी मिसळली जाते. ही मूळची यूरोपातील असून ती…

चिकू (Sapodilla)

चिकू हा सॅपोटेसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्रस सॅपोटा आहे. ॲक्रस ममोसा, ॲक्रस झपोटीला, मॅनिलकारा ॲक्रस, मॅनिलकारा झपोटा या नावांनीही हा वृक्ष ओळखला जातो. मेक्सिको मूलस्थान असलेला हा वृक्ष…

चिकुनगुन्या (Chikungunya)

अल्फा-विषाणूंनी बाधित झालेले डास चावल्यामुळे होणारा एक आजार. हातापायांचे सांधे सतत दुखणे, अंगावर (विशेषकरून हात, पाय, छाती व पाठीवर) पुरळ उठणे, डोके दुखणे आणि ताप येणे ही या आजाराची प्राथमिक…

चिकणा (Common wireweed)

उष्ण व उपोष्ण प्रदेशांत आढळणारी बहुवर्षायू वनस्पती. ही भेंडीच्या माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिडा ॲक्यूटा आहे. तसेच ती सिडा कार्पिनिफोलिया या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ही वनस्पती मूळची मध्य…

चिंपँझी (Chimpanzee)

स्तनी वर्गातील नर वानर (प्रायमेट्स) गणाच्या होमिनिडी कुलातील एक कपी. मानव,ओरँगउटान व गोरिला यांचाही या कुलात समावेश होतो. पँन प्रजातीत चिंपँझीच्या दोन जाती आहेत. पँन ट्रोग्लोडायटीझ (सामान्य चिंपँझी) आणि पँन…

चिंच, विलायती (Sweet inga)

फॅबेसी कुलातील या मध्यम उंचीच्या वृक्षाचे शास्त्रीय नाव पिथेसेलोबियम डल्स आहे. हा वृक्ष मूळचा मेक्सिको आणि दक्षिण-मध्य अमेरिकेतील आहे. पिथेसेलोबियम प्रजातीच्या १०० ते २०० जाती असून केवळ या जातीचा प्रसार…

चिंच (Tamarind)

फॅबेसी कुलाच्या सिसॅल्पिनीऑइडी उपकुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टॅमॅरिंडस इंडिकस आहे. चिंच हा शिंबावंत व बहुवर्षायू वृक्ष मूळचा मध्य आफ्रिकेतील असून उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळतो. मध्ययुगीन काळात अरबी व्यापाऱ्यांनी हा…

चिंगाटी (Shrimp)

कवचधारी अपृष्ठवंशी प्राणी असलेल्या चिंगाटीचा समावेश संधिपाद संघातील कवचधारी वर्गातील दशपादगणात होतो.चिंगाटीला ‘कोळंबी’ असेही म्हणतात. याच गणात खेकडे, झिंगे व शेवंडे यांचाही समावेश होतो. चिंगाटीच्या सु. २,००० जाती असून त्या…

चवळी (Cowpea)

वर्षायू शिंबावंत वनस्पती. चवळी ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना अंग्युईक्युलेटा आहे. अगस्ता, उडीद आणि गोकर्ण इ. वनस्पती याच कुलात समाविष्ट आहेत. या वनस्पतीच्या चार उपजाती आहेत.…

चयापचय (Metabolism)

सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेले पदार्थ आणि ऊर्जा यांची पेशींद्वारे निर्मिती होत असताना घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रिया. या प्रक्रियांमुळे सजीवांमध्ये वाढ आणि प्रजनन होते, त्यांची संरचना टिकून राहते आणि ते…

चपटकृमी (Platyhelminthes)

अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सुमारे १३,००० जाती आहेत. त्यांचे शरीर लांब, अधरीय पृष्ठ बाजूंनी चपटे व द्विपार्श्वसममित असते. प्राणिसृष्टीत बहुपेशीय प्राण्यांत तीन स्तरांचे शरीर पहिल्यांदा याच संघात निर्माण…

चतुर (Dragon Fly)

संधिपाद संघाच्या ओडोनेटा गणातील एक कीटक. या गणात ११ कुले आहेत. जगभरात त्यांच्या सु. ५,५०० जाती असून त्यांपैकी सु. ५०० जाती भारतात आढळतात. त्यांचे डिंभ जलचर असल्यामुळे ते तलाव, ओढे,…

चक्रवाक (Ruddy shelduck)

एका जातीचे बदक. हंस आणि बदके या पक्ष्यांचा समावेश ॲनॅटिडी कुलाच्या ज्या टॅडॉर्निनी उपकुलात होतो त्याच उपकुलात या पक्ष्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव टॅडॉर्ना फेरुजीनिया आहे. हा स्थलांतर करणारा…