जागर (Jagar)

गोव्यातील विविध जमातींकडून ग्रामदैवताना आणि स्थळदैवतांना जागृत करण्यासाठी सादर केले जाणारे विधिनाट्य. यात चार जमातींचा समावेश होतो. आदीम काळात उगम पावलेला पेरणी या मंदिरसेवक वर्गाचा पेरणी जागर, हिन्दू गावडा जमातीचा…

जिवती (Jiwti)

दीपपूजेच्या दिवशी साजरा होणारा जिवती हा झाडीपट्टीतील सण वैशिष्ट्यपूर्ण असतो. जिवतीचा दिवस हा श्रावण महिना सुरू व्हायच्या पुर्वीचा दिवस होय. हा दिवस आपल्या आईवडिलांची सेवा करणाऱ्या श्रावण बाळाची आठवण म्हणून…

राम जोशी (Ram Joshi)

राम जोशी : (१७६२? - १८१३?). सुप्रसिद्ध मराठी शाहीर. पूर्ण नाव राम जगन्नाथ जोशी. जन्म सोलापूर मध्ये एका ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे वडीलबंधू मुद्गल जोशी नावाजलेले संस्कृत पंडित आणि पुराणिक;…

तरंग (Tarang)

गोवा आणि कोकणातील ग्रामदैवताचे प्रतीक. सुमारे दोन मीटर लांबीच्या गोलाकार लाकडी खांबाच्या एका टोकाला रंगीत लुगडे गोलाकार गुंडाळतात आणि त्याच्या निऱ्या टोकावर  दोरीने बांधतात, त्या टोकावर धातूपासून बनविलेला देवीचा अथवा…

तांबूल (Tambul)

विड्याच्या पानाला चुना लावून, कात, सुपारी, वेलदोडा इ. घालून केलेला विडा म्हणजे तांबूल होय. तांबूल हा शब्द ऑस्ट्रो-एशियाटिक भाषावर्गातला आहे. तांबुलाचे त्रयोदशगुणवर्णन वराहमिहिराने बृहत्संहितेत केले असून इ. स. अठराव्या शतकातील…

तीज (Tij)

वैशाख महिन्यात येणारी झाडीपट्टीतील अक्षय तृतिया. तिला तीज म्हटले जाते. पितृपूजेचा दिवस म्हणून हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. वर्षभरात दिवाळीसोबत या तिजेला घरच्या भिंती पोतण्याची पद्धती येथील प्रत्येक कुटुंबात…

तमाशा (Tamasha)

महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्यप्रकार. यामध्ये गायन, वादन, नृत्य व नाट्य यांचा अंतर्भाव असतो. तमाशा हा शब्द उर्दूतून मराठीत आला असून, उघडा देखावा असा त्याचा अर्थ आहे. काही अभ्यासक तमाशा या शब्दाची…

तियात्र (Teatro)

गोव्यातील ख्रिस्ती लोकांचा कोंकणी नाट्याविष्कार. तियात्र हे नाव मूळ पोर्तुगीज तियात्र (teatro) या शब्दावरून आले. त्याचा अर्थ थिएटर म्हणजे नाट्य असा आहे. गोव्यात पूर्वापार जागर नावाचा लोकनाट्य प्रकार पारंपरिक विधीच्या…

चंदाताई तिवाडी (Chandatai Tiwadi)

तिवाडी, चंदाताई : भारूडाची पंरपरा जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील लोककलावंत.जन्म पंढरपूर येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती तशी बेताची म्हणून त्यांना लौकिक अर्थाने शिक्षण घेता आले नाही. जेमतेम सहावीपर्यंतच शिक्षण त्यांना…

तुणतुणे (Tunetune)

पोवाडा, कलगी-तुरा, गोंधळ, भराड, तमाशा आदी लोककलाप्रकारांमध्ये तुणतुणे हे तंतुवाद्य वापरले जाते. हातात धरण्याइतकी जाड असलेली दोन-अडीच फूट लांबीची बांबूची काठी हातात घेऊन तिच्या तळाशी एक पोकळ लाकडी नळकांडे बसविलेले…

दंडीगान (Dandigan)

महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या झाडीपट्टीच्या जिल्ह्यांतील दंडी जमातीचे गीत.  दंडीगान सादर करताना साधारणपणे पाच कलावंतांची आवश्यकता असते. दोन पुढे राहून नेतृत्व करीत असतात, तर मागे…

दिमडी (Dimdi)

महाराष्ट्रातील लोकदैवत खंडोबाच्या जागरण विधीनाट्यात वाघ्यांकरवी वाजविले जाणारे लोकप्रिय लोकवाद्य. भरतमुनी यांच्या नाट्यशास्त्रातील वर्गीकरणानुसार अशा वाद्यास अवनध्द वाद्य असे म्हणतात. लाकडी कड्यावर ताणून बसवलेल्या कातड्यामुळे यातून नाद निर्मिती होते म्हणून…

देखणी (Dekhani)

गोव्यातील एक नृत्यगीत असून ते ख्रिश्चन तरुणी हिन्दू स्त्रियांचा वेश परिधान करून समारंभप्रसंगी सादर करतात. देखणी याचा अर्थ सुंदरी. देखणीची अनेक गीते रचलेली असली,तरी अत्यंत लोकप्रिय असलेल्या गीताचा विषय हा…

दादू इंदुरीकर (Dadu Indurikar)

इंदुरीकर, दादू : (मार्च १९२८ – १३ जून १९८०). सुप्रसिद्ध मराठी तमासगीर. मूळ नाव गजानन राघू सरोदे. आईचे नाव नाबदाबाई. पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुक्यातील इंदुरी नावाच्या गावात महार कुटुंबात दादू…

इंदल (Endal)

महाराष्ट्रातील पावरा आदिवासी जमातीतील प्रसिद्ध उत्सव. सातपुडा परिसरात भिल्ल व पावरा या दोन्ही समाजात प्रामुख्याने हा उत्सव साजरा करतात. ‘इंदल’ म्हणजे इंदीराजा; एक लोकदेवता. पुत्रप्राप्तीसाठी, घरातील बरकतीसाठी, सुखशांतीसाठी ,वैयक्तिक स्वरूपात…